Pages

मोबाईल पाण्यात पडणे





      💥*विद्यार्थी विकास*💥                             ➖➖➖➖➖➖

               ➖➖➖➖➖
 👇
 👇
 👇 👇
 👇



*मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावे*
                                                                                                                                     📱📱📱📱
       
*1)पाण्यात पडला की आपल्या हृदयात एकदम धस्स होतं. बोलून चालून यंत्रच हो ते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ते जिवंत राहील  की नाही याची शाश्वती देणे कठीणच! आणि आपल्याला या इवल्याश्या पण उपयुक्त यंत्राने इतकी सवय लावलेली असते की तो पाण्यात पडल्यावर जेवढी इजा त्याला होत नाही त्यापेक्षा जास्त मार आपल्या मनाला बसतो. मग पाण्यातून त्याला बाहेर काढल्यावर अगदी भरल्या डोळ्यांनी आपणं त्याच्याकडे पाहतो आणि त्याला सुरु करायचा प्रयत्न करतो. नशिबात असेल तर सुरु होतो नाही तर बोंबला!*

 *2)अश्यावेळी पाण्यात पडलेला मोबाईल जरी सुरु झाला तरी तो अजून किती वेळ नीट काम करेल हे सांगता येत नाही, कारण मोबाईलच्या आता जर पाणी गेले असेल तर त्यामुळे आतील यंत्रणेला धोका पोचून मोबाईल कायमचा बंद होऊ शकतो.*

 *3)अश्यावेळी सर्वप्रथम – मोबाईल सुरु झाल्यास सर्वप्रथम त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा.*

*4)फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो* *त्यानंतर मोबाईलच्या आता गेलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. आता हे पाणी कसे काढावे याच्या अनेक पद्धती आहेत. बहुतेक पद्धती तुम्ही ऐकून असालच, तर काही पद्धती अजून तुमच्या कानापर्यंत पोचायच्या बाकी असतील. आज आम्ही त्या सगळ्या पद्धती तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने मोबाईलमध्ये पाणी गेले असल्यास आपण मोबाईल वाळवू शकतो*

 *5)एक पद्धत म्हणजे भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांडं सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा. मोबाईल कोरडा करण्याची ही सर्वात उपयुक्त पद्धत असल्याचे बोलले जाते.*

 *6)दुसरी एक पद्धत म्हणजे मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.*

*7)ओला मोबाईल कधीही हेअर ड्रायरने वाळवू नये. ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.*

 *8)मोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.*

 *9)अजून एक पद्धत म्हणजे मोबाईल वाळवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. याशिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.*

*10)आता पुढच्या वेळेस मोबाईल पाण्यात पडला की घाबरून न जाता यापैकी जी पद्धत तुम्हाला शक्य आहे आणि सोप्पी आहे ती वापरा आणि तुमच्या लाडक्या मोबाईलचे प्राण वाचवा*