Pages

व्हायरसपासून सुरक्षेच्या सोप्या टिप्स

व्हायरसपासून सुरक्षेच्या सोप्या टिप्स



आयटी विश्लेषण अहवालानुसार, प्रत्येक

दिवशी सुमारे १,५०,००० हून अधीक कंप्युटर

व्हायरस जागतिक स्तरावर पसरवले जातात

आणि सुमारे १,४८,००० पेक्षा जास्त

कंप्युटरना त्यांचा धोका असतो. हे व्हायरस

आणि मालवेअर फक्त लाखो वापरकर्त्यांना

त्रास देण्यासाठी बनविलेले असतात असे

नाही, तर या व्हायरस किंवा मालवेअरच्या

हल्ल्यामुळे नुकसान होऊन लाखो रुपये खर्च

करण्याची वेळ येऊ शकते.

तुम्ही तुमच्या कंप्युटरवर होणारा व्हायरस

आणि मालवेअर हल्ला टाळण्यासाठी पुढील

साध्या व सोप्या उपाययोजना करू शकता.

चांगला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर

सिस्टममध्ये इन्स्टॉल करून तो नेहमी

कार्यरत ठेवा. वेळोवेळी त्यातील

व्हायरस डेटाबेस अपडेट करा. असे केल्याने

इंटरनेटवरील शेकडो व्हायरसपासुन तुमचा

बचाव होईल. आयटी तज्ञ देखील नेहमी

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर अपडेटेड

ठेवण्याची शिफारस करतात. अँटी-

व्हायरस सॉफ्टवेअर नियमितपणे वापरून

संपुर्ण पीसी स्कॅन करणे गरजेचे आहे.

एव्हीजी अँटी-व्हायरस हा एक उत्तम

आणि मोफत मिळणारा अँटी-व्हायरस

सॉफ्टवेअर आहे. डाउनलोड करण्यासाठी

free.avg.com या दुव्याचा वापर करा.

नेहमी तुमच्या कंप्युटरची ओएस अद्यावत

ठेवा. विंडोज सिस्टममध्ये ऑटोमॅटीक

सिक्युरिटी अपडेट्सची सुविधा चालू

करा. (हि सेवा चालू करण्यासाठी

कंट्रोल पॅनेल मध्ये जाऊन विंडोज अपडेट

सिलेक्ट करा.)

प्रत्येक सिस्टममध्ये इंटरनेटवरून होणाऱ्या

हल्ल्यापासून बचावासाठी

फायरवॉलची सुविधा असते. या

फायरवॉलमुळे नेटवर्क किंवा इंटरनेट

कनेक्शनवरून इतरांना आपल्या संगणकावर

अनधिकृत प्रवेश करण्यास प्रतिबंध केला

जातो. फायरवॉलसुद्धा सिस्टमचाच

भाग असल्याने बहुतेक नव्या पिसीसोबत

चालू अवस्थेत येते. मात्र जुन्या पीसीमध्ये

हि सुविधा असेलच असे नाही. अशावेळी

तुम्हाला फायरवॉल सॉफ्टवेअर विकत घेणे

आवश्यक आहे.

इमेल वापरताना देखील काळजी घेणे

आवश्यक आहे. इमेलमधून आलेल्या वर्ड,

एक्सेल किंवा पीडीएफ फाईल व्हायरस

असू शकतात. बऱ्याचदा इंटरनेटवरून

सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची वेळ येते.

अशा वेळी ते सॉफ्टवेअर मूळ वेबसाईटवरूनच

डाउनलोड करावे. तसेच इंटरनेट

वापरण्यासाठी आपण जे ब्राउझर

वापरतो ते सुद्धा अपडेटेड असल्याची

खात्री करावी. गुगलचे क्रोम हे एक

उत्तम ब्राउझर आहे.

तुमच्या फाईल्स, हार्ड ड्राईव्ह तसेच

बॅकअप ड्राईव्हसाठी एन्क्रिप्शनचा

वापर करा. एनक्रिप्टकेलेल्या फाईल्स

पाहण्यासाठी पासवर्डची गरज असते,

त्यामुळे अशा फाईल्स केवळ पासवर्ड

माहित असलेली व्यक्तीच पाहू शकते.

तसेच अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरसोबत

अँटी-मालवेअर

सॉफ्टवेअरसुद्धा सिस्टममध्ये असणे

आवश्यक आहे. का ते आपण पुढच्या लेखात

पाहू. अँटी-मालवेअर सॉफ्टवेअरसाठी

मालवेअरबाईट एक चांगला पर्याय आहे.


संकलन :- नंदकिशोर फुटाणे