Pages

चांगली कर्म




😊 *निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...*😊

🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.
🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.
कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..                                         🔴आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.."                                   🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!
🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात.
🔴किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. 😊😊 😊😊 *म्हणून नेहमी आनंदी राहा*🤗🤗🤗🤗

*"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...*
*"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!!