Pages

कोडवर्ड




👉 _*अंडरवर्ल्डमध्ये वापरले जाणारे कोडवर्ड...*_



संपूर्ण जगभरात अंडरवर्ल्ड, माफियाचं काम कसं चालतं? तर ते कोडवर्डच्या आधारावर. त्यांच्या रोजच्या व्यवसायात कोडवर्ड महत्वाची भूमिका बजावतात. विशेषतः सुरक्षा यंत्रणांना चकमा देण्यासाठी कोडवर्डची भली मोठी लिस्टच डि-कंपनीने बनवलेली आहे. असेच काही वापरले जाणारे प्रचलित कोडवर्ड आज जाणून घेऊयात...

1) _*फाईल*_ : फाईल हा अंडरवर्ल्डमध्ये सर्रासपणे वापरला जाणारा एक महत्वाचा शब्द. अंडरवर्ल्ड भाषेत फाईलचा अर्थ हत्यार होतो. फाईल लाओ म्हटलं की, समजायचं हत्यार येणार.

2) _*पेशंट*_ : एकेकाळी दाऊदचा जिगरी दोस्त असणारा मुंबईचा डॉन छोटा राजन नंतरच्या काळात दाऊदचा कट्टर दुश्मन बनला. या दुष्मनीमुळे दाऊदने नंतर छोटा राजनचे नाव पेशंट असे ठेवले. दाऊदचा खास शूटर असणाऱ्या जुनेदला ऑगस्ट महिन्यात दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर या कोडवर्डचा पर्दाफाश झाला.


3) _*एम्स हॉस्पिटल*_ : एम्स हॉस्पिटल हा कोडवर्ड तिहार जेलसाठी वापरला जातो. एम्स हॉस्पिटलचा अर्थ आहे ‘छोटा राजन तिहार जेलमध्ये आहे’.

4) _*डॉक्टर*_ : अंडरवर्ल्डमध्ये एखाद्या खबरी किंवा गुप्तहेराला डॉक्टर नावाने ओळखले जाते.

5) _*इंग्लिशवाली*_ : अंडरवर्ल्डमध्ये ‘ऑटोमॅटिक पिस्टल’ साठी इंग्लिश वाली हा कोडवर्ड वापरलो जातो. ‘साहब आज इंग्लिश वाली लाया हुँ’ हे वाक्य ऐकून कोणी विचारही करणार नाही की, हे हत्यारांच्या तस्करीसाठी वापरले जात आहे.

6) _*हिंदी वाली*_ : इंग्लिशवाली प्रमाणे हिंदीवाली हा कोडवर्ड देशी हत्यारांसाठी (कट्टा) वापरला जातो.

7) _*महाराज*_ : महाराज हा कोडवर्ड माफिया एका नावाजलेल्या पोलीस ऑफिसरसाठी वापरत असत. ते पोलीस अधिकारी होते एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर.

8) _*बावा*_ : प्रदीप शर्मा यांच्यासाठी माफिया बावा हा कोडवर्ड वापरत असत.

9) _*अण्णा*_ : पोलीस अधिकारी दया नायक हे दक्षिण भारतीय असल्यामुळे काही गँग त्यांच्यासाठी अण्णा हा कोडवर्ड वापरत असत.

10) _*बिडी*_ : अंडरवर्ल्डमध्ये आता पोलिसांसाठी बिडी हा कोडवर्ड वापरला जातो. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सामान्य माणसांना नाटक व चित्रपटामध्ये वापरले जाणारे कोडवर्ड माहिती असतात. त्यामुळे हे नवीन शब्द अंडरवर्ल्डमध्ये वापरले जात आहेत व हे कोडवर्ड प्रत्येक 3-4 वर्षाला बदलले जातात.

11) _*गिटार*_ : माफिया जगतात एके-47 बंदुकीसाठी गिटार हा नवीन कोडवर्ड तयार झाला आहे. पूर्वी एके-47 साठी झाडू हा कोडवर्ड माफिया लोक वापरत असत.

12) _*लॉटरी*_ : अंडरवर्ल्डमध्ये पैशासाठी अगोदर कागद हा कोडवर्ड वापरला जायचा. पण आता कागदाची जागा लॉटरी या कोडवर्डने घेतली आहे.

यासोबत ड्रग तस्करीसाठी कोडवर्ड म्हणून अंडरवर्ल्ड माफिया बॉलीवूड सेलिब्रिटींची नाव देखील वापरतात. सेलेब्रिटीचे नाव वापरल्यामुळे डीलमध्ये गडबड होण्याचा धोका कमी असतो व सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यास ही मदत होते...

1) _*रणवीर सिंग*_ : अंडरवर्ल्ड माफिया ड्रग विक्रेत्याला रणवीर सिंग म्हणून ओळखतात.

2) _*आलिया भट्ट*_ : कोकेन सारख्या खतरनाक ड्रगची तस्करी करण्यासाठी अंडरवर्ल्ड जगतात कोकेन या शब्दाऐवजी आलिया भट्टचे नाव सिक्रेट कोडवर्ड म्हणून वापरले जाते.

3) _*रणवीर कपूर*_ : ड्रग तस्करी करताना जो होस्ट असतो त्याच्यासाठी रणवीर कपूरचे नाव वापरले जाते.

4) _*कंगना राणावत*_ : अफीम या ड्रगची तस्करी करण्यासाठी कंगना राणावतचे नाव वापरले जाते.

5) _*कॅटरीना कैफ*_ : स्मॅकसाठी माफिया जगतात बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफचे नाव सिक्रेट कोडवर्ड म्हणून वापरले जाते.