*मराठी व्याकरणतील फार कमी माहीत असणाऱ्या गोष्टी*
💥 *विद्यार्थी विकास* 💥
➖➖➖➖➖
👇
➡ *भाषेतील रकाराचे चिन्ह*
*डोर्ली* *रफार*
*कृष्ण* *रुकार*
*प्रकाश* *रकार*
*राष्ट्रीय* *काकपद*
➡ ज्या वर्णाच्या निर्मितीत अडथळा येत नाही ते *स्वर* उदा .अ आ.....व अडथळा येतात ते *व्यंजने* क ,ख ,ग...... अशी आपण स्वरांची व व्यंजनाची ढोबळमानाने व्याख्याविद्यार्थ्यांना समजण्यासाठी करू शकतो.
➡ अ इ उ वर्णापैकी *स्वरांत* हे तीन मुख्य आहे.ह्याचेच दीर्घ स्वरूप म्हणजे आ ई ऊ हे स्वर होत.
➡ प्रत्येक्ष व्यहारातील उच्चाराचे प्रकार ऱ्हस्व व दीर्घ हे दोनच आहे.पण तुम्हाला माहीत नसेल कीं ऱ्हस्व व दीर्घ मध्ये उच्चाराची मात्रा कमी अधिक करून चार प्रकार करतात.
*ऱ्हस्व*
*क्षिप्र*
*दीर्घ*
*प्लुत*
उच्चाराची 1 मात्रा कमी - क्षिप्र
उच्चाराची 1 मात्रा जास्त- प्लुत
प्लुतमध्ये आणखी एक मात्रा मिळविली की होणारा उच्चार वृध्द उच्चार
गोविंदा sss , रामा sss ,
हऱ्या sss अंत्य अक्षरांचा उच्चार आपण लांबवितो तो *प्लुत* उच्चार होय.
अनु -अदृष्य हा इंद्रियांचा विषय नाही .इंद्रियांला अगम्य आहे .
ह्यापेक्षा मोठे परिमाण म्हणजे
परमाणू-दोन अणूंचा मिळून बनतो.इंद्रियगम्य आहे.
परमाणू पेक्षा मोठे म्हणजे *मात्रा* होय.
मात्रा म्हणजे काय?
(1) डोळे उघडायला लागणारा काळ
(2) अंगुली स्फोटाणाला लागणारा काळ.....
.म्हणजे एक *मात्रा* होय.
एक मात्रा ह्या परिणामानंतरचे द्विमात्रा हे होय .दीर्घ स्वरांचे परिणाम *द्विमात्रा* असते.
➡ *स्र* व *स्त्र* यात प्राय घोळ होतो.
स्र = स + र + अ
*अजस्र* , *चतुरस्र* , *सहस्रावधी* ,
*सहस्रबुद्धे* , *स्रवणे* , *रक्तस्राव*
स्त्र = स + त + र् + अ
*स्त्री* , *इस्त्री* , *शस्त्र* , *शास्त्री*
➖➖➖➖➖
✍संकलन
*नंदकिशोर फुटाणे*
█║▌│║║█║█║▌║║█║