*मजेशीर परिमाणे*
💥*विद्यार्थी विकास*💥
*रिश्टर आणि रिक्टस*
👇
👇
👇 👇
👇
कधी कधी काही मजेदार एककं मुद्दाम तयार केली जातात. अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) हे शक्ती मोजण्यावचं एक परंपरागत एकक. पण घोडय़ांसारखी गाढवंही सामानाची ने-आण करायला वापरतात. मग गर्दभशक्ती (डाँकीपॉवर) का नाही? काही जणांनी मात्र हे एकक गंभीरपणे वापरायला घेतलं, आणि एक गर्दभशक्ती म्हणजे एकतृतीयांश अश्वशक्ती अशी त्याची व्याख्यासुद्धा करून टाकली.
👉 असंच एक ऊर्जेचं एकक आहे पायरेट निजा – संगणक खेळांमधली दोन नामांकित पात्रं. मंगळावर तिकडच्या एका दिवसात खर्च होणारी एक किलोवॉट/तास ऊर्जा म्हणजे एक पायरेट निजा ऊर्जा. नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबमध्ये अवकाश मोहिमा आखताना तंत्रज्ञ या एककाचा उल्लेख करतात असं ऐकिवात आहे.
👉 ‘बीअर्ड सेकंद’ असंही एक विनोदी एकक आहे. एका सेकंदात दाढीचा केस जितका वाढेल, तितकी लांबी म्हणजे दाढी-सेकंद. आता या विचित्र एककाचा उपयोग काय असं जर तुम्हाला वाटत असेल, तर याचा वापर खरोखरच होतो. अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिक घटकांनी बनलेल्या इंटिगट्रेड सर्किटमध्ये सूक्ष्म लांबी बऱ्याचदा नॅनोमीटर या रूढ एककात मोजली जाते. पण कधी कधी मजा म्हणून ती दाढी-सेकंदातही मांडली जाते.
👉 एक दाढी-सेकंद म्हणजे नक्की किती यावर मात्र जरा वाद दिसतात. काही ठिकाणी दहा नॅनोमीटर तर काही ठिकाणी पाच नॅनोमीटर असं मापन दिसतं. स्वाभाविक आहे, प्रत्येकाची दाढी एकसारख्या वेगाने थोडीच वाढणार?
👉 भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर हे एकक वापरलं जातं. पण त्यासाठी एक गमतीचं एकक आहे रिक्टस. भूकंपाचं माध्यमात किती वार्ताकन केलं जातं याचं हे एकक आहे. एक रिक्टस तीव्रतेच्या भूकंपाची फक्त स्थानिक वृत्तपत्रात दखल घेतली जाते. तर सर्वात जास्त, म्हणजे पाच रिक्टस तीव्रतेच्या भूकंपाला देशभरात प्रसिद्धी मिळते. केवळ बातमीच नाही, तर साप्ताहिकांमध्ये, मासिकांमध्ये त्यावर लेख येतात. त्याची खास वार्तापत्रं टीव्हीवर सतत दाखवली जातात. आणि पुढे या भूकंपावर लगेचच पुस्तकं देखील लिहिली जातात!
✏ *शब्दांकन*
*नंदकिशोर फुटाणे
साभार
दै. लोकसत्ता
█║▌│║║█║█║▌║║█║