नेट बँकिंग
कॅशलेस सुविधा घेण्यासाठी आपल्याला नेट बँकिंग माहीत असणे
आवश्यक आहे. आपण ज्याप्रमाणे फेसबूक चालवितो
त्याप्रमाणेच नेटबँकिंग आहे. मला आवडलेल्या नेट बँकिंग मध्ये
SBI चे नेटबँकिंग सर्वात उत्कृष्ट आहे.
1) नेट बँकिंग चालू कसे करावे त्याला दोन पर्याय
आहेत. 1. बँकेत जाऊन
अर्ज करणे तेथे 10 मिनिटात आपल्याला लॉगिन id व पासवर्ड
देतात. 2. बँकेत
न जाता आपण आपल्या एटीएम व पासबूकवरुन करता येते
त्यासाठी एसबीआयच्या
वेबसाइटला भेट द्या. यासाठी आपला मोबाइल नंबर आवश्यक
आहे जो आपण बँकेत
दिला आहे . तेथे पण 10 मिनिटात नेटबँकिंग सुरू होईल.
2) id व पासवर्ड मिळाल्यावर आपण ते बदलून घ्यावे. पासवर्ड
हा सर्व अंक स्पेलिंग व चिन्ह वापरुन तयार करावा. तसेच
प्रोफाइल पासवर्ड पण तयार करावा.
3) google play store वर जाऊन State bank Anywhere हे sbi
चे नेटबँकिंगचे aap डाऊनलोड करून घ्या.
4) app मध्ये लॉगिन करून आपण आपले व्यवहार करू
शकता.
5) आपण दुसर्यांना पैसे पाठवू शकतो.आपले पूर्ण
खाते हाताळू शकतो.
6) मोबाइल व डिश टीव्ही रिचार्ज करू शकतो.
7) ऑनलाइन शॉपिंग करू शकतो.
8) PPF मध्ये पैसे भरू शकतो. त्याचे स्टेटमेंट प्रिंट आपण काढू
शकतो.
9) पासबूक ची गरज नाही. App मध्ये पासबूक सुविधा उपलब्ध
आहे. Transaction चे वर्षभरातील प्रिंट काढू शकतो.
10) इन्कम टॅक्स माहिती मिळवता येते.
11) नेट बँकिंग चा कोणताच चार्ज आकाराला जात नाही.
12) नेटबँकिंगसाठी आपल्याजवळ android phone
आवश्यक आहे. संगणकावरपण आपण वापरू शकतो.
नेटबँकिंग वापरताना घ्यावयाची काळजी*
1) आपला पासवर्ड व id कुणाला देवू नका.
2) OTP कुणाला देवू नका.
3) ATM पासवर्ड/पिन CVV क्रमांक व नंबर कुणाला देवू नये
4) आपण लॉगिन केल्यावर पासवर्ड remember करू नका.
5) वैयक्तिक वापर करा.
6) फसव्या कॉल व ईमेलला रीप्लाय देवू नका
एक पाऊल cashless व्यवहाराकडे
2) MOBILE BANKING SBI use app State Bank Freedom
नोटबंदीमुळे रोखीने व्यवहार करताना येताना अडचणी त्यामुळे e-
व्यवहार करणं शिकणं, वापरणं गरजेचे आहे, त्यातलाच एक
भाग म्हणून आज आपण sbi mobile banking विषयी माहिती
करून घेऊ
प्रथम आपल्या mobile setting मधील sim card setting मध्ये
आपला sbi मध्ये असणारा registered मोबाइल नंबर वरून मेसेज
जाईल अशी setting करा.
नेट चालू करून google play store वर जाऊन STATE BANK
FREEDOM install करा.
किंवा ज्यांच्या कडे हे app आहे त्यांच्याकडून घ्या.
नंतर app open करून त्याच्या खालच्या पट्टीवर register दिसेल
ते select करा..त्याबरोबर आपल्याला एक मेसेज येईल,त्यात user
ID व MPIN प्राप्त होईल,
तो लिहून घ्या.
नंतर app ओपन करून प्राप्त झालेला user id टाकून activate
बटन वर क्लिक करा
नंतर पुढील स्क्रीन वर old mpin जो आपणास प्राप्त झाला आहे
तो टाका व आपला नवीन mpin दोन वेळा टाकून सेट करा
नंतर आपणास mpin successfully changed असे स्क्रीन वर येईल.
त्याबरोबर एक मेसेज येईल त्यातील MBSREG हा भाग लिहून
9223440000 या नंबरला रेजिस्टरेड मोबाईल वरून मेसेज
पाठवा.
त्याबरोबर आपणास एक मेसेज येईल..कि
Complete your activation process by visiting atm/by internet
Banking/by visiting branch...
यातील atm activation चा पर्याय सोपा आहे. तेथे mobile
banking registration पर्याय निवडून प्रोसेस complete करा..
आता आपले अँप वापरायला तयार झाले.
User id व आपण सेट केलेला Mpin लक्षात ठेवा. त्यानेच app
उघडेल..
या अँप द्वारे 200000 पर्यँत ट्रान्सफर. balance enquiry ,mini
statement, neft, mobile recharge, dth recharge या सारख्या
बाबी करू शकता.
एक पाऊल cashless व्यवहाराकडे
संकलन :-नंदकिशोर फुटाणे