Pages

संदेश कायमस्वरूपी जतन करा.

व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश ेव्ह से करावेत.?

बांधवांनो आजकाल व्हॉटस् अपवर दररोज हजारो संदेश येतात त्यातील

काही *अतिमहत्वाचे लेख असतात, काही कविता व लेख मनाला स्पर्श

करून जाणाऱ्या असतात, दैनंदिन जिवन सुखकर करणाऱ्या टिप्स

असतात, एैतिहासिक माहिती असते, शेतीविषयक मार्गदर्शन असते,

समाजाविषयी महत्वाचे संदेश असतात* इत्यादी गोष्टी आपणाला खूप

आवडतात परंतु प्रबळ इच्छा असूनही आपण हे संदेश जतन करू शकत

नाही किंवा प्रत्येक संदेश लिहून काढण्या इतपत वेळही आपल्याकडे

नसतो...

याकरिता एक अत्यंत सोपा उपाय आहे. *Playstore* मधून

*Notebooks* या नावाचे अॅप्लिकेशन इन्सटॉल करा अन् आपले बहुमोल

संदेश कायमस्वरूपी जतन करा.

📚📒 *Notebooks  हे कसे शोधावे?*

Play store मध्ये जावून जसेच्या तसे Notebooks लिहून सर्च करा.

वेगवेगळ्या रंगाची एकावर एक ठेवलेली पाच पुस्तके व त्यांच्या आधाराने

पिवळ्या रंगाचे एक पुस्तक उभे केले आहे (📚📒)हा  Notebooks चा

*आयकॉन* आहे_ केवळ असा आयकॉन असलेलेच Notebooks इन्सटॉल

करा.

📚📒 *Notebooks  मधे महत्वाचे संदेश कसे जतन करावेत?*

Notebooks इन्सटॉल करून ओपन केल्यानंतर त्यामध्ये + Plus हे चिन्ह

दिसेल त्यावर क्लिक करून आपण विषयानुसार आपणास आवश्यक

तितक्या सिंगल नोटबुक तयार करू शकतो. त्यामध्ये १००० पर्यंत पेजेस

घेता येतात. हव्या त्या डिझाईनचे कव्हर ठेवता येते. त्यांना विषयानुसार

वेगवेगळी नावे द्यावेत उदा - ऐतिहासिक माहिती, महापुरुष, बोधकथा,

प्रेरणादायी विचार, आरोग्य टिप्स, सुविचार इत्यादी इत्यादी आपल्या

गरजेनुसार.

त्यानंतर वेळोवेळी व्हॉटस् अपवरील _आपले आवडते संदेश कॉफी करून

त्या त्या विषयाच्या नोटबुक मध्ये पेस्ट करावेत.

दररोज कॉफी पेस्ट करण्याइतपत आपल्याकडे वेळ नसेल तर ते महत्वाचे

संदेश वाचता क्षणीच Star करून ठेवावेत व जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा हे

Star केलेले संदेश Notebooks मध्ये विषयानुसार पेस्ट करावेत.

📚📒 *Whats app  डिलीट झाले तर Notebooks मधील संदेश डिलीट होतात

का..?*

नाही. Whats app व Notebooks ही दोन्ही वेगवेगळी अॅप्लिकेशन असल्या

कारणाने Whats app डिलीट झाले तरी आपण Notebooks मध्ये जतन

केलेला एकही संदेश डिलीट होत नाही...

📚📒 मोबाईल बदलला किंवा चोरी झाला री  Notebooks मध्ये जतन

करून ठेवलेले जुने संदेश जसेच्या तसेच नविन मोबाईल मध्ये घेता

येतात काय..?*

होय घेता येतात. आपला मोबाईल चोरीला गेला तरी चिंता करण्याचे

कारण नाही आपण जतन केलेली सर्व माहिती जशीच्या तशी नविन

मोबाईल मध्ये घेता येते..

यासाठी फार मेहनत करण्याची गरज नाही...

याकरिता दोन पद्धती आहेत..

1) *_ऑफलाईन बॅकअप_*

हा बॅकअप आपल्या मेमरी कार्ड (Local Storage) मध्ये घेता येतो.

मोबाईल बदलतेवेळी नविन मोबाईल मध्ये आपण संग्रहित केलेले सर्व

संदेश जसेच्या तसे घेता येतात..

दर दहा-बारा दिवसांनी Notebooks चा ऑफलाइन बॅकअप घ्यावा.

2) *_ऑनलाईन बॅकअप_*

हा बॅकअप घेण्यासाठी अापले Dropbox किंवा Google Drive अकाउंट हवे

असते. कृपया हे अकाउंट तयार करावे. आपला मोबाईल चोरीला गेला

असता आपण Notebooks मध्ये जतन करून ठेवलेली आपली सर्व

माहिती नविन मोबाईल मध्ये जशीच्या तशी Restore करता येते. आपण

नियमित ऑनलाईन बॅकअप घेतल्यास ऑफलाइन बॅकअप घेण्याची गरज

नाही.

📚📒 *Notebooks  चे इतर फायदे कोणते..?*

आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातील हिशेब, कामाच्या याद्या,

नियोजन, आपण लिहत असलेले महत्वाचे लेख आदी गोष्टी वेगवेगळ्या

नावांच्या नोटबुक तयार करून त्यामध्ये लेखन करून कायमस्वरूपी

जतन करू शकता.



संकलन :- नंदकिशोर फुटाणे