📊📊📊📊📊📊📊📊📊📊
🥀 🌼💠■■💠🌼🥀
💥 *विद्यार्थी विकास* 💥
👇
👇 👇
👇
💥 👉 *’या’ भूमिकांसाठी कोट्यवधींची वेशभूषा*
कोणत्याही चित्रपटाचे यश कशावर अवलंबून असते? तर चित्रपटाची कथा, गाणी, त्यातील कलाकार, लोकेशन्स, चित्रपटांमधील कलाकारांचे पोशाख, वेशभूषा, संकलन, जाहिरात आणि इतर काही तांत्रिक गोष्टी महत्वाच्या असतात. मात्र चित्रपट यशस्वी असो किंवा अयशस्वी त्यातील काही गोष्टींचं सर्वांना नेहमीच आकर्षण असतं. ते म्हणजे कलाकारांचे लूक्स आणि हेअरस्टाईल. आज आपण बॉलिवूडमधील अशाच काही चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहेत. ज्यात कलाकारांच्या विशेष भूमिकेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत...
💥 👉 _*जोधा अकबर*_ :
या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय बच्चनने महाराणी जोधाबाईची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी ऐश्वर्याला ‘लेहेंगा - चोली’ पद्धतीचा पोशाख परीधाण करावयाचा होता. या भूमिकेसाठी ऐश्वर्याने घातलेल्या प्रत्येक पोशाखाची किंमत प्रत्येकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असून, प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी हे पोशाख तयार केले होते. तर अकबराच्या भूमिकेत दिसलेल्या हृतिक रोशनच्या प्रत्येक पोशाखाची किंमतही अंदाजे दोन लाखांच्या घरात होती.
💥 👉 _*रोबोट*_ :
टॉलीवूड चित्रसृष्टीचे महानायक रजनीकांत यांच्या अतिशय गाजलेल्या ‘ रोबोट ‘ चित्रपटातील त्यांचा रोबोटचा पोशाख तीन कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आला होता. हा पोशाख मनीष मल्होत्रा आणि मेरी वोट या डिझायनर्सनी तयार केला होता.
💥 👉 _*‘सिंग इज ब्लिंग‘*_ :
या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने परिधान केलेल्या सोनेरी फेट्याची किंमत तब्बल पासष्ट लाख रुपये इतकी होती.
💥 👉 _*‘कम्बख्त इश्क’*_ :
या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर हिने आठ लाख रुपये किंमतीचा पोशाख परिधान केला होता. हा पोशाख या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी खास पॅरिसहून मागविला होता.
💥 👉 _*‘रा-वन’*_ :
शाहरुख खानने सुपरहिरो म्हणून काम केलेल्या या चित्रपटासाठी सुपरहिरोचे किमान वीस पोशाख तयार केले गेले होते. या सर्व पोशाखांची किंमत 100 कोटी रुपयांहूनही अधिक असल्याचे म्हटले जाते.
💥 👉 _*‘बाजीराव मस्तानी’*_ :
या चित्रपटामध्ये मस्तानीची भूमिका करीत असलेल्या दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या दागिन्यांची एकूण किंमत पाच कोटींच्या आसपास होती.
💥 👉 _*‘देवदास’*_ :
या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या ‘ काहे छेड छेड मोहे’ या गाण्यामध्ये माधुरीने परिधान केलेल्या पोशाखावर पंधरा लाख रुपये खर्च करण्यात आले असून, या पोषाखाचे वजन तब्बल तीस किलो इतके होते.
💥 👉 _*‘वीर’*_ :
या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान याने विविध प्रकारचे सहा पोशाख परिधान केले होते. या पोशाखांची किंमत प्रत्येकी वीस लाख रुपये इतकी होती.
🥀🌼💠■■💠🌼🥀
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
●█║▌│║║█║█║▌║║█║●