Pages

फेसबुक कसे वापराल?

फेसबुक कसे वापराल?

फेसबुक हे सध्याचे तरुण पिढीचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे....

जून्या मित्रमैत्रीणींना शोधण्यापासून ते नवनविन मित्रमैत्रीणी जोडण्यासाठी

फेसबुक एक चांगले प्रभावी माध्यम आहे. समजण्यास साधे-सोप्पे आणि

नविन खाते लगेच सुरु करुन अनेकांना सहज शोधण्यास मदत करणारे

अशी फेसबुकची ओळख.

फेसबुकची तांत्रिक ओळख म्हणजे एक -- सोशल नेटवर्किंग --

संकेतस्थळ. याचा अर्थ कोणताही आर्थिक फायद्याचा विचार नसून फक्त

एकमेकांशी संबंध जोडणे असा होतो.

ओळखी वाढविणे, मित्रसंबंध जोडणे, मित्रांच्या मित्रांना शोधणे जेणे करुन

एकमेकांच्या संपर्काने हरविलेल्या जून्या मित्रमैत्रीणींशी संपर्क करणे हा

फेसबुकचा उद्देश. नविन घडामोडी सर्वांना सांगणे, आपले फोटो सर्वांना

दाखविणे (शेअर करणे), ऑनलाईन गेम्स खेळणे, चॅटींग करणे,

संदेश/निरोप ठेवणे, आपले विडिओ ठेवणे, इतरांच्या विशेष कार्यक्रमाची

माहिती सांगणारी दिनदर्शिका (कॅलेंडर), एकमेकांचे वाढदिवस आठवणीने

सांगणे या फेसबुक उपयोगी सेवा वापरण्यास फारच सोप्प्या असल्याने

फेसबुकला जोडलेला प्रत्येक व्यक्ती सहजासहजी त्यापासून स्वत:ला

वेगळा करीत नाही. एकदा फेसबुकची सवय जडली की दरारोज इतरांची

माहिती मिळविणे हा एक छंद बनतो. त्यासोबत वेळोवेळी नविन

संकल्पना फेसबुक येत असल्याने त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.



फेसबुकवर आपले खाते कसे उघडाल?

फेसबुकच्या वेबसाइटवर आपल्याला पहिल्याच पानावर फेसबुकचे

नविन खाते उघडण्याची सोय आहे.

आपले नाव, आडनाव, ई-मेल, पासवर्ड दिल्यानंतर ' Sign Up ' या

बटणावर क्लिक करा. नंतर पुढे ३ टप्प्यांमध्ये त्यांनी विचारलेली

आवश्यक माहिती भरावी लागेल. ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या

इतर संपर्कातील लोकांची ई-मेल तो आपल्या ई-मेल खात्यातून काढून

घेतो दुसर्‍या टप्प्यामध्ये आपल्या शाळा, कॉलेज आणि नोकरीची

माहिती तर तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपला फोटो अपलोड

करावा. हे तीन टप्पे पूर्ण करणे आवश्यक नाही नको असलेली माहिती

नंतर देखिल भरता येते त्यासाठी तीथे ' skip ' या बटणाची सोय आहे.

शेवटी ' Save & Continue ' या बटणावर क्लिक करुन आपण आपल्या

खात्यामध्ये प्रवेश करु शकता.

१ २ ३

फेसबुकच्या आपल्या खात्यामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर

डावीकडील जागेमध्ये ' Messages ' विभागामध्ये आपण आपल्याला

इतरांकडून आलेले निरोप/संदेश पाहता येतील.

फेसबुकच्या आपल्या खात्यामध्ये समोरच्या पानावर वर आपल्याला

' Status ' असा विभाग आढळेल त्याखाली आपल्याला ' What's on your

mind? ' असे लिहिलेले आढळेल त्यामध्ये आपण आपल्याला हवे ते लिहू

शकता जे नंतर सर्वांना दिसू लागेल. त्याच बाजूला दिलेल्या विभागाद्वारे

आपण आपले फोटो, एखादी वेबसाइटची लिंक, विडीओ तसेच इतरांना

प्रश्न विचारु शकता.

आपल्या ओळखीच्या लोकांना तसेच मित्र-मैत्रिणींना आपल्या

खात्यामध्ये जमा करण्यासाठी सर्वात वर ' Search ' म्हणजे शोधण्याची

देखिल सोय आहे.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले काम झाल्यानंतर फेसबुकचे

आपले खाते बंद करणे देखिल तितकेच आवश्यक आहे.


संकलन :- नंदकिशोर फुटाणे