बक्षिस लागल्याचे ई-मेल
बक्षिस लागल्याचे ई-मेल
सध्या पैसे कमविण्यासाठी इंटरनेट अत्यंत प्रभावी माध्यम
बनले आहे. त्यामूळे पैसे कमविण्यासाठी अनेक गैरमार्गांचा
देखिल वापर वाढला आहे. एखादी चांगली वाटणारी बातमी
प्रत्यक्षात तितकीच नुकसानकारक ठरु शकते. अशीच एक बातमी
म्हणजे आपल्या भले मोठे बक्षिस लागल्याचे.
दररोजच्या ई-मेल मध्ये कधीतरी असाही एखादा ई-मेल येतो
ज्यामध्ये आपल्याला करोडो रुपयांचे बक्षिस लागल्याचे कळविले
जाते.
इंटरनेटवरील एका सर्वेक्षणामध्ये झालेल्या लकी-ड्रॉ मध्ये आपला
ई-मेल निवडा गेला असून त्याद्वारे आपल्याला जवळजवळ
$२१,००,००० (२१ लाख अमेरीकन डॉलर्स म्हणजे ९,२४,००,०००
रुपये) रोख रुपयांचे बक्षिस लागल्याचे कळविले जाते. तसेच
लवकरात लवकर आपण आमच्य कंपनीशी संपर्क साधावा आणि
आपले बक्षिस स्विकारावे असे दिलेले असते. हा ई-मेल पण एका
मोठ्या कंपनीच्या नावाने आलेला असतो आणि ज्यामध्ये त्या
कंपनीच्या अधिकार्याचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक देखिल
दिलेला असतो. महत्वाचे म्हणजे आपल्या नावानीशी आलेला हा
ई-मेल आणि सोबत इवढी भली मोठ्ठी रक्कम बक्षिस
आपल्याला लागल्याच्या बातमीवर लगेचच कुणाचाही विश्वास
बसतो.
अशा वेळेला ई-मेल मध्ये दिलेल्या त्या अधिकार्याला फोन
करण्यापेक्षा त्याच्या ई-मेलला प्रतिउत्तर (रिप्लाय) देणेच योग्य
वाटते. आपण पैसे आपल्याला कसे आणि कधी मिळतील असे
उत्तर देता आणि एक-दोन दिवसांमध्ये त्यांचा उत्तर असलेला
अजून एक ई-मेल आपल्याला येतो. या ई-मेल मध्ये आपल्याला
आपली ओळख सांगण्याविषयी विचारले जाते, जसे, आपले संपुर्ण
नाव, पत्ता, जन्म दिनांक, बँक खाते इ. इ.
आपल्याला आलेल्या या त्यांच्या उत्तराने आपल्याला ती कंपनी
खरी असल्याची पूर्ण खात्री होते आणि ज्या अर्थी त्यांनी आपल्या
बँक खात्याची माहिती विचारली या अर्थी पैसे आपल्या
खात्यामध्ये जमा होणार असे वाटू लागते. आपण त्यांना पून्हा
प्रतिउत्तरामध्ये संपुर्ण माहिती पुरविल्यानंतर २-३ दिवसांनी त्यांचा
पुन्हा ई-मेल येतो.. परंतू या ई-मेल मध्ये त्यांनी एक शंका
उपस्थित केलेली असते ज्या मध्ये असे सांगितले जाते की
आपल्याला हे बक्षिस लागून बरेच आठवडे झाले आहेत आणि
आपण आमच्या ई-मेलला लगेच उत्तर न दिल्याने आपले पैसे
तुर्तास बँकमध्ये अडकले आहेत. त्याला थोडा कालावधी लागेल,
या त्यांच्या उत्तरानंतर आपण काही दिवस त्यांच्या ई-मेलची वाट
पाहता, पण त्यांचा ई-मेल येत नाही. मग शेवटी आपणच त्यांन
काय स्थिती आहे असे विचारणा ई-मेल पाठविता. आपल्या या
उत्तराच्या प्रतिउत्तराचा त्यांचा ई-मेल मग लगेचच येतो. या
त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी आपले पैसे बँकमध्ये अडकले
असल्याचे पून्हा कळविले जाते व ते सोडविण्यासाठी साधारण
$१,००० (१ हजार अमेरीकन डॉलर्स म्हणजे जवळपास ४४,०००
रुपये) इतक्या रुपयांच्या आवश्यकता आहे असे कळवितात जे
त्यांच्य कंपनी भरण्यास तयार नाही आणि जर आपल्याला
आपल्या बक्षिसाचे $२१,००,००० हवे असतील तर त्यासाठी बँकेचा
$१,००० दंड आपल्याला भरावा लागेल असे सांगितले जाते. तसेच
त्यांच्या पत्त्यावर $१,००० चा अमेरीकन चेक पाठविण्यास
सांगितले जाते.
इथे मग १-२ दिवस विचार केल्या नंतर आपण हाच विचार
करता की $२१,००,००० रुपये मिळविण्यासाठी जर $१,००० जात
असतील तर त्यात काहीच हरकत नाही आणि आपण कोणताही
विचार न करता त्यांना चेक पाठविता आणि त्यांना तसे ई-
मेलद्वारे कळविता. परंतू नंतर त्यांचा कोणताही ई-मेल येत
नाही. त्यानंतर काही दिवसांनी मग कंटाळून आपण त्यांना
त्यांच्या दूरध्वनी वर फोन करता पण तो दूरध्वनी देखिल
चुकीचा असल्याचे कळते आणि शेवटी आपल्याला आपण
फसविले गेल्याचे समजते परंतू तो पर्यंत बराच वेळ गेलेला
असतो आणि आपण काहीच करु शकत नाही हे आपल्याला
कळते.
लक्षात ठेवा असा ई-मेल आपला फार मोठे नुकसान करु
शकतो... आज ना उद्या कधीतरी कधीतरी असा ई-मेल
आपल्याला येईल आणि जर आला असेल तर इतर कुणालाही न
पाठविता सरळ त्याला डिलीट करुन टाका..
संकलन :- नंदकिशोर फुटाणे