Pages

वाचनसंस्कृती

     



               वाचनसंस्कृती

 💥*विद्यार्थी विकास*💥
   ➖➖➖➖➖➖➖
👇 👇 👇👇👇 👇 👇👇
 

  💥*वाचाल तर वाचाल* ..........
   ➖➖➖➖➖➖➖
*मुलांना वाचायची सवय लावायची तर पालकांनी आधी पुस्तक हातात घ्यायला हवं. वाचन कमी होतंय, अशी तक्रार जगभर. मात्र अनेक संशोधक सांगतात की, वाचनानं मेंदूला उत्तम खुराक मिळतो आणि अनेक फायदेही मिळतात.*

काही वर्षांपूर्वी जर कोणाला ‘तुमची आवड काय आहे, तुम्हाला काय आवडतं? असं विचारलं की बहुतेकजण ‘मला वाचनाची आवड आहे’ म्हणून सांगायचे. पण आता हाच प्रश्न विचारला तर उत्तरं अनेक येतात. पण त्यात वाचनाची आवड असलेले खूप कमीजण आढळतात. *स्मार्टफोन*, *कॉम्प्युटर*, *गूगल*, *यू-ट्यूब* यामुळे *वाचनसंस्कृती* थोडी मागे पडली आहे.
पूर्वी ‘*वाचाल तर वाचाल*’ या नियमाप्रमाणे घरातले मोठे मुलांना वाचायलाच सांगायचे. दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना भरपूर वाचायला मिळावं यासाठी वाचनालय लावून द्यायचे. महत्त्वाचं म्हणजे मुलांना वाचा वाचा म्हणून सांगणारे मोठे स्वत:ही दिवसभरात हातात पुस्तक, मासिक नाहीच काहीतर एखादं वर्तमानपत्र तरी पूर्ण वाचायचे. पण हल्ली सर्वत्र हीच तक्रार की कोणाला हातात पुस्तक आणि पेपर धरून वाचायलाच आवडत नाही..! अनेकजण धावतपळत संगणकावर गूगल GOOGLE करत जेवढं वाचतात तेवढंच. तेच वाचण्यात आनंद.
हे असं जरी असलं तरी संशोधन मात्र ‘वाचत राहा’ या सल्ल्यावर ठाम आहे. वाचनाच्या संदर्भात गेल्या काही दिवसात जगभरात जे संशोधन झालं ते हेच सांगतंय की तुम्हाला तुमचा विकास व्हावा असं वाटत असेल तर वाचनाची सवय गंभीरतेनं लावा आणि असली तर वाढवा. आणि वाचन म्हणजे एका जागी निवांत बसून हातात पुस्तक धरून वाचणं. हेच या संशोधनाला अभिप्रेत आहे. वाचनाच्या सवयीवर विविध अंगांनी जे संशोधन झालं आहे, ते वाचनाचे शरीर आणि मनावर कसे चांगले आणि सकारात्मक परिणाम होतात हेचं सांगते. जगण्याच्या दिशेपासून जगण्याच्या समाधानापर्यंत सर्व काही वाचनातून मिळू शकतं असा अभ्यास सांगतो.

वाचल्यानं नेमकं काय होतं?

💥 *हुशारी वाढते*
   ➖➖➖➖➖➖➖
संशोधक याबद्दल सांगतात की, जेवढं तुम्ही वाचाल तितक्या अधिक विषयांची माहिती तुम्हाला होईल. पुस्तकाच्या माध्यमातून अख्खं जग समजून घेता येतं. लहान मुलांच्या हुशारीच्या बाबतीत तर वाचन खूप फायदेशीर ठरतं. मुलं भाषा ऐकून आणि वाचूनच शिकतात. पण उत्तम भाषा शिकण्याचं माध्यम म्हणजे त्या भाषेतलं पुस्तक वाचन. वाचण्यामुळे  शब्दसंपदा वाढते. वाचनाची ही सवय लहान वयातच विकसित झाली तर मोठेपणी त्याचा उपयोग होतो.

💥 *मेंदूची क्षमता वाढते*
   ➖➖➖➖➖➖➖
वाचनामुळे अनेकविध विषयांची माहिती मिळून वाचणारा स्मार्ट तर होतोच; पण वाचनाच्या नियमित सवयीमुळे मेंदूची क्षमताही वाढते. ज्याप्रमाणे जॉगिंग, व्यायाम याचा फायदा शरीर आणि हृदय सक्षम होण्यास होतो तसाच वाचनामुळे मेंदूचाही व्यायाम होऊन मेंदू कार्यक्षम होत असतो. वाचनामुळे मेंदू कामाला लागतो आणि त्यातून स्मरणशक्ती वाढते. वयोमानानं स्मरणशक्ती कमी होते, मेंदूची कार्यक्षमताही कमी होते. पण नियमित वाचनाची सवय असेल तर वयोमानाचे स्मरणशक्तीवर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामाची तीव्रता खूपच कमी असते. वाचनामुळे मेंदू, बुद्धी आणि स्मरणशक्ती दीर्घकाळापर्यंत टोकदार राहू शकते.

💥*संवेदनशीलता वाढते*
   ➖➖➖➖➖➖➖
इतरांना समजून घेण्याची माणसातली शक्ती वाढते. वाचनामुळे इतर लोकांना काय वाटतं? हे समजून घेण्याची क्षमता वाढते. त्यातही तुम्हाला जर फिक्शन वाचण्याची सवय असेल तर हा परिणाम नॉनफिक्शन वाचण्याच्या तुलनेत जास्त दिसतो.

💥*समजण्याच्या शक्तीमध्ये होते वाढ*
   ➖➖➖➖➖➖➖
बरेचजण वाचायचं म्हणून वाचत नाही. *वाचताना अनेकांना नोट्स काढून ठेवण्याची सवय असते*. एखादी गोष्ट नीट समजली नसेल तर त्याची नोंद करून ठेवून नंतर ती समजून घेतात. वाचनामुळे समजून-उमजून घेण्याची शक्ती वाढते.

💥*अल्झायमर आजाराशी लढण्याची ताकद मिळते* -
   ➖➖➖➖➖➖➖
    हे मेंदूला कामाला लावतं. जसं बुद्धिबळ खेळणं, कोडं सोडवणं हे करताना मेंदू जसा अ‍ॅक्टिव्ह होतो तसाच वाचन करताना मेंदू कामाला लागतो. मेंदूला सतत कामाला लावणं महत्त्वाचं असतं. मेंदूचं काम जर थंडावलं तर *अल्झायमर* सारख्या मानसिक आजारांची शक्यता वाढते. वाचनासारखी सवय मेंदूला कामात ठेवून या आजारापासूनही लांब ठेवते.

💥*मेंदू आणि मनाला आराम  मिळतो*   
   ➖➖➖➖➖➖➖
दिवसभरातल्या कामानं आलेला तणाव घालवायचा असेल तर सरळ दिवसाच्या शेवटी मस्त अर्धा तास वाचन करा. वाचनामुळे मनावरचा आणि मेंदूवरचा सर्व ताण निघून जातो. वाचन करताना पुस्तकात/लेखात गुंतल्यानं मनातल्या सर्व चिंता काही काळ तरी गळून पडतात. म्हणूनच वाचन हे मनाला आराम मिळवण्याचं चांगलं माध्यम आहे.

💥 *शांत झोप येते* -
   ➖➖➖➖➖➖➖
वाचनामुळे मन आणि बुद्धी शांत होते. हातात धरून पुस्तक वाचनामुळे मनाला खरी शांतता मिळते. *मोबाइल किंवा संगणकाच्या स्क्रीनवर वाचन करून डोळ्यांवर आणि बुद्धीवर ताणच येतो*. हातात धरून वाचलेलं पुस्तकच मनाला हवी असलेली शांतता देऊ शकतं. म्हणून झोपायला जाण्याआधी किमान वीस मीनिटं तरी हातात पुस्तक, पेपर धरून काहीतरी वाचायला हवं.

म्हणून मित्रांनो ....
आपल्यावर ज्या बालकांची जबाबदारी, पालकांनी  सोपवली त्यांना वाचनाची आवड लावणे आपले कर्तव्य आहे .
    संकलन
*नंदकिशोर फुटाणे*

9⃣9⃣7⃣0⃣1⃣4⃣2⃣2⃣9⃣0⃣