Pages

चॅटींग म्हणजे काय आणि ते कसे करावे?

चॅटींग म्हणजे काय आणि ते कसे करावे?

चॅटींग म्हणजे काय आणि ते कसे करावे?

इंटरनेटद्वारे दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांनी कॉम्प्युटरवरुन केलेल्या

गप्पागोष्टींना ' चॅटींग ' असे म्हणतात. चॅटींग करण्यासाठी चॅटींगसाठी असलेला

प्रोग्रॅम चॅटींग करणाऱ्या दोन्ही व्यक्तिंच्या कॉम्प्युटरमध्ये असणे आवश्यक आहे.

सध्या चॅटींगचा प्रोग्रॅम बऱ्याच वेबसाइट पुरवितात. त्यामूळे आपल्याला जर

एखाद्या व्यक्तीशी करायची असेल तर दोन्ही ठिकाणी सारखाच चॅटींगचा प्रोग्रॅम

असणे आवश्यक आहे.

याहू.कॉमचा याहू मॅसेंजर (Yahoo Messenger) तर गूगल.कॉमचा जी-टॉक (GTalk) हे

दोन चॅटींगचे प्रोग्रॅम जगप्रसिद्ध आहेत. या दोन्ही प्रोग्रॅमद्वारे चॅटींग करण्यासाठी

आपल्याला त्यांच्या वेबसाइटवर प्रथम मोफत ई-मेल खाते उघडावे लागेल. जर

आपला अधीच याहू.कॉमवर ई-मेल असेल तर आपण त्याद्वारे याहू मॅसेंजर अथवा

जीमेल.कॉमवर ई-मेल असेल तर आपण त्याद्वारे जी-टॉकवर चॅटींग करु शकता.

आपल्याला जर आपल्या एखाद्या मित्रमैत्रीणीशी चॅटींग करायची असेल तर प्रथम

वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही ठिकाणच्या कॉम्प्युटवर याहू मॅसेंजर अथवा जी-टॉक

यापैकी एखादा सारखाच प्रोग्रॅम लोड करुन घ्यावा लागेल.

गूगल.कॉमचा जी-टॉक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. - google.com/talk

याहू.कॉमचा याहू मॅसेंजर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. -

messenger.yahoo.com

खाली दाखविल्याप्रमाणे मग त्या प्रोग्रॅममध्ये आपल्या ई-मेलद्वारे लॉगिन करावी

लागेल. आपल्या ई-मेलचा योग्य युजरआयडी आणि पासवर्ड दिल्यानंतर चॅटींगचा

प्रोग्रॅम आपल्या समोर सुरु होईल.

एकदा का आपण या दोन्हीपैकी एखादा प्रोग्रॅम आपल्या कॉम्प्युटरमध्ये लोड केला

की नंतर दरवेळेस कॉम्प्युटर सुरु केल्याबरोबर अपोआप सुरु होतो आपणास जर तो

प्रोग्रॅम वापरायचा असेल तर त्या प्रोग्रॅममध्ये आपल्या ई-मेलद्वारे लॉगिन करावी

लागेल. आपल्या ई-मेलचा योग्य युजरआयडी आणि पासवर्ड दिल्यानंतर चॅटींगचा

प्रोग्रॅम आपल्या समोर सुरु होईल.

जर आपण प्रथमच चॅटींग करीत असाल तर खाली दाखविल्याप्रमाणे सर्वप्रथम

आपल्याला आपल्या त्या मित्र अथवा मैत्रीणीचा ई-मेल आयडी त्या चॅटींगच्या

प्रोग्रॅममध्ये जमा करावा लागेल. अशाप्रकारे एखाद्य व्यक्तीला त्या प्रोग्रॅममध्ये

जमा करण्यासाठी त्यामध्ये ' + ADD ' च्या बटणाची सोय आहे. आपण जर जी-

टॉक वापरत असाल तर आपल्या त्याला चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये जमा करताना

त्याचा ई-मेल आयडी जी-मेलचाच असायला हवा तसेच जर आपण याहू मॅसेंजर

वापरत असाल तर त्यासाठी आपला व आपल्या मित्र अथवा मैत्रीणीचा ई-मेल

आयडी देखिल याहूचाच असणे आवश्यक आहे.

आपल्या चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये आपल्याला हवे तेवढे मित्र अथवा मैत्रीणी जमा करु

शकता. परंतू चॅटींग करण्यासाठी आपल्या प्रमाणेच आपल्याला ज्याच्याबरोबर चॅटींग

करायची असेल तो देखिल त्यावेळी आपल्याप्रमाणेच दुसरीकडे सारखाच चॅटींगचा

प्रोग्रॅम वापरत असायला हवा.

या चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये आपण जमा केलेल्या मित्र अथवा मैत्रीणीपैकी

आपल्याप्रमाणेच इतर कुणी त्यावेळी ऑनलाईन असल्यास तसे त्यामध्ये सुचित

देखिल केले जात. मग आपण त्याच्या नावावर डबल-क्लिक करुन उघडणार्‍या

छोट्या चौकोनात त्याला एखादे वाक्य लिहिल्यास लगेचच आपला संदेश आपल्या

मित्र अथवा मैत्रीणीच्या कॉम्प्युटरवर छोट्या चौकोनामध्ये दिसू लागेल. मग त्याच

छोट्या चौकोनामध्ये खाली त्या दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला प्रतिउत्तर देता येईल.

अशा प्रकारे आपण त्या छोट्या चौकोनामध्ये टाईप करुन गप्पागोष्टी करु शकता.

यालाच चॅटींग असे म्हणतात.


संकलन :-नंदकिशोर फुटाणे