Pages

मोबाईलचा शोध कसा घ्यावा ?

मोबाईलचा शोध कसा घ्यावा ?

मोबाइल कोठे ठेवला आहे हे आता तुम्हाला आठवत

नाही? गाडी च्या शीटखाली, सोफा आणि उशिच्या खाली

सुदधा शोधून झाला? ठिक आहे! आता गुगल तुमचा फोन

शोधण्यासाठी मदत करेल. जर तुम्हाला तुमचा कॉम्प्यूटर

कोठे आहे हे आठवत असेल तर पीसीच्या डेस्कटॉपवरून

अॅण्ड्रॉइड फोनचा शोध घेण्यासाठी गुगलला विचारू शकता.

यासाठी फक्त गूगलच्या सर्च मध्ये 'find my phone'

टाइप करा आणि सेकंदामध्ये गूगल तुमचा फोन कोणत्या

ठिकाणी आहे हे गूगल मॅपवर दाखवेल. तसेच येथे फोनची

रिंग वाजविण्याची, फोनला लॉक करण्याची आणि

फोनवरील डेटा नष्ट करण्याची सुविधा देखील आहे.पण

तुमच्या फोन मध्ये लेटेस्ट गूगल अॅप जरूरी आहे,

जीपीएस सुरू असणे आवश्यक आहे आणि फोन मध्ये

ज्या जीमेल अकाउंट आहे त्याच यझर आडीचा वापर

करून येथे आधि लॉगीन करणे आवश्यक आहे.


संकलन :- नंदकिशोर फुटाणे