Pages

कामे भरपूर; वेळ कमी

   
   

👉 *कामे भरपूर; वेळ कमी, असं का होतंय?*

      VIDYARTHI VIKAS

         👇
 👇 👇
 👇
 


बऱ्याच जणांची ओरड असते, करायला पुष्कळ काम आहे मात्र वेळ कमी पडतोय. आपण ही परिस्थिती सगळीकडेच अनुभवत असतो. वेळच मिळत नाही. मग छंद आणि आरोग्य कसं जपायचं? याच्याच चर्चा सुरू असतात. केवळ चर्चा करणं हे चुकीचं आहे. म्हणून यावर उपाय काय याचा विचार करूयात. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

👉 _*पोमोडोर टेक्निक*_ : वेळेच्या व्यवस्थापनासाठीचे हे एक उत्तम कौशल्य आहे. याच तंत्राचा उपयोग करून जगातील अनेक यशस्वी व्यक्ती काम करतात. हे तंत्र 1980च्या दशकात फ्रांसेस्को सईलोने विकसित केले. या तंत्रात एका टायमरच्या मदतीने कामांची विभागणी लहान-लहान वेळेच्या तुकड्यांमध्ये केली जाते. यात छोटे-छोटे विश्राम, 25 मिनिटे सलग कामाचा एक पोमोडोर तयार केला जातो. आपला मेंदू हा सलग 25 मिनिटे एखाद्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकतो. त्यानंतर विश्राम घेणे आवश्यक असते.


👉 _*वेळेचा योग्य उपयोग करा*_ : तुमचे कार्यालय आणि घर यामध्ये खूप अंतर असेल तर मधल्या प्रवासात खूप वेळ वाया जातो. हा वेळ तुम्ही चांगले उत्पन्न मिळणाऱ्या दुसऱ्या कामात व्यतित करू शकता. या वेळेचा सुदपयोग कसा करायचा याचा विचार करा. यामुळे तुमच्यावरील अचानक येणारा ताण थोडा हलक होईल व कामे वेळेवर होतील. 

👉 _*कामांचे योग्य वाटप*_ : कार्यालयातील प्रत्येक काम जर तुम्हीच पूर्ण करायचे असा प्रयत्न असेल तर त्याचा तुम्हाला काहीही फायदा नाही. यामध्ये वेळेचा अपव्यय जास्त होतो.  प्रत्येक योग्य व्यक्तीकडे देऊन स्वत: महत्वाचे काम करण्याकडे लक्ष द्या.

👉 _*छंदाला प्रथम प्राधान्य द्या*_ : कार्यालयीन कामासोबत आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी देखील पुरेसा वेळ देणे गरजेचे असते. तुम्हाला जर वाचनाचा छंद असेल, पण जर पुस्तके वाचायला वेळ मिळत नसेल तर सध्या ऑडिओ बुक्सचा पर्याय निवडू शकता. ही पुस्तके तुम्ही कधीही चालता-फिरता, प्रवासात ऐकू शकता. जर तुम्हाला संगीताची किंवा एखाद्या वाद्याची आवड असेल तर तुमच्या कार्यालया जवळच त्याचे क्लासेस शोधा. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या कामात काही वेळ देता तेव्हा दिवसभर तुम्ही उत्साहित, ताजेतवाने आणि कार्यालयीन कामेही चांगल्या पद्धतीने पूर्ण होतात.

👉 _*इतरांची मदत घ्या*_ :  प्रत्येक यशस्वी व्यक्तीला कामाची कशी विभागणी करायची हे माहित असते. तुम्ही कामाची विभागणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या कामाचा बोजा इतरांवर टाकून तुम्ही निश्चिंत बसायचं, असं नाही. तर तुमच्या कामातही इतर सहकाऱ्यांची, कनिष्ठांची मदत घ्यायला शिका. ज्या व्यक्तीने मदत केली आहे, त्याच व्यक्तीला त्याचे श्रेय जरूर द्या.

👉 _*फिटनेसकडे लक्ष द्या*_ : आजच्या धावपळीमुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देता येत नाही. परंतु काही छोट्या-छोट्या गोष्टी अशा आहेत की, ज्या तुम्ही कार्यालयात असताना देखील करू शकता. कार्यालयातील लिफ्टचा वापर टाळा, खुर्चीत बसूनच हाताचे, डोळ्यांचे व्यायाम करू शकता. हल्ली बऱ्याच कार्यालयांत ’जीम’चा पर्याय असतो, त्याचा लाभ घ्यावा.

👉 _*अतिघाई, उत्साह टाळा*_ : कोणतेही काम हाती घेतल्यानंतर त्याला परिपूर्ण करण्यासाठी अतिघाई-गडबड करणे टाळा. यामुळे कामात जास्त चुका राहण्याची शक्यता असते. कोणतेही काम नीटनेटकेपणाने, परिपूर्ण करणे ही कला आहे.