Pages

ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग (Blog) हा शब्द वेब लॉग (Web log) या शब्दावरुन निर्माण

झाला. लॉग म्हणजे नोंद. इंटरनेटवर म्हणजेच वेबवर आपल्या कामाची

नोंद तयार करणे हा त्याचा अर्थ होतो.

ब्लॉगला आपल्या कामाची इंटरनेटवरील नोंदवही असेही म्हणता येईल.

कारण ब्लॉगवर नोंदविलेली कुठलीही माहिती अथवा लेख त्यावर दिनांक

आणि वेळेच्या क्रमवारीने नोंदविले जाते. म्हणजेच नविन माहिती सर्वात

वर असते. तर काळानुसार जुनी होत गेलेली माहिती नंतर महिन्याच्या

आणि मग वर्षाच्या नावानुसार ब्लॉगवर फोल्डरमध्ये विभागली जाते.

अशाप्रकारे एखादी माहिती दिनांकानुसार लगेच शोधता येते.

सध्या ब्लॉगची सेवा देणाऱ्या वेबसाइटमध्ये www.blogger.com ही

वेबसाइट फार प्रसिद्ध आहे.www.blogger.com या वेबसाइटवर आपण

आपला मोफत ब्लॉग बनवू शकता. या वेबसाइटवर आपले नविन ब्लॉगचे

खाते बनविल्यासरशी आपण लगेचच त्यावर माहिती ठेवू शकता.

म्हणजेच आपण आपल्या ब्लॉगवर ठेवलेली माहिती लगेचच जगभरामध्ये

कुठूनही पाहता येऊ शकते.

ब्लॉगमधिल सध्याच्या प्रणालीद्वारे आपण आपल्या ब्लॉगवर चित्रे

(Images) तसेच चलचित्रे म्हणजेच विडीओ देखिल ठेवू शकता. ब्लॉगची

सेवा मोफत एखादी व्यक्ती आपले कितीही ब्लॉग बनवू शकते.

ब्लॉगची मांडणी साध्यास्वरुपाची असली तरी सध्या बनलेल्या ब्लॉगच्या

आकर्षक डिझाईनमूळे तिची मांडणी बदलत चालली आहे.



संकलन :- नंदकिशोर फुटाणे