Pages

Cloud Computing

   

      💥 *विद्यार्थी विकास* 💥
     
          Cloud Computing
            *क्लाऊड स्टोरेज*


प्रथम क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय ते पाहूया. आज काल पेनड्राईव घेऊन फिरणे ओल्ड फॅशनेबल मानले जात आहे. ज्याप्रकारे भारतात इंटरनेटचा प्रसार झाला त्या प्रमाणे फिजिकली डेटा घेऊन फिरणे मागासपनाचे लक्षण मानले जात आहे. आता तुम्ही ऑनलाईन डेटा साठवू शकता आणि शेअर पण करू शकता.
ड्रॉपबॉक्सची सुविधा मोबाइल तसेच ऑनलाइनही उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही लॉगइन करून ड्रॉपबॉक्सची सुविधा घेऊ  शकता. सुरुवातीला       दोन  जीबीपर्यंतची स्टोअरेज क्षमता मोफत दिली जाते. यामध्ये तुम्ही फोटो शेअर करणे, डॉक्युमेंट्सच्या फाइल्स एडिट करणे आदी कामे करू शकता. तुम्हाला ड्रॉपबॉक्समधली एखादी फाइल जर ई-मेलद्वारे पाठवायची असेल तर तुम्ही ती फाइल थेट ड्रापबॉक्समधून ई-मेलला जोडू शकता. याचबरोबर या माध्यमातून तुम्ही संगणकावरील तुमच्या फाइल्स मोबाइलमध्ये, तर मोबाइलमधील फाइल्स संगणकावर ओपन करू शकता. यामध्ये विविध स्टोअरेज क्षमतेनुसार विविध प्रकारचे पॅकेजेस उपलब्ध आहेत.

             *गुगल ड्राइव्ह*
    👇 👇  👇 👇  👇 👇  👇

गुगल ड्राइव्ह ही गुगलची सेवा असून ती आपल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ  शकते. जर आपण मोबाइलवर याचे स्वतंत्र अ‍ॅप डाऊनलोड केले, तर मोबाइलवरही ही सेवा उपलब्ध होऊन मोबाइलमधील फोटो, व्हिडीओज्, पीडीएफ फाइल्स आदी गोष्टी आपण सहजपणे ड्राइव्हवर सेव्ह करून ठेवू शकतो. या ड्राइव्हच्या माध्यमातून आपण आपला डेटा संगणकावर सहज शेअर करू शकतो. तसेच जीमेलवरच्या अटॅचमेंट्स आपण थेट गुगल ड्राइव्हवरच डाऊनलोड करू शकतो, जेणेकरून आपल्या संगणकात किंवा अन्य कुठे वेगळी स्टोअरेज जागा खर्च करण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला गुगल आपल्याला पंधरा जीबीचे क्लाऊड स्टोअरेज मोफत उपलब्ध करून देते. याशिवाय गुगलच्या विविध सुविधा तुम्ही वापरल्या तर त्यावरही तुम्हाला ड्राइव्हची स्टोअरेज स्पेस मोफत दिली जाते. उदाहरणार्थ तुम्ही *क्विक ऑफिस* डाऊनलोड केले तर तुम्हाला दहा जीबीचे अतिरिक्त क्लाऊड स्टोअरेज उपलब्ध होऊ  शकते. तसेच विविध मोबाइल कंपन्यांच्या असलेल्या टायअपमुळे आणखी स्टोअरेज क्षमता मिळणे शक्य होते. यामध्ये एका कंपनीशी असलेल्या सहकार्य करारानुसार गुगल शंभर जीबीची स्टोअरेज जागा मोफत देते, तर वीस हजार गाण्यांचा साठा असलेली गुगल म्युझिकची सुविधा क्लाऊड स्टोअरेजच्या स्पेसव्यतिरिक्त दिली जाते.      म्हणजे     ही         गाणी साठवण्यासाठीची     क्षमता आपल्याला    मोफत    मिळते.

                *ड्रॅापबॉक्स*

        👇 👇  👇 👇  👇 👇  👇
क्लाऊड स्टोरेजचा मुख्य सिद्धांत म्हणजे कि आपल्या सिस्टम  मध्ये किंवा एक्सटर्नल डिस्क मध्ये डेटा स्टोअर करण्याऐवजी *ऑनलाइन* सेव करणे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हीं पद्धत अतिशय सुरक्षित आहे. ज्या प्रमाणे आपले इमेल्स आपणच पाहू शकतो तसेच यामध्ये आपल्या फाईल्स फक्त आपण पाहू शकतो.   जर तुम्हाला एखादी फाईल जर कुठे पाठवायची असेल तर फक्त एका क्लिक वर शेअर करू शकता.
इंटरनेट वर अश्या अनेक साईट आहेत ज्या क्लाऊड स्टोरेज सेवा पुरवतात. या साईटवर आपल्याला एक खाते काढावे लागते मग युजरनेम व पासवर्ड तयार करावा लागतो. सुरक्षेच्या आणि फीचर्स च्या दृष्टी ने *ड्रॅापबॉक्स* ची सेवा सर्वोत्तम आहे. सोपा इंटरफेस आणि पुरेशी स्टोरेज यामुळे ड्रॅापबॉक्स चांगलेच प्रसिद्ध आहे. ड्रॅापबॉक्स मध्ये आपल्याला 2 GB ची स्टोरेज मिळते. तुम्ही ती 18 GB पर्यंत वाढवू शकता. मला वाटते कि प्रत्येकाने  ड्रॅापबॉक्स वापरण्यास सुरुवात केळी पाहिजे. निदान आपली महत्वाची डॉक्यूमेंटस, फोटोज, वीडीओ अशी अतिशय वैयक्तीक माहिती तुम्ही यावर स्टोअर करू शकता. सध्यातरी इंटरनेटवर ड्रॅापबॉक्स हून सुरक्षित स्टोरेज उपलब्ध नाहीये.


   ==================
   संकलन....✍🏻✍🏻✍🏻
  *नंदकिशोर फुटाणे*