Pages

इंटरनेट

इंटरनेट

इंटरनेट युगाची खर्‍या अर्थाने सुरुवात १९६९ पासून झाली जेव्हा

अर्फानेट (Arpanet) या कामाच्या जाळ्याची कल्पना समोर आली. यावेळी

युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटींग सिस्टमची सुरुवात झाली,

जे आज देखिल एक वेबसर्व्हरसाठी एक चांगली प्रणाली मानली जाते.

त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली.

ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे टॉमलीनसन (Ray Tomlinson) यांनी तेव्हा

ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या @ चिन्हा मूळे

ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी

विभागल्या जातील.

पुढे १९७१ मध्ये इंटरनेटवर गटेनबर्ग आणि ई-बुक या दोन नविन

प्रकल्पांची निर्मिती झाली. गटेनबर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-

बुकमध्ये चित्रस्वरुपात (स्कॅन इमेजेस) पुस्तके संग्रहित करण्यात आली.

नंतर १९७४ च्या सुरुवातीला टिसीपी/आयपी (TCP/IP) चा वापर केला

गेला. सर्व नेटवर्कमध्ये केंद्रीय नियंत्रण असावे हा यामागचा प्रयत्न जो

पूढे टिसीपी/आयपी ने प्रचलित झाला.

१९७५ मध्ये जॉन विटल (John Vittal) याने ई-मेलमध्ये नविन सुधारणा

आणल्या ज्यामध्ये ई-मेलला प्रतिउत्तर (Reply) देणे व आलेल्या ई-मेलला

दुसऱ्याला (Forward) पाठविणे हे महत्त्वाच्या गोष्टी होत्या. १९७७ मध्ये

डेनिस हायेस आणि डेल हेदरिंगटन (Dennis Hayes and Dale

Heatherington) यांनी मॉडेमचा शोध लावला. तर १९७८ मध्ये पहिला

अनावश्यक ई-मेल समोर आला, ज्याप्रकाराला नंतर स्पॅम (spam) असे

म्हटले गेले.

१७७९ मध्ये युजनेट (Usenet) चा वापर सुरु झाला. पदवीच्या दोन

विद्यार्थांनी बनविलेल्या या युजनेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक

इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करु शकतात. १९८२ पहिल्या

अक्षरांद्वारे प्रतिक्रिया दाखविण्याची सुरुवात :-) हे चिन्ह वापरुन केली.

आपल्या प्रत्येक विनोदाच्या शेवटी तो :-) हे हसण्याची चिन्ह वापरत

होता. यालाच आताचे इमोशीकॉन (emoticon) असे म्हणतात, जे आपण

ई-मेल आणि चॅटींगमध्ये वापरतो.

१९८४ मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हर (Domain Name Servers (DNS))

ची निर्मिती झाली. डोमेन नेम सर्व्हरमध्ये हव्या त्या प्रमाणे नाव

वापरण्याची सोय असल्याने पुर्वीच्या आयपी ऍड्रेस मधिल क्रमांकाएवजी हे

लक्षात ठेवायला फारच सोपे होते. डोमेन नेम सर्व्हरद्वारे नाव दिल्यानंतर

त्याचे रुपांतर आपोआप नंतर आयपी ऍड्रेस मधिल क्रमांकामध्ये होत

असेल. १९८५ मध्ये काल्पनिक समुहाची निर्मिती केली, तेव्हा निर्माण

केलेली द वेल (The Well) ही आजदेखिल इंटरनेटवरील एक प्रभावशाली

समुह (community) आहे.

१९८७ मध्ये इंटरनेटचे जवळपास ३०,००० धारक होते. तर १९८८ मध्ये

इंटरनेटवरील पहिल्या गप्पागोष्टींचे सहक्षेपण (Internet Relay Chat) केले

गेले जे आज आपण चॅटींच्या स्वरुपात वापरतो. तर तेव्हाच म्हणजे

१९८८ मध्ये इंटरनेटवर पहिल्या उपद्रवी प्रोग्रॅमने हल्ला चढवून मोठ्या

अडचणीला समोर आणले.

१९८९ मध्ये अमेरीका ऑन लाईन म्हणजेच AOL (America Online) ची

निर्मिती झाली. ज्यामूळे नंतरच्या काळामध्ये लोकांमध्ये इंटरनेट

लोकप्रिय होण्यास कारणीभूत झाला. त्याच साली म्हणजे १९८९ मध्ये

वर्ल्ड वाईड वेब (World Wide Web) ही संकल्पना टीम बर्नर-ली (Tim

Berners-Lee) यांनी अस्तिताव आणली. जी पूढे खऱ्या अर्थाने १९९०

पासून सुरु झाली.

१९९० च्या सालामध्ये इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारे प्रगती झाली.

यासाली द वर्ल्ड (The World) या पहिल्या व्यावसायिक डायल-अप

इंटरनेट सेवा पुरविणाऱ्याची (dial-up Internet provider) सुरुवात झाली.

१९९१ मध्येच पहिले इंटरनेटवरील पान म्हणजेच वेबपेज बनविले गेले.

१९९० मध्येच गोफर (Gopher) या पहिल्या शोध प्रणालीची देखिल

निर्मिती झाली, जी फक्त फाईलचे नावच नाही तर त्यातील

मजकूरदेखिल शोधत असे. याच साली एमपीथ्री (MP3) या प्रकाराला

सर्वमान्यता मिळाली. हा फाईलचा प्रकार आजदेखिल आवाजाच्या आणि

गाण्याच्या फाईलसाठी जगप्रसिद्ध आहे. १९९१ मध्येच इंटरनेटवरील

अतिमहत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिल्या वेबकॅमचा म्हणजेच ऑनलाईन

कॅमेऱ्याचा केंब्रिज विद्यापीठामध्ये वापर केला गेला.

पुढे १९९३ मध्ये सर्वसामान्यांसाठी प्रथमच मोझाईक हा पहिला ग्राफिकल

(graphical) इंटरनेट ब्राऊझर उपलब्ध झाला. खरंतर सर्वात पहिला इंटरनेट

ब्राऊझर नव्हता, जास्त तांत्रिक गुंतागुतीचा नसुन तो परंतू तो वापरायला

अतिशय सोपा असल्याने तो लगेचच सर्वाधिक प्रचलित इंटरनेट ब्राऊझर

बनला. १९९३ मध्येच अमेरिकेतील व्हाईट हाऊस आणि शासकीय

वेबसाइट इंटरनेटवर आल्या ज्यामूळे तेव्हा वेबच्या क्षेत्रामध्ये प्रथमच

.gov आणि .org या दोन वेबसाइटच्या नावाची निर्मिती झाली. १९९४

मध्ये मोझाईकच्या इंटरनेट ब्राऊझरला नेटस्केप नॅविगेटर हा पहिला

प्रतिस्पर्धी इंटरनेट ब्राऊझर तयार झाला.

१९९५ मध्ये बँकेचे तसेच क्रेडीट कार्डचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी

व्यावसायिक दृष्ट्या सुरक्षित इंटरनेट ब्राऊझर आवश्यक भासू लागली. या

आवश्यकतेनुसार नेटस्केप कंपनीनेच सुरक्षित असा SSL (Secure Sockets

Layer) प्रणाली असलेला ब्राऊझर तयार केला. कारण याच साली Echo Bay

या इंटरनेटवर ऑनलाईन विक्री करणाऱ्या वेबसाइटची निर्मिती झाली जी

आज eBay नावाने ओळखली जाते. याच साली Amazon.com या

वेबसाइटची देखिल निर्मिती झाली. असे असले तरी जवळपास ६

वर्षांपर्यंत म्हणजेच २००१ पर्यंत या वेबसाइटला कुठलाच आर्थिक फायदा

झाला नव्हता. १९९५ मध्येच सर्वसामान्यांना देखिल इंटरनेटवर आपली

मोफत वेबसाइट बनविता यावी यासाठी Geocities या वेबसाइटची देखिल

निर्मिती झाली जी २००९ मध्ये वार्षीक होणाऱ्या मोठ्या नुकसानामुळे बंद

करावी लागली. याच साली नेटस्केप नॅविगेटर ब्राऊझरच्या माध्यमातूनच

सर्वप्रथम जावा आणि जावास्क्रिप्ट या प्रोग्रॅम प्रणालीची ब्रेंडन इच

(Brendan Eich) याने नेटस्केप नॅविगेटरचा एक भाग म्हणून निर्मिती

केली.

१९९६ मध्ये सर्वप्रथम हॉटमेल (HoTMaiL) या ऑनलाईन मोफत ई-मेल

सेवा सुरु झाली. १९९७ मध्ये "weblog" या पहिल्या इंटरनेटवरील ब्लॉगची

निर्मिती केली गेली.

१९९८ मध्ये आजच्या जगप्रसिद्ध गूगल या सर्च सेवा पुरविणारी

वेबसाइट सुरु झाली. याच साली नेटस्केप कंपनीने सर्वप्रथम इंटरनेटच्या

माध्यमातून फाईल्सची देवाण-घेवाण करणारा प्रोग्रॅम बनविला. १९९९

मध्ये सेटी (SETI) हा प्रोग्रॅम इंटरनेटवर आला. जवळपास ३० लाख

कॉम्प्युटरना जोडलेला या प्रोग्रॅमचे काम होते परग्रहावरील सजीवांचा शोध

घेणे. इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेल्या रेडिओ टेलेस्कोप जमा झालेल्या

माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सेटी द्वारे केले जात होते.

२००१ मध्ये विकिपीडिया (Wikipedia) या इंटरनेटवरील माहितीच्या

विश्वातील मुक्तज्ञान कोष असलेल्या वेबसाइटची निर्मिती झाली. २००३

मध्ये तयार झालेल्या स्काईप (Skype) द्वारे प्रथमच इंटरनेटद्वारे आवाज

संभाषणाला म्हणजेच Voice over IP calling ला सुरुवात झाली. याच साली

MySpace आणि Linkedin या वेबसाइट सुरु झाल्या आणि खऱ्या अर्थाने

सोशल नेटवर्किंगला सुरुवात झाली.

२००४ मध्ये वेब २.० (Web 2.0) या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नविन

प्रणालीला सुरुवात झाली. याच साली म्हणजे २००४ मध्ये द फेसबुक

("The" Facebook) ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या

विद्यार्थांसाठी चालू झाले. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित

झाली. पुढे २००५ मध्ये युट्युब (YouTube) या विडिओ म्हणजेचे चलचित्र

मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरु झाली. तर

त्यानंतर २००६ मध्ये ट्विटर (Twitter) सुरु झालेल्या अजून एक

वेबसाइटने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली.

ट्विटर या वेबसाइटवर आपण १४० अक्षरांमध्ये आपला कुठलाही

संदेश/माहिती ठेवू शकता.

२००७ मध्ये ऍपल कंपनीच्या आयफोनद्वारे मोबाईल वेब प्रणाली उदयास

आली. यानंतर इंटरनेटवर दररोज नवनविन कल्पना समोर आल्या. सध्या

दिवसागणिक हजारो वेबसाइटची निर्मिती होत आहे. सर्व विषयावरील,

क्षेत्रातील, भाषांच्या, व्यक्तींच्या, कंपन्यांच्या, संस्थाच्या माहितीनी

इंटरनेटचे जग प्रसरण पावत आहे. भविष्यामध्ये हे इंटनेटचे विश्व

आकाशाप्रमाणे अनंत होईल यात शंका नाही.


संकलन:- नंदकिशोर फुटाणे