Pages

सोशल मीडिया


*सोशल मीडियाचा वापर कसा करावा*
,■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■

सोशल नेटवर्किंग साइटचा सर्वच स्तरातील लोकांकडून होणारा वापर स्वागतार्ह आहे. मात्र, "डेटा थेफ्ट‘च्या वाढत्या घटनांमुळे योग्य काळजी घेण्याची गरज आहे. मुळात इंटरनेटला सीमा नसल्याने अशा घटना वाढल्या आहेत..
📊📊📊📊📊📊📊📊📊📊 📊📊📊

   
         👇
 👇 👇
 👇


 💥 👉 संवाद वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अवश्‍य केला पाहिजे. मात्र, त्यावर फोटो किंवा अन्य खासगी माहिती ठेवणे पूर्णपणे योग्य राहणार नाही. विशेषत: फोटो अपलोड करताना हात जरा आखडता घेतला पाहिजे. तसे न झाल्यास झळकण्याची हौस भविष्यात अडचणीत आणण्याची शक्‍यता आहे.


💥 👉 सोशल मीडिया त्यात फेसबुकवरील काही अकाऊंट बनावट असतात. अशा बनावट अकाऊंटच्या माध्यमातून इतरांचे फोटो आणि अन्य काही माहिती उचलली जाण्याची भीती असते. त्यामुळे फोटो शेअर करताना सोशल मीडियावरील पर्यायांचा आधी विचार करावा. विश्‍वासार्हता असलेल्या लोकांशी ते शेअर करावेत. आपले फोटो सर्वांसाठी उपलब्ध होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यासाठी योग्य पर्यायाची निवड करावी.


💥 👉 घरातील मुला-मुलींची माहिती सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करण्याची स्पर्धाच सर्वत्र दिसून येते. ही बाब घातक आहे. या साइटच्या माध्यमातून माहिती उपलब्ध झाल्याने दिल्ली आणि नोएडामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे किमान लहान मुलांचे तरी फोटो अपलोड करू नये. सोशल मीडियावरील फोटो "क्रेझ‘ थांबवली पाहिजे. याशिवाय पिकनिक, हॉटेलिंग आणि शॉपिंगचे फोटो शेअर करू नयेत.


: 💥 👉 लोकांपर्यंत पोचण्यासाठी या माध्यमांचा वापर केला जातो. प्रोफाईल पिक्‍चर तर अनेकदा बदलले जातात. शिवाय घर आणि ऑफिसमध्ये टिपलेल्या फोटोंचा समावेश असतो. "मेटाडेटा‘चा आधार घेऊन संबंधित फोटो आणि परिसराची माहिती मिळविली जाते. तसेच स्पायवेअर आणि अन्य सॉफ्टवेअरचा वापर करून आपोआप नेमकी माहिती घेतली जाते. मुख्यत: मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून कव्हर फोटो तर अन्य लोकांकडे सहज जातो.


 💥  👉 संबंधित फोटोची संपूर्ण माहिती, विशेषत: लोकेशन मिळविण्याचे काम "मेटाडेटा‘कडून केले जाते. मूळ माहिती प्राप्त करून त्याचा प्रारूप आराखडा तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे "मेटाडेटा‘ होय.
■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■
📊📊📊📊📊📊📊📊📊📊 📊📊📊