💥*विद्यार्थी विकास*💥
*मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढविण्यासाठी काही सोपे उपाय*
👇👇👇👇👇👇👇👇
*या उपायांनी होईल समस्येपासून
सुटका*
अँड्रॉईड मोबाईलच्या इंटरनेटला स्पीड मिळत नाही म्हणून अनेकांची चिडचिड होते.अगदी कामाच्या वेळी इंटरनेटचा स्पीड कमी झाल्यास काय करावे ते सुचत नाही. अगदी ३ जी किंवा ४ जी इंटरनेट असेल तरीही योग्य तो स्पीड न मिळाल्याने आपण चिडचिड करतो . मात्र काही सोपे उपाय केल्यास या समस्येपासून नक्कीच सुटका होऊ शकते.
काय आहेत इंटरनेट स्पीड मिळविण्याच्या खास टिप्स पाहूया…
१ 💥 . *अनावश्यक अॅप करा अनइन्स्टॉल*
अनेकदा आपण त्यावेळेस आवश्यक असणारी अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करतो. मात्र नंतर ती अॅप्स अजिबात वापरत नाही. पण ज्या अॅप्सची तुम्हाला गरज नाही ती अॅप्स वेळच्या वेळी डिलिट करत राहा. मोबाईलमध्ये जास्त अॅप्स असतील तर त्याचा इंटरनेटच्या स्पीडवर परिणाम होतो.
२. 💥 *प्रिफर नेटवर्क सेट करा*
तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किती स्पीडचे इंटरनेट वापरायचे आहे हे तुम्ही ठरवू शकता. त्यानुसार तुमचा फोन ४ जी पर्यंत सपोर्ट करत असेल तर जास्तीत जास्त स्पीडचे इंटरनेट वापरल्यास तुमचे सर्फींग सोपे होईल. त्यामुळे सेटींग्जमध्ये जाऊन ३ जी आणि ४ जी नेटवर्कचा पर्याय निवडा आणि तो वापरा.
३. 💥 *फास्ट ब्राऊजर*
प्ले स्टोअरमध्ये असे काही ब्राऊजर असतात ज्यामुळे तुम्ही इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता. यामध्ये *ओपेरा मिनी*, *यूसी ब्राऊजर*, *क्रोम* यांचा समावेश आहे. याशिवाय कोणतंही अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी ते कोणत्या ब्राऊजरमधून होतंय याकडे आवर्जून लक्ष द्या.
४. 💥 *ब्राऊजर मोडमध्ये टेक्स मोड
निवडा*
ब्राऊजरमध्ये सर्फींग करताना तुम्हाला केवळ टेक्स्ट सर्च करायचा असेल आणि इमेजेसची गरज नसेल तर अॅपच्या सेटींग्जमध्ये जाऊन टेक्स मोड निवडा. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढण्यास मदत होईल.
५. 💥 कॅशे क्लिअर करा*
इंटरनेट स्पीड कमी मिळत असेल, तर कॅश मेमरी क्लिअर करा. ज्याप्रमाणे आपण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची कॅशे मेमरी क्लिअर करतो त्याचप्रमाणे मोबाईलचीही कॅशे क्लिअर करणे आवश्यक असते. कॅशे मेमरी जास्त झाली की इंटरनेटचा वेग मंदावतो, त्यामुळे वेळच्या वेळी कॅशे क्लिअर करत राहा.
*वर दिलेल्या सर्व उपायांनी होईल समस्येपासून सुटका*
साभार ! ! ! !
लोकसत्ता ऑनलाइन
संकलन....✍🏻✍🏻✍🏻
*नंदकिशोर फुटाणे*
●█║▌│║║█║█║▌║║█║●