👉 *गॅजेटस् वापरताना काय काळजी घ्यावी?*
हल्ली गॅजेटस् मय झालंय सर्वांच आयुष्य. दिवसाची सुरूवात असो की, शेवट गॅजेट शिवाय आपल्याला चैनच पडत नाही. दिवसभरात तर आपण विविध प्रकारची गॅजेट वापर असतो. कधी मोबाईल तर कधी कॉम्प्युट / लॅपटॉप किंवा इतरही हाताळतो. पण या गॅजेटस् च्या सातत्यपूर्ण वापराचा परिणाम आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे होऊ शकतो. हे आपण बहुदा विसरून जातो. म्हणून गॅजेटस् वापरताना काय काळजी घ्यावी या बाबींवर आज विचार करूयात...
1) काही व्यक्तींना मोबाईल किंवा कॉम्प्यूटरच्या स्क्रीनकडे पाहताना सतत डोळे बारीक करून पाहण्याची सवय असते. त्यामुळे डोळ्यांच्या अवतीभोवती सुरकुत्या पडू लागतात, तसेच डोळ्यांवरही सतत ताण जाणवू लागतो. त्यामुळे स्क्रीनकडे बघताना डोळे बारीक करून बघणे टाळावे. कॉम्प्युटर किंवा मोबाईल आपल्या शरीराच्या खूप जवळ ठेवणे हे टाळावे.
2) गॅजेटस् च्या अति आहारी गेल्याने निद्रनाशासारखे त्रास जाणवू शकता.
3) गॅजेटस् मधून बाहेर पडणारे रेडियोमॅग्नेटिक किरण आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. तसेच कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीनमधील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचा आणि डोळे या दोहोंना अपाय होऊ शकतो.
4) कॉम्प्युटरवर काम करताना आपण वापरतो ती खुर्ची आरामदायक असेल असे पहावे. काही व्यक्तींना दिवसभर कॉम्प्युटरवर काम करावे लागते. त्यांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. खुर्ची बसण्यास आरामदायक नसेल, तर त्याचा ताण पाठीच्या मणक्यांवर जाणवायला लागून, पाठदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो. तसेच सतत बसून काम केल्याने पायांकडे होणारे रक्ताभिसरण व्यवस्थित न होऊन, पायांवर सूज येऊ लागते. असे होऊ नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने जरासे पाय मोकळे करण्यासाठी ऑफिसमधेच किंवा घरातल्या घरात पायी चालावे किंवा लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करावा.
5) अनेक व्यक्तींना मोबाईल फोन खांद्याच्या व कानाच्यामध्ये धरून, एकीकडे काम करत बोलण्याची सवय असते. अशा पद्धतीने जास्त वेळ बोलत राहिल्यास मानेचे दुखणे उद्भवू शकते. तसेच कॉम्प्युटरवर खाली मान झुकवून काम करीत असल्यासही मानदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे कॉम्प्युटरची स्क्रीन नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असेल अशा पद्धतीने ठेवायला हवी.
6) रात्री झोपायच्या अर्धा तास आधीपासून कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा वापर करणे थांबवावे. त्याऐवजी मन शांत करणारे आपल्या आवडीचे एखादे चांगले पुस्तक वाचावे, किंवा शांत संगीत ऐकावे. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते.
वरील बाबींवर दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यास नक्कीच हानिकारक आहे. त्यामुळे शक्य तेवढाच आणि योग्य तोच गॅजेटस् चा वापर करा.