भीम ऍप
नमस्कार मंडळी! मी आज आपल्याला माझी ओळख करून
देणार आहे. माझे नाव आहे भीम. माझा महाभारतामधील
भीमाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसला तरी महाभारतातील
भीमासारखे मी सशक्त आणि ताकदवान व्हावे अशी माझ्या
जन्मदात्यांची इच्छा आहे. मला जन्माला येऊन काही महीनेच
झाले आहेत. पण माझ्या जन्मदात्यांची जी मी सशक्त होण्याची
इच्छा आहे या दिशेने माझी वेगवान घोडदौड चालु आहे. कारण
माझा जन्म होऊन काही महिनेच झाले असले तरी आत्तापर्यंत
जवळ जवळ 12 लाख लोकांपर्यंत मी पोचलो आहे. वृत्तपत्रामध्ये
आणि टिव्हीवर मी झळकत असतोच. 30 डिसेंबर 2016 ला
भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी माझे बारसे करून माझे
नाव ‘भीम’ असे ठेवले. भीम याचा अर्थ ‘भारत इंटरफेस फॉर
मनी’ (Bharat Interface for Money) असा जरी असला तरी माझे
नाव भारताचे युगपुरुष भीमराव उर्फ बाबासाहेब आंबेडकर
यांचेवरून घेतले आहे. माझ्या जन्मदात्याचे नाव आहे ‘नॅशनल
पेमेन्टस कॉरपोरेशन ऑफ इंडिया’ ( National Payments
Corporation of India). माझी माहीती सांगण्याआधी मला माझ्या
जन्माच्या वेळच्या परिस्थितीबद्दल थोडेसे सांगावे लागेल.
8 नोव्हेंबर 2016 या दिवसाची भारताच्या इतिहासात ‘अभुतपूर्व
दिवस’ अशी नोंद झाली असेल अशी माझी खात्री आहे. भारत
सरकारने 1000 रुपये 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
केल्याची घोषणा केली तो हा दिवस! हा निर्णय अत्यंत धाडसी
तर होताच पण दूरगामी परिणाम करणारा होता. आजपर्यंत
जेवढी केन्द्र सरकारे सत्तेवर आली होती त्यापैकी एकाही सरकारने
असे धाडस दाखवले नव्हते. नोटबंदीचे प्रमुख कारण म्हणजे
चलनामध्ये असलेल्या नोटांमध्ये या नोटांचे प्रमाण प्रचंड वाढले
होते. या नोटांचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग पण होत होता.
ब्लॅक मनी किंवा काळे धन साठवण्यासाठी या नोटा मोठ्या
प्रमाणावर वापरण्यात येत होत्या. पाकिस्तनसारखा आपला प्रमुख
शत्रु असलेला शेजारचा देश या प्रकारच्या नकली नोटा मोठ्या
प्रमाणावर चलनात आणून आपल्या देशाची अर्थव्यवस्था
खिळखिळी करण्याच्या प्रयत्नात होता. याला आवर घालणे
आवश्यक होते. आपल्या देशातील लोकांना चलनी नोटांमध्ये
आर्थिक व्यवहार करण्याची सवय आहे. ही सवय काही आत्ताचीच
नाही. पिढ्यान पिढ्या ही सवय चालू आहे.अगदी कोठ्यावधी
रुपयांचे व्यवहार सुद्धा रोख किंवा रोकड रकमेत होत असतात.
यासाठी मग मोठ्या प्रमाणावर नोटा उपलब्ध करून द्याव्या
लागतात. जसजशी नोटांची मागणी वाढते तस तशी नोटांची
छपाई पण वाढते. भारत हा जगात असा एकमेव देश आहे की
जेथे फार मोठ्या प्रमाणावर चलनी नोटा वापरल्या जातात. यावर
नियंत्रण ठेवणे पण आवश्यक होते. या नोटबंदीचे जे काही बरे
वाईट परिणाम झाले याचे आपण साक्षीदार आहातच!
‘कॅशलेस संस्कृती’ हा त्यावरचा एक उत्तम तोडगा आहे. कॅशलेस
संस्कृतीचा अर्थ म्हणजे प्रत्यक्षात रोख रक्कम किंवा चलनी नोटा
न वापरता आर्थिक व्यवहार करणे. नोटबंदीचा एक उद्देश
कॅशलेस संसकृतीला बढावा देणे हा पण होता. या आधी कॅशलेस
संस्कृती वापरली जात नव्हती असे नव्हे. पूर्वी चेक, डिमांड
ड्राफ्ट, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डांच्या माध्यमातून ‘कॅशलेस’
व्यवहार चालुच होते. पण याला मर्यादा होत्या. त्यातून हे
व्यवहार जास्त करून शहरी भागात होत असत पण ग्रामीण
भागात हे व्यवहार फारसे होत नसत. भारतामध्ये मोबाईल फोन-
म्हणजेच सेल फोन आणि स्मार्ट फोनचा उपयोग वाढू लागला.
आज 125 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जवळ
जवळ 105 कोटी मोबाईल फोन्स आहेत. स्मार्ट फोनची संख्याही
जवळ जवळ 45 कोटीच्या आसपास आहे. या मोबाईल फोनचा
उपयोग करून कॅशलेस व्यवहार करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
यासाठी काही ऍप्लिकेशन्स विकसीत करण्यात आली. काही
बँकांनी पे वॅलेटची कल्पना राबवली. तर पेटिएम सारख्या काही
खाजगी कंपन्या या क्षेत्रात पुढे आल्या. पण त्यांनाही मर्यादा
होत्या. ही ऍप्लिकेशन्स वापरणे सगळ्यांना सहज शक्य होत
नव्हते. तसेच त्यांना काही ना काही तरी शुल्क लागायचे. तसेच
ही ऍप्लिकेशन्स वापरण्यासाठी स्मार्ट फोन बरोबरच इंटनेट
कनेक्शनची पण आवश्यकता असायची. सर्वसाधारण माणसाला
वापरण्यासाठी सहज आणि सोपे ऍप्लिकेशन असावे अशी कल्पना
आली आणि या कल्पनेतुनच माझा जन्म झाला.
आपण अजुनही नोटांचा वापर करतच असतो. आता काही मोठे
आर्थिक व्यवहार कॅशलेस पद्धतीने होत असले तरी किरकोळ
व्यवहार-जसे की वाण्याकडून सामान आणणे, भाजिवाल्याकडून
भाजी घेणे, उडप्याच्या हॉटेलात जाऊन डोसा खाणे, चहाच्या
टपरीवर जाऊन चहा पिणे – यांसारख्या किरकोळ आर्थिक
व्यवहारांसाठी कॅशच वापरायची सवय आपल्याला आहे.
भाजीवाल्याला किंवा चहाच्या टपरीवाल्याला ‘कॅशलेस पेमेन्ट’ ही
कल्पनाच अजुनही अनेकांना अशक्यप्रायच वाटते. ही कल्पना
प्रत्यक्षात आणता येणे शक्य व्हावे हाच माझ्या जन्मामागचा
मूळ उद्देश आहे. म्हणुनच माझे नाम ‘भीम ऍप्लिकेशन’ असे
ठेवले आहे.
लोकांना, म्हणजे सर्वसामान्य माणसाला वापरायला साधे, सोपे,
सरळ आणि सुटसुटीत असे माझे स्वरूप आहे. ज्यांच्याकडे
इंटरनेट कनेक्शन नाही किंवा स्मार्टफोन नाही, साधाच मोबाईल
फोन आहे, त्यांनासुद्धा माझा वापर करणे सहज शक्य आहे.
भारताच्याच नव्हे तर जगाच्या कोणत्याही काना कोपर्या तून
माझा वपर करणे शक्य आहे अशी माझी रचना आहे. आता
माझा उपयोग कसा करता येतो ते बघूया!
1) सर्वप्रथम आपल्याला मला आपल्या फोनवर डाऊनलोड करून
घ्यावे लागेल. यासाठी ऑन्ड्राईड प्रणाली असलेला स्मार्टफोन
आणि इंटरनेट कनेक्शन लागेल. तुर्त जरी मी ऑन्ड्रॉईड
प्रणालीवर उपलब्ध असलो तरी लवकरच आय फोन आणि
विन्डोज या प्रणालींवर पण उपलब्ध होणार आहे. तुर्त आपल्याला
गुगल प्लेस्टोअरवर जाऊन मला डाऊनलोड करावे लागेल. हे
विनामुल्य उपलब्ध आहे आणि याला स्पेस पण फारशी लागत
नाही. साधारणपणे 2 ते 3 मिनीटांमध्ये हे ऍप्लिकेशन डाऊनलोड
होते. यासाठी गुगल प्लेस्टोअरच्या ऍड्रेस बारमध्ये Bhim असे
टाईप करावे.
2) भीम ऍप्लिकेशन ओपन झाले की आपल्याला कोणत्या भाषेत
व्यवहार करायचे आहेत हे विचारले जाते. तुर्त तरी इंग्रजी आणि
हिन्दी हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. लवकरच भारतातल्या
प्रमुख प्रादेशीक भाषांचा पण समावेश करण्यात येणार आहे.
आपल्याला ज्या भाषेत व्यवहार करायचा आहे त्या भाषेवर
क्लिक करावे
3) त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर रजिस्टर करावा
लागेल. जो मोबाईल नंबर आपल्या बँकेच्या अकाऊंटशी संलग्न
असेल तोच मोबाईल नंबर द्यावा लागेल. आपला मोबाइल नंबर
जर आपल्या बँक अकाऊंटशी संलग्न नसेल तर तो बँकेत जाऊन
संलग्न करून घ्यावा लागेल. कारण पुढचे सर्व व्यवहार हे या
मोबाइल नंबरच्या माध्यमातून होणार आहेत. आपल्याकडे ड्युएल
म्हणजेच दोन सिमकार्डवाला फोन असेल आणि दोन सिमकार्ड
असतील तर त्यापैकी जो मोबाइल नंबर बँकेच्या अकाऊंटशी
संलग्न म्हणजेच लिन्क्ड असेल तोच द्यावा लागेल.
4) त्यानंतर आपल्याला चार डिजीट्स असलेला ऍप्लिकेशन
पासवर्ड द्यावा लागेल. हा पासवर्ड ही आपल्या भीम
ऍप्लिकेशनची किल्ली असते. त्यामूळे हा पासवर्ड कोणालाही
द्यायचा नसतो.
5) त्यानंतर आपल्याला आपले बँक अकाऊंट लिंक करावे
लागेल.यासाठी युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेन्ट इंटरफेनस (
Unified Payment Interface) या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला जातो.
भारतातील 28 मोठ्या आणि महत्वाच्या बँका या प्लॉटफार्मशी
संलग्न आहेत. या बँकांची यादी आपल्याला आपल्या मोबाइलवर
दिसेल. या यादीत आपली जी बँक असेल त्या बँकेला क्लिक
करावे.
6) आपण आपली बँक निवडलीत की त्या बँकतील आपले
अकाऊंट माझ्या ऍप्लिकेशनशी लिंक करावे लागेत. यासाठी
आपल्या बँकेचे डेबिट कार्ड लागेल. यासाठी आपल्या डेबिट कार्डचे
शेवचे 6 डिजीट आणि एक्सपायरी डेट हि माहीती भरावी लागेल
7) आपले बँक अकाऊंट लिंक झाले की आपल्याला 4 डिजिटचा
युटीअय पिन नंबर घ्यावा लागेल. हा नंबर पण शक्यतो कुणाला
सांगायचा नाही.
आता तुम्ही भीम ऍप्लिकेशन म्हणजेच माझा वापर करण्यासाठी
तयार झालात.
माझा उपयोग हा शक्यतो पैशांच्या देवाण घेवाण करण्याइतकाच
मर्यादीत आहे. ऍप्लिकेशन ओपन गेल्यावर सेन्ड (Send),
रिक्वेस्ट ( Request) आणि स्कॅन ऍन्ड पे (Scan and pay) हे तीन
ऑप्शन्स दिसतील. त्याव्यतिरिक्त ट्रॅन्झॅक्शन, प्रोफाईल आणि
बँक अकाऊंट ही तीन भाग दिसतील. पैसे पाठवण्यासाठी सेन्ड
या ऑप्शनचा उपयोग करावा. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर
मोबाईल/ पेमेन्ट ऍड्रेस असा ऑप्शन येईल. ज्याला पेमेन्ट
द्यायचे आहे त्याचा मोबाइल नंबर टाइप करून पैसे पाठवता
येतात. फक्त ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचा मोबाइल नंबर
त्याच्या बँक अकाऊंटशी लिंक केलेला असला पाहीजे. त्याचा
मोबाइल नंबर जर बँक अकाऊंटशी लिंक केला नसेल तर
Account +IFSC हा ऑप्शन पण आहे. त्याच्या बँक अकाऊंटची
डिटेल्स भरल्यावर किती रक्कम पाठवायची आहे याची विंडो
ओपन होते. यामध्ये रक्कम टाकावी आणि त्याचे कारण पण
टाकावे. सेन्ड बटणवर क्लिक केल्यावर लगेच पैसे आपल्या
खात्यातून त्या खात्यात ट्रान्सफर होतात व आपल्याला लगेच
तसा मेसेज येतो. तसेच ट्रॅन्झॅक्शन विंडो ओपन केल्यास हा
व्यवहार झाल्याची नोंद होते. या व्यवहाराला वेळेचे बंधन नाही.
हा व्यवहार 24/7 चालू असतो. फक्त याला मर्यादा आहेत. तुम्ही
एका वेळी जास्तीत जस्त 10000 रुपये आणि 24 तासात
जास्तीत जास्त 20000 रुपये ट्रान्सफर करू शकता. पैसे
घेण्यासाठी रिक्वेस्ट हा ऑप्शन निवडावा लागतो. तसेच आपला
क्युआर कोड (QR Code) तयार होत असतो. तो स्कॅन करून पण
व्यवहार करता येतात.
ज्यांच्याकडे इंटरनेट सुवीधा नाही व साधा ऑर्डिनरी मोबाइल
फोन आहे त्यांना सुद्धा ही सुवीधा वापरता येते. यासाठी
*99#ला फोन केल्यास USSD Code ओपन होतो आणि भीम
ऍप्लिकेशनवर जे जे पर्याय उपलब्ध आहेत ते सर्व आपल्या
फोनवर दिसतात. त्या पर्यायांची निवड करून आपल्याला
व्यवहार पूर्ण करता येतात.
चला तर मग मंडळी! मी आता आपल्या सेवेसाठी तयार होऊन
बसलो आहे. जास्तीत जास्त लोकांनी माझा फायदा घेऊन मला
अधीक शक्तीशाली आणि बलवान बनवावे ही नम्र विनंती आहे.
धन्यवाद!
संकलन:-नंदकिशोर फुटाणे