Pages

व्हॉट्सअॅपने पिन चॅट

व्हॉट्सअॅपने पिन चॅट

दिवसेंदिवस सोशल मीडिया  कंपन्या आपापल्या युझर्सला आकर्षक

सेवा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. काहीही करुन आपले युझर

आपल्याला सोडून दुसऱ्या सोशल मीडियावर शिफ्ट नाही झाला पाहिजे

यावर या कंपन्यांचा कटाक्ष असतो.

 व्हॉट्सअॅप सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजरअॅप आहे.

आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन फिचर्स देण्यासाठी व्हॉट्सअॅप नेहमी

पुढे असतो. याच कारणामुळे दररोज व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या

युझर्सची संख्या वाढतच आहे. 

आता व्हॉट्सअॅपने त्यांच्या युझर्सला अजून एक नवीन फिचरची भेट

दिली आहे. या नवीन फिचर चे नाव आहे पिन चॅट. काही दिवसापूर्वी

व्हॉट्सअॅप ने त्यांच्या बीटा युझर्स साठी पिन चॅट टेस्टिंगला दिले होते.

आता मात्र व्हॉट्सअॅप ने पिन चॅट या फीचरची अधिकृत घोषणा करून

लेटेस्ट अपडेट मध्ये हे पिन चॅट फीचर अँड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध

करून दिले आहे. तुम्ही ते अपडेट डाउनलोड करू शकता. 

काय आहे पिन चॅट ?

आपल्याकडे व्हॉट्सअॅपचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे कि

आपली इच्छा नसतानाही दिवसभरात आपल्याला जवळपास शंभरहून

अधिक चॅट मेसेज येतात तर दररोज अनेक ग्रुपमध्ये आपल्याला न

विचारता अॅड केले जाते . त्यामुळे होते काय कि आपल्यासाठी जे

व्हॉट्सअॅप मेसेज किंवा ग्रुप महत्वाचे आहेत नेमके तेच ग्रुप चॅट किंवा

मेसेज खूप खाली जातात आणि या चॅटच्या गर्दीमुळे एखादा महत्त्वाचा

मेसेज पाहिला जात नाही. उदाहरणार्थ समजा तुमचा ऑफिसचा एखादा

महत्त्वाचा ग्रुप आहे जो ऑफिशिअल कम्युनिकेशनसाठी वापरला जातो

आणि एखाद्या दिवशी खूप महत्त्वाचा व्हॉट्सअॅप मेसेज ऑफिस मधून

येतो आणि या व्हॉट्सअॅप मेसेजच्या गर्दी मुळे नेमका तोच मेसेज

पाहिला जात नाही आणि तुम्हाला वरिष्टांचे एकूण घ्यावे लागते. 

 किंवा दुसरे उदाहरण म्हणजे जर तुमचा नातेवाईकांचा एखादा

व्हॉट्सअॅप ग्रुप आहे आणि एखाद्या  महत्वाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण

पाहायचे राहून जाते आणि तुम्हाला नातेवाईकांचे बोलणे ऐकून घ्यावे

लागते. आता व्हॉट्सअॅप ने यावर जालीम उपाय शोधला आहे. आता

व्हॉट्सअॅपने पिन चॅट हे एक नवीन फिचर अँड्रॉइड धारकांसाठी आणले

आहे. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तीन ग्रुप किंवा व्हॉट्सअॅप युझर्सला

पिन करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रुप किंवा युझर्सला पिन करता

तेव्हा हे ग्रुप किंवा युझर्स लिस्टमध्ये सर्वात वर येतात म्हणजेच या पिन

केलेल्या ग्रुप किंवा युझर्सचे मेसेज आधी पाहिल्या जातील. म्हणजेच

महत्त्वाचे मेसेज पाहिले नाही असे होणार नाही. या फिचरला पिन चॅट

असे म्हणतात. 

 कसा वापर करणार ?

पिन चॅट या फिचर चा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे

व्हॉट्सअॅप अपडेट करून घ्यावे लागेल. व्हॉट्सअॅप अपडेट झाल्यानंतर

जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप ओपन कराल तेव्हा ज्या महत्त्वाच्या ग्रुप किंवा

व्हॉट्सअॅप युझर्सला तुम्हाला पिन करायचे आहे त्यावर टॅप करा.

त्यानंतर वरील बाजूस पिनचा सिम्बॉल दिसेल त्यावर क्लिक केले कि

झाला तो ग्रुप किंवा युझर्स पिन. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादा ग्रुप

किंवा युझर्स अनपिन करायचा असेल तर परत त्यावर टॅप करा आणि

वरच्या अनपिन सिम्बॉलला क्लिक केलं कि झालं. आहे ना एकदम

कामाचे  फिचर .


संकलन :- नंदकिशोर फुटाणे