Pages

साद



साद

दुरुन येते साद

उन्मादल्या प्रणयाची

उले अंतरात आस

भाकरीच्या मिलनाची.


कुठे मोगरा फुलला

फुलल्या जाईजुई;

चंद्र तव्यावर माझा

आहाराते इथे आई.


तुझ्या आरक्त नेत्रात

जस चांदण हसल;

इथं माझ्या सदनात

पोर उघड हसल.


सपनात गुलाबाच्या

ओठ गुलाबी हसले;

माझ्या तळ्यात त्याचे

काटे नाजूक रुतले.



नंदकिशोर फुटाणे