Pages

कठीण परिस्थिती



   💥*विद्यार्थी विकास*💥                    ➖➖➖➖➖➖➖ 
         👇
 👇
 👇 👇


👉 _*कठीण परिस्थिती हाताळताना...*_


आजच्या धावपळीच्या आयुष्यात नकळत तणावाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात शिरकाव केलाय. ताण-तणावावर कशी मात करावी? याविषयावर मार्गदर्शन करणाऱ्यांची संख्या कमी नाहीय, पण प्रत्यक्ष आयुष्यात वागताना मात्र, कठीण परिस्थिती कशी परिपक्वपणे हाताळावी हे कोणीच सांगत नाही. या गोष्टींकडेच दुर्लक्ष केल्याने आयुष्यात आपल्याकडून सुधारता न येण्यासारख्या चुका होतात.

हल्ली कुटुंब, करिअर, रिलेशनशीप, नोकरी, व्यवसाय यातूनच कठीण परिस्थिती निर्माण होताना दिसते. अशी कठीण परिस्थिती टाळणे अशक्य आहे. मात्र अशात एक चुकीचा निर्णय, घाईघाईत घेतलेला निर्णय आयुष्याची दिशा बदलणारा ठरतो. त्यामुळे निर्णय योग्य आणि विचारपूर्वक घेणे आवश्यक असते. तुमच्या आयुष्यात आलेला कोणताही कठीण प्रसंग हा कायमस्वरुपी नसतो हे लक्षात घ्या. म्हूणन अशी परिस्थिती कशी हाताळावी याबद्दल थोडंस...


👉 _*भेटा आणि चर्चा करा*_ : तुमच्या दृष्टीने समजा रिलेशनशीप,  ब्रेकअपवरून काही समस्या असतील तर यासंदर्भात मार्गदर्शन करणारे काही ग्रुप्स (समूह) आपल्या आसपास कार्यरत असतात, त्यांची माहिती घेऊन त्यांना भेटा. तुमच्या समस्येविषयी चर्चा करा. त्यातून ही समस्या तुमच्या एकट्याची नाही, हे कळेल. अशा परिस्थितीतून बाहेर पडलेल्या अनेक व्यक्ती येथे भेटतील. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. तुमच्या मनातील एकटेपणाची भिती कमी होईल.

👉 _*कुटुंब आणि मित्रपरिवाराची मदत घ्या*_ : एखाद्या आर्थिक संकटातून किंवा भावनिक गुंतागुंतीमध्ये अडकलेले असाल तर, अशावेळी कुटुंब किंवा मित्रपरिवाराची मदत घ्या. कुटुंबातील सदस्य, मित्रांकडे छोटीशी मदत मागून या समस्या सोडवू शकता. मात्र या समस्येतून बाहेर पडल्यावर प्रामाणिकपणे त्याची परतफेड करायला विसरू नका.

👉 _*व्हर्च्युअल विश्वाची मदत घ्या*_ : तुमच्या समस्या कुटुंब किंवा मित्रांसमोर मांडायला संकोच वाटत असेल तर व्हर्च्युअल विश्वातील काही समूह (ग्रुप्स) ची मदत घेऊ शकता. सोशल मीडियावरील अशा ग्रुप्सवर तुमचे नेहमीच स्वागत असते. उदा. तुमची नोकरी गेली असेल तर लिंक्डईनसारख्या सोयी आहेत. ज्यातून तुम्ही ऑनलाईन मित्रांच्या मदतीने नोकरीच्या संधी शोधू शकता.

👉 _*मूव्ह ऑन करा*_ : आपल्या आयुष्यात कोणत्याच गोष्टी सरळ होत नाही. म्हणून रडत बसण्यापेक्षा ही परिस्थिती स्विकारून त्यावर मात करून पुढे जायला शिका. तसेच पुढे येणाऱ्या कठीण प्रसंगांना तोंड देण्याची तयारी ठेवा. तरच तुम्ही आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर सक्षमपणे परिपक्वतेने मात करू शकाल.

👉 _*नव्या पर्यायांचा विचार करा*_ : प्रत्येक समस्येवर एक तरी उपाय असतोच, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे नैराश्येत जाण्याची काही गरज नाही. यापेक्षा नव्या पर्यायांचा विचार करा. पूर्वी ज्या चुका झाल्या त्या कशा टाळता येतील याचा विचार करा.

👉 _*हास्योपचार*_ : सर्व समस्यांवर एक मोठा आणि परिणामकारी उपचार म्हणजे हास्योपचार. कितीही कठीण प्रसंग असू द्या हसायला शिका. कठीण प्रसंगातून आलेल्या ताणावर मात करण्यासाठी हास्य उपचार अगदी रामबाण औषध आहे.