Pages

कमलकंद



कमलकंद

भिंतीच्या आडोश्याला 
बघुनी सुमनाचे झाड ,
मनी हर्षुनी गेलो,
अल्पावधीत उरी उचलुनी ;
मोठ्या जोमाने घरी 
त्याला लावायास गेलो;
सुंदर स्थळ शोधूनी 
त्याला घरी लाविले
सुखद हस्तस्पर्शाने 
तेही लीलया फोफावले.
रामप्रहारी मी 
उठुनी बघतो तर .......
गर्भवतीप्रमाणे 
तेही टपोरुनी गेले .
दुसऱ्या दिवशी बघतो तर ....
कुणीतरी ते फुलायच्या आधी
स्वहस्ताने   खुडूनी   नेले !!!
ते बघुनी मी 
दीनवाणा झालो .
मी  स्वंय वेडापीर  ठरलो.
माझ्या अर्धोन्मित नयनातुनी
गंगा जमुना ह्या निघाल्या .



      नंदकिशोर फुटाणे