Pages

महात्मा गांधी



👉 _*महात्मा गांधीजींविषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहेत का?*_


भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले, अशा थोर नेत्यांमध्ये महात्मा गांधीजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. इंग्रजांना विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्वीकारले. कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्द बळाने इंग्रजस्त्ताधीशांना विरोध केला मात्र महात्मा गांधींनी सत्याग्रहाने व अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांना नमविले. अशा या थोर व्यक्तीच्या जन्मदिनी भारतात गांधी जयंती तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो. म्हणून आज बापूंच्या जयंती निम्मित त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊयात...


👉 शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी गांधीजींचे नाव पाच वेळा नोबेल समिती समोर आले होते. मात्र त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला नाही. गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांना नोबेल पुरस्कार न मिळाल्याची खंत पुरस्कार समितीने व्यक्त केली होती.

👉 महात्मा गांधी यांची अंतयात्रा ही 8 किलोमीटर लांब होती. जवळजवळ 10 लाख लोकं अंतयात्रेत सहभागी झाले होते.

👉 गांधीजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रसिद्ध व्यक्तींना पत्रे लिहीली आहेत. यात हिटलर, टॉल्सटॉय आणि आइन्स्टाइन यांचा समावेश आहे.

👉 भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या संविधान सभेत पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणादरम्यान गांधीजी उपस्थित नव्हते.

👉 महात्मा गांधीजींच्या मृत्यृवेळी त्यांनी परीधान केलेले कपडे आजही संग्रालयात सुरक्षीत ठेवण्यात आले आहेत.

👉 अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव जॉब्स यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा पगडा होता. गांधीजींना सन्मान देण्यासाठी ते गोल फ्रेमचा चश्मा वापरत.

👉 महात्मा गांधी केवळ राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ व प्रसिद्ध वकील होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता.

👉 महात्मा गांधी यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेतली. नेल्सन मंडेलांपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहेत.