कारण देऊ नका
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
👉 _*’कारणं’ देणाऱ्यांना चपखल ’उत्तर’ (भाग-2)*_
👇
👇 👇
👇
जीवनात अपयश येणं चुकीच नाही. पण प्रयत्नच न करणं हे मात्र चुकीचं आहे. वेळोवेळी कारणं देवून वेळ निभावून नेणारी माणसे आपण पाहिलीच असतील. ती नेहमी माझ्याकडे ‘काय कमी’ आणि दुसऱ्याकडे ‘काय जास्त’ यातच मशगुल असतात. अशा विचासरणी त्यांना जीवनात पुढे जावू देत नाही. जीवनात अनेक उणीव असताना त्याचा विचार न करता यशाचं शिखर सर करणाऱ्या व्यक्ति कोण आहेत? ते जाणून घेऊयात...
👉 _*कारण*_ : माझ्याकडे असलेल्या छोट्या नोकरीत मी काहीही करु शकत नाही.
_*उत्तर*_ : रिलायन्स उद्योगसमूहाचे जन्मदाते धीरुभाई अंबानी पेट्रोल पंपावर तेल भरण्याची लहानशी नोकरीच करायचे. त्यांनी पुढे मिळवलेले यश आपल्याला माहिती आहेच.
👉 _*कारण*_ : मला वर्गात काहीच येत नाही.
_*उत्तर*_ : जगाला सापेक्षतावादाचा सिध्दांत देणारे अल्बर्ट आईनस्टाईन यांना तर अभ्यासात अजिबात गती नव्हती.
👉 _*कारण*_ : मी अपंग आहे.
_*उत्तर*_ : प्रसिध्द नृत्यांगणा सुध्दा चंद्रन कृत्रिम पायाने नाचून यशस्वी झाल्या. जेसिका कॉक्सला हात नव्हते. तिने पायाने विमान उडवले. शरीरात हालचाल करण्याची क्षमता नसताना स्टीफन हॉकिंग फार मोठे संशोधक झाले. मार्क इंग्लिसला पाय नव्हते व अरुनिम्मा सिन्हाला अपघात पाय गमवावे लागले होते. ते दोघेही जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर चढले.
👉 _*कारण*_ : लहानपणीच माझे वडील वारले.
_*उत्तर*_ : ऑस्करविजेते संगीतकार ए. आर. रहमान यांच्या लहानपणीच त्यांचे वडील वारले होते. लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी त्यांना सांभाळावी लागली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सुध्दा त्यांच्या बालपणी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागली होती.
👉 _*कारण*_ : मला इंग्रजी येत नाही.
_*उत्तर*_ : प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीचा फार वापर करत नाही. तरीही ते यशस्वी आहेत.
👉 _*कारण*_ : माझे शरीर खूप मोठे आहे.
_*उत्तर*_ : एकेकाळी अदनान सामीची ओळख त्याचे मोठे शरीर होते. आज त्याचा फिटनेस पाहून सर्वच अचंबित होतात.
👉 _*कारण*_ : मी फारच किडकिडित आहे.
_*उत्तर*_ : महम्मद अली सुध्दा शरीराने किडकिडित होते. तरीही ते सात वेळा बॉक्सिंगचे विश्वविजेते झाले.
👉 _*कारण*_ : मला कुणाचा वरदहस्त (गॉडफादर) नाही.
_*उत्तर*_ : वरील सर्व उदाहरणातील एकाही व्यक्तीला कोणीही वरदहस्त नव्हते.
वरील उदाहरणे पाहिली तर कळते की, या लोकांनी आपल्या कमजोरीवर मात करुन यश मिळवले आहे. आपल्याकडे जे नाही त्याची ते व्यथा करत बसले नाहीत. जे आहे त्यात बेस्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून आज त्यांचे नाव घेतले जाते. ग्रामीण, गरीब, श्रीमंत अशा सर्व प्रकारची माणसे यशस्वी होतात. ती शक्ती निसर्गाने त्यांना दिलेली आहे. त्या शक्तीला साकार करण्यासाठीचे मार्ग सापडले की झालं.
📊📊📊📊📊📊📊📊📊📊