Pages

यशस्वी होण्यासाठी




👉 *यशस्वी होण्यासाठी शिव खेरा यांच्या खास टिप्स*

यश आणि अपयश यावर विद्वानांनी बराच अभ्यास केला आहे. यशस्वी आणि कर्तबगार माणसांच्या आयुष्याचा इतिहास तपासला तर त्यात त्यांच्या यशाचे रहस्य सापडते. जगातील यशस्वी लोकांमध्ये काही विशिष्ट समान गुण असतात, मग ते कोणत्याही काळातील आणि देशातील असोत. यशाचे धागेदोरे शोधून यशस्वी व्यक्तींचे गुण अंगीकारले तर आपणही त्यांच्यासारखेच यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी शिव खेरा यांच्या खास टिप्स...



👉 _*जे कराल, ते उत्तम करा*_ : विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसऱ्या कुणाशी आहे. जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे.

👉 _*इन्व्हॉल्व व्हा*_ : आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.

👉 _*थोडंसं एक्स्ट्रा*_ : लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त काम करण्याची तयारी ठेवा. जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळंच करतात, तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा करणार की नाही हे ठरवा.

👉 _*भूमिका घ्या*_ : सगळंच गोलमाल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. त्यापेक्षा निष्ठा ठेवा, भूमिका घ्या आणि त्यावर ठाम रहा.

👉 _*फोकस*_ : तुमचं लक्ष काय, तुम्हाला नक्की काय हवंय, हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.

👉 _*मित्र जरा जपून निवडा*_ : नेता  चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात, हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून जरा मित्र चांगले आणि जपून निवडा.

👉 _*स्वत:वर भरवसा ठेवा*_ : असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा.

👉 _*कॅरॅक्टर जपा*_ : एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच.  त्यामुळे आपली रेप्युटेशन काय तयार होतेय याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.

👉 _*जगायचं कशासाठी?*_ : विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.

👉 _*दिवसाची सुरुवात आनंदी*_ : उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वत:ला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.


■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■