*गुगल ग्लास उपकरण काय आहे?*
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■
👇
👇 👇
👇
गुगल ग्लास हे उपकरण गुगलने तयार केलं असून ते बाजारात येण्याच्या तयारीत आहे. यानं कम्प्युटरविश्वातच नव्हे, तर एकंदरीतच समाजामध्ये खूप धूम माजण्याची शक्यता आहे. त्याच्या फायद्यातोट्यांवर आजपासूनच प्रचंड वादळ जगात आलंय. यातून असंख्य खटले, वाद, मारामाऱ्या, संशय अशा अनेक गोष्टी उद्भवणार असल्यामुळे प्रचंडच खळबळ माजणार आहे. गुगल ग्लासच्या लॉचिंगच्या नुसत्या बातमीनं सर्व जगभरात प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय.
*डोळ्यावर घालायचा एक चश्मा*
□■□■□■□■□■□■□■□ □■□■□■□
गुगल ग्लासमुळे तुमच्या अपॉईंटमेंटस् लक्षात ठेवण्याची सोय असेल, सोशल नेटवर्किंग साईटवरच्या मेसेजेसचे लगेच अॅलर्ट मिळतील, प्रत्येक वळणासकट दिशा कळेल, हवामानाची आणि ट्रॅफिकची माहिती कळेल, फोटो आणि व्हिडिओ काढून शेअर करता येतील. न्यूयॉर्क टाईम्स सारख्या अॅप्लिकेशन्समुळे वर्तमानपत्रातली हवी ती बातमी, चित्र दिसू शकतं. व्हॉईस रेकग्निशन सॉफ्टवेअर वापरून तुम्ही बोलाल त्याचं क्षणार्धात भाषांतर होऊन तो मेसेज दुसऱ्याकडे जाऊ शकेल. तसेच ऐकलेले शब्द तुमच्या भाषेत अनुवाद होऊन ऐकू येऊ शकतील. फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेअर आणि सोशल नेटवर्किंग वापरून तुम्ही नुकत्याच भेटलेल्या अनोळखी व्यक्तीचं कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवरचं पब्लिक प्रोफाईल क्षणार्धात पाहू शकाल. तसंच गुगल सर्च करता येईलच, व्हिडिओ चॅटमध्ये भाग घेता येईल आणि भोवतालच्या आजूबाजूच्याच काय पण जगातल्या कितीतरी ठिकाणांवरची माहिती आपल्याला उपलब्ध करून बघता येईल. गुगल ग्लासची ठळक अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे तो सहजपणे डोळ्यांवर वापरता येईल असा आहे. सध्याच्या अँड्रॉईड स्मार्टफोन आणि टॅबलेटचं पुढचं विस्तारित रुप आहे. संपूर्ण दिवसभरात हातही न लावता आपण त्याच्या मदतीने वेगवेगळी अनेक कामं पार पाडू शकतो. गुगल ग्लासमुळे एखादा फोटो, चित्र किंवा दृश्य ४ जीबीच्या मर्यादेपर्यंत शूट करुन साठवलं जाऊ शकतं. ही व्हिडीओ क्लिप किंवा फोटोज सोशल नेटवर्किंग किंवा इ-मेलद्वारा पाठवता येतो. गुगल आणखी एक गंमत म्हणजे आपल्याला आलेले एसएमएस किंवा इ-मेल्स आपण पाहू शकतो आणि आपल्या आवाजात त्याचं उत्तरही देऊ शकतो. आत्ता ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती गुगल ग्लासद्वारा आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. आपण फक्त त्याला तोंडी प्रश्न विचारला, की गुगल ग्लास इंटरनेटवर त्या प्रश्नाचे उत्तर शोधून आपल्याला त्या ग्लासवरच्या पडद्यावर उमटून देईल. उदा. आपण शनिवारवाड्यासमोर उभं असताना प्रश्न केला की 'शनिवारवाडा कधी बांधला होता?' आपल्याला शनिवारवाड्याचा संपूर्ण इतिहास गुगल ग्लास देईल. कुठेही जायचे असेल तरी प्रवासात लागणाऱ्या नकाशाची गरजच उरणार नाही. गुगल ग्लास ती माहिती शोधून आयत्या वेळी देईल. गुगल ग्लासने त्या माणसाला संपूर्ण जग कसं आहे हे दाखवलं जाऊ शकेल. आपलं रोजचं रुटीन पाहून तोच रोजच्या प्रवासापासून ते ऑफिसमधल्या अनेक कामात तो आपल्याला मदत करेल. म्हणजे वाहतूक किती आहे, कुठल्या मार्गाने जाता येईल वगैरे अनेक गोष्टित तो मार्गदर्शन करेल. गुगल ग्लासचा सगळ्यात कहर म्हणजे आपण परदेशी जाणार असू, तर त्या त्या भाषेचा अनुवाद आपल्या भाषेत करुन तो आपली अडचण सोडवू शकतो.
मात्र या वस्तूबद्दल अनेकांची परस्परविरोधी मतंही आहेत. डेव्हिड ॲस्प्रे या इंटरनेट सिक्युरुटी तज्ज्ञानं याबाबत नाराजी व्यक्त केलीय. युजरनं गुगल ग्लास वापरून गोळा केलेली माहिती जर त्यानं पब्लिकला उपलब्ध करून दिली तर गुगल सर्च केल्यावर ती माहिती इतरांना दिसू शकेल. मात्र यामुळे गुगलकडे युजरनं मिळवलेल्या माहितीवर जास्त नियंत्रण करण्याची क्षमता येईल. लोकांच्या प्रायव्हसीवर गुगल ग्लास अतिक्रमण करेल अशी भीती व्यक्त होते आहे. फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेअरमुळे आपल्याला माहिती नसणाऱ्या लोकांना गर्दीत देखील फेस रेकग्निशननं सोशल साईट वापरून ओळख काढता येईल. लोकांचं संभाषण त्यांच्या मर्जीविरूद्ध रेकॉर्ड करता येईल. गुगल या ग्लासवरून जाहिरातबाजी करू शकेल. उदाहरणार्थ, गुगल ग्लास वापरणारी व्यक्ती जिथे जाईल, जे पाहिल ती माहिती ते गोळा करून गुगल त्या अनुषंगानं युजरला जाहिराती दाखवेल. एकंदरीतच तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक हित किंवा नैतिकता यांचा प्रश्न दिवसेंदिवस आणखीनच वाढत जाणार आहे. याचं कारण म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती ही भयानक वेगानं सध्या होते आहे. ऑल्व्हिन टॉफ्लर मानवी इतिहासाचे तीन भाग मांडतो. शेती, उद्योग आणि सेवा. शेतीच्या काळातल्या अनेक दशसहस्त्रकांमध्ये जेवढी प्रगती झाली नव्हती, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रगती औद्योगिक क्रांतीनंतरच्या उद्योगविश्वातल्या काही शतकांमध्ये झाली. तसंच सेवाक्षेत्र ज्या काही गेल्या दशकात झपाट्यानं वाढलं, त्यात तंत्रज्ञानाची जी काही प्रगती झाली, ती उद्योगातल्या काही शतकांच्या प्रगतीपेक्षा आणि शेतीच्या काही दशसहस्त्रकांच्या प्रगतीपेक्षा अनेक पटीनं जास्त होती. थोडक्यात, गेल्या तीन दशकात माणसानं तंत्रज्ञानात जेवढी प्रगती केली, तेवढी प्रगती जवळपास आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात झाली नव्हती. हा ट्रेंड लक्षात घेता माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांवर आणि रक्तासारख्या अनेक घटकांवर दर क्षणाला नियंत्रण ठेवणारे आणि त्यात कुठेही काही बिघाड आढळल्यास त्याची सूचना देणारे नॅनोरोबोज, वार्धक्यावर, तसंच कॅन्सर, एड्स, अल्झामयर अशा गोष्टी या शतकात होण्याची बरीच शक्यता आहे.
■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■
📊📊📊📊📊📊📊📊📊📊 📊📊📊