Pages

स्टॅटीक वेबसाइट तयार कशी होते?

स्टॅटीक वेबसाइट तयार कशी होते?

स्टॅटीक वेबसाइट तयार कशी होते?

वेबसाइट बनविण्यासाठी वेबसाइट बनविण्याचा म्हणजेच वेबसाइट

डेव्हलपमेंटचा कोर्स शिकविला जातो. सध्या जवळजवळ सर्वच कॉम्प्युटर

शिकविणाऱ्या क्लासेसमध्ये हा कोर्स शिकविला जातो. या कोर्समध्ये फोटोशॉप,

ड्रीमव्हीवर, फ्लॅश, जावस्क्रिप्ट इ. गोष्टी शिकविल्या जातात.

फोटोशॉप या सॉफ्टवेअरमध्ये वेबसाइट डिझाईनिंग केली जाते म्हणजेच वेबसाइट

कशी असावी, त्यामध्ये रंगसंगती कशा असाव्यात, त्यामध्ये कुठले विभाग असावेत,

चित्रांना तसेच अक्षरांना सावळी (shadow), उजळपणा (glow) म्हणजेच इफेक्ट कसे

असावेत इ. गोष्टी दिल्या जातात आणि वेबसाइट आकर्षक बनविली जाते.

फोटोशॉप या सॉफ्टवेअरमध्ये वेबसाइटची तयार केलेली डिझाईन मग ड्रीमव्हीवर या

सॉफ्टवेअरमध्ये आणली जाते. म्हणजेच फोटोशॉपमधिल वेबसाइटची एका

चित्रास्वरुपामध्ये असलेल्या प्रतिकृतीमधिल निरनिराळ्या अनेक चित्रे तसेच

बटणांनामध्ये आवश्यकतेनुसार निरनिराळे विभागून त्यांना ड्रीमव्हीवर या

सॉफ्टवेअरमध्ये एक पान तयार करुन त्यामध्ये पून्हा एकत्र आणले जाते मग

पानाला ड्रीमव्हीवरमध्ये साठविले जाते म्हणजेच सेव्ह केले जाते. ड्रीमव्हीवर या

सॉफ्टवेअरमध्ये साठविलेले पान हे वेबपेजच्या स्वरुपात साठविले जाते. म्हणजेच

वेबपेजचा सर्वसाधारण नमुना असलेल्या एचटीएमएल या स्वरुपामध्ये साठविले

जाते. याच ड्रीमव्हीवर सॉफ्टवेअरमध्ये मग आपण बनविलेल्या त्या वेबपेजच्या

प्रामाणे अनेक वेबपेज बनविले जातात तसेच त्यामध्ये त्या-त्या वेबपेजमध्ये

असलेली माहिती भरुन त्या बनलेल्या अनेक वेबपेजना लिंकद्वारे एकमेकांना जोडले

जाते. लिंकद्वारे जोडल्यामुळेच आपण एखादी वेबसाइट बघताना एका वेबपेजवरुन

दुसऱ्या वेबपेजवर जाण्यासाठी त्या लिंकवर माऊस नेल्यानंतर ब्राऊझरमध्ये हाताचे

चित्र येते ज्यावर माऊसने क्लिक करुन आपण दुसऱ्या वेबपेजवर जातो.

आतापर्यंत आपले चित्र असलेले एक सर्वसाधारण पण आकर्षक वेबपेज तयार

झालेले असते आता पुढील गोष्ट म्हणजे या स्थिर चित्रांच्या स्वरुपात असलेल्या

वेबपेजमध्ये अ‍ॅनिमेशन भरणे. अ‍ॅनिमेशनचे उदाहरण सांगायचे झाल्यास आपण

इंटरनेटवर वेबसाइट बघताना बऱ्याच वेबसाइटवर जाहिरातींमध्ये चित्रे अथवा अक्षरे

हलताना, इथूनतिथे जाताना पाहिले असेलच त्यांनाच अ‍ॅनिमेशन असे म्हणतात.

फ्लॅश सॉफ्टवेअरमध्ये वेबसाइटमधिल अ‍ॅनिमेशन बनविले जाते. एखादे वेबपेज

तयार झाल्यानंतर त्या वेबपेजमध्ये आपल्याला हव्या असलेल्या आकारानुसार फ्लॅश

सॉफ्टवेअरमध्ये त्या आकारामध्ये बसेल असे अ‍ॅनिमेशन बनविता येते. फ्लॅश

सॉफ्टवेअर प्रामुख्याने २डी (2D) अ‍ॅनिमेशन बनविण्यासाठी वापरले जाते. तर फ्लॅश

सॉफ्टवेअरमध्ये अ‍ॅनिमेशन बनविल्यानंतर मग ते पून्हा ड्रीमव्हीवरद्वारे आपण

बनविलेल्या वेबपेजमध्ये टाकले जाते.

सर्वसाधारणपणे इथे एखादी वेबसाइट बनवून पूर्ण होते.

परंतू या पुढे आपण त्या बनलेल्या सर्व वेबपेजमध्ये जावास्क्रिप्ट नावाचा प्रोग्रॅम

टाकून आपल्या वेबपेजला अधिक आकर्षक आणि अद्ययावत करु शकता.

वेबपेजच्या अंतर्गत असलेल्या एचटीएमएल प्रोग्रॅममध्ये जावास्क्रिप्ट प्रोग्रॅम टाकला

जातो. वेबपेजमधिल बटणांवर माऊसनेल्यावर अधिक बटण येणे यालाच मेनूबार

असे म्हणतात तसेच चित्र बदलत राहणे यालाच फोटो गॅलरी इ. अनेक प्रकारे

वेबपेज चांगले बनविण्यासाठी जावास्क्रिप्टचा उपयोग होतो. वेबसाइटमधिल

जावास्क्रिप्टसाठी कुठलेही सॉफ्टवेअर वापरले जात नाही, तर अनेक वेबसाइटवर

जावास्क्रिप्टचे छोटे प्रोग्रॅमद्वारे अगदी मोफत उपलब्ध असतात. आपल्याला हव्या

असलेल्या आकर्षक जावास्क्रिप्टच्या त्या छोट्या प्रोग्रॅमला आपल्या वेबपेजमध्ये

कॉपी केल्यानंतर लगेचच तो आकर्षक इफेक्ट आपल्या वेबपेजवर दिसू लागतो.

अजूनही पुढे जर आपल्याला आपल्या वेबपेजमध्ये मराठी, हिंदी अथवा अन्य

कुठल्या भाषेमधिल मजकूर टाकायचा असेल तर त्या नुसार इतर निराळे

सॉफ्टवेअरवापरुन इतर भाषांमधिल वेबसाइट बनविता येतात (कॉम्प्युटरवर मराठी

टाईप कसे करावे या माहितीसाठी इथे क्लिक करा.)

आता शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये तयार झालेली संपूर्ण वेबसाइट

(म्हणजेच त्याची सर्व वेबपेजेस) एफटीपी (FTP) सॉफ्टवेअरद्वारे सर्व्हरवर टाकणे

म्हणजेच अपलोड करणे.

सध्या वेबसाइट विकत तसेच मोफत देखिल मिळते. सहाजिकच विकत तसेच

मोफत वेबसाइटमध्ये काहितरी तफावत नक्कीच असते. जसे माझे नाव सचिन

पिळणकर आहे आणि मला www.sachinpilankar.com अशी वेबसाइट हवी असेल

तर मला त्यासाठी पैसे द्यावे लागतील कारण वेबसाइटच्या नावानंतर शेवटी

लगेचच .com, .org, .net, .co.in अथवा .in हवे असल्यास तसे नाव पैसे देऊन विकत

घ्यावे लागते. तर मोफत मिळणाऱ्या वेबसाइट या खरंतर आधीच तयार असलेल्या

वेबसाइटवर त्यांच्या नावानुसार ओळखल्या जातात. जसे मला sachinpilankar या

नावाने मोफत वेबसाइट हवी असेल तर www.pubwebhost.com सारख्या वेबसाइट

वर मी मोफत वेबसाइट घेऊ शकतो. पण मग ही मोफत वेबसाइट असल्याने

माझ्या वेबसाइटचे नाव www.sachinpilankar.pubwebhost.com असे असेल.

म्हणजेच मला हव्या असलेल्या वेबसाइटच्या नावाच्या शेवटी मी ज्या

वेबसाइटकडून मोफत वेबसाइट घेतली असेल त्या वेबसाइटचे नाव असेल.

शेवटी आपण विकत अथवा मोफत वेबसाइट घेतल्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे मग

एफटीपी (FTP) सॉफ्टवेअरद्वारे आपल्या वेबसाइटच्या युजरआयडी (UserID) आणि

पासवर्डने (Password) आपण तयार केलेली सर्व वेबपेजेस त्या आपल्या वेबसाइटवर

अपलोड करु शकतो.

बस्स…इतकेच करायचे आहे आणि आपली वेबसाइट जगभरातून कुठूनही दिसू

लागते !


संकलन :- नंदकिशोर फुटाणे