💥 *विद्यार्थी विकास* 💥
👇
👇 👇
👇
👉 *इंटरव्ह्यू; नेहमी विचारले जाणारे प्रश्न...*
हल्ली वाढत्या स्पर्धेमुळे नोकरी मिळवणे मोठे आव्हान बनलंय. बहुतेक ठिकाणी इंटरव्ह्यू तुमचे नोकरी मिळविण्याचे प्रवेशद्वार असतो. पण अशा इंटरव्ह्यूची आपण तयारी कशी करतो? हे तितकेच महत्वाचे असते कारण इंटरव्ह्यूचे आव्हान पार केल्यावर जवळपास आपली नोकरी निश्चित असते. मात्र इंटरव्ह्यू ठीक न झाल्याने अनेकदा पात्रता असूनही नोकरी मिळत नाही. चला तर मग तुमचं इंटरव्ह्यूच टेन्शन हलकं करण्यासाठी इंटरव्ह्यू दरम्यान विचारले जाणाऱ्या प्रश्नांना जाणून घेऊयात...
1) तुमच्यासाठी यश काय आहे? चांगला पगार, चांगली नोकरी की आणखी काही?
2) आम्ही तुम्हाला ही नोकरी का द्यावी?
3) तुम्हाला या कंपनीकडून काय अपेक्षा आहेत?
4) तुम्हाला ही नोकरी का करायची आहे?
5) तुमचे आदर्श कोण? तुम्ही कोणामुळे सर्वाधिक प्रभावित झालात?
6) तुम्ही भविष्यात स्वतःची कंपनी उघडली तर त्यासाठी काय प्लॅन असेल?
7) स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर त्याची मू्ल्ये काय असतील? कोणतीही तीन मूल्ये सांगा.
8) नोकरीदरम्यान ऑफिसमध्ये मैत्री करण्यावर तुमचा विश्वास आहे का?
9) कोणते गुण तुम्हाला आत्मसात करायला आवडतील?
10) तुम्ही आम्हाला काय शिकवू शकता?
या आणि इतर काही बेसिक प्रश्नांची तयारी इंटरव्ह्यू पुर्वीच करा. या प्रश्नांची आत्मविश्वासपूर्ण उत्तरे तयार ठेवा. यातूनच तुमच्या बुद्धिमत्तेचे दर्शन होईल आणि तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढतील...!