Pages

PAN CARD





पॅनकार्ड म्हणजे काय?

परमनंट अकाउंट नंबर (पॅन (PAN)
पॅन कार्ड हा आयकर भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे,
भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी
मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक
असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतो. कार्डावर नागरिकाचे
छायाचित्रही असते. हे कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणूनदेखील मान्य केला जातो.
यावरील संकेतांक कसा ठरविल्या जातो :
पॅनचे उदाहरण : ARLPA0061H. यात सुरुवातीला AAA पासून ZZZ पर्यंतची कोणतीही तीन मुळाक्षरे असतात.
चौथे मुळाक्षर कार्डधारकाची जातवारी सांगते. ती अशी :
कार्डधारक ही एक संघटना असेल तर चौथे मुळाक्षर A असते.कार्डधारक जर लोकांचा गट असेल तर चौथे
मुळाक्षर B असते.कार्डधारक जर कंपनी असेल तर चौथे मुळाक्षर C असते.कार्डधारक जर फर्म असेल तर
चौथे मुळाक्षर F असते.कार्डधारक जर सरकारी कार्यालय असेल तर चौथे मुळाक्षर G असते.कार्डधारक जर
सरकारी हिंदू एकत्र (अविभक्त) कुटुंब असेल तर चौथे मुळाक्षर H असते.कार्डधारक जर स्थानिक स्वराज्य
संस्था तर चौथे मुळाक्षर L असते.कार्डधारक जर न्यायसंस्थेचा सभासद नसून न्यायसंस्थेसंबंधी काम करत
असेल तर चौथे मुळाक्षर P असते.कार्डधारक जर आयकर भरणारी किंवा न भरणारी सर्वसाधारण व्यक्ती
असेल तर चौथे मुळाक्षर J असते.कार्डधारक जर एखादा न्यास असेल तर चौथे मुळाक्षर T असते.
परमनंट अकाउंट नंबरचे पाचवे मुळाक्षर व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावाशी संबंधित असते.
पॅनची शेवटची मुळाक्षरे किंवा आकडे हा अंकीय ताळा असतो.
सध्या भारतात पॅनचा उल्लेख कोणत्या व्यवहारात अनिवार्य आहे
कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत एकाच दिवशी ५०,००० इतकी किंवा त्याअधिक रक्कम
जमा करतांना.कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत एकाच दिवशी ५०,००० पेक्षा रोख रकमेचा
बेंक ड्राफ्ट/ पे ऑर्डर किंवा बँकर्स चेक बनवितांना.कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत अथा
टपाल कार्यालयात सावधी ठेवेत(टाइम डिपॉझिट) रक्कम जमा केल्यास.कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा
सहकारी बँकेत (वर नमूद केलेल्या सावधी ठेव/जनधन/मूळ बँक खात्याच्या ठेवीव्यतिरिक्त) नविन खाते
उघडल्यास.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस च्या अधिनियमानुसार दि. ०९.११.२०१६ ते ३०.१२.२०१६ या
अवधीत एकूण रु.२,५०,००० किंवा त्या अधिक रोख रक्कम जमा केल्यास.

पॅन कसे प्राप्त करावे
१. आयकर कार्यालयात साध्या कागदावर अर्ज देउन.
२. संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने


संकलन :- नंदकिशोर फुटाणे