Pages

बोटांची नावे

 


 *विद्यार्थी विकास*


 👇
 👇
 👇 👇
 👇


विद्यार्थ्यांना हाताच्या बोटांची नावे शिकवायची आहे .आपण शिकवितोही परंतु विद्यार्थ्यांना  विचारल्यावर विद्यार्थी बोटांची नावे सांगताना गोंधळतात. विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी  लक्षात राहण्यासाठी काय करावे ? यासाठी  कोणतीतरी trick वापरणे आवश्यक ठरते .
सर्वप्रथम  आपण बोटांची नावे जाणून घेऊ .

    ✌🏼  🤞👋🏻   👎🏼  👈🏻

तर्जनी         fore finger
अनामिका   ring finger
मध्यमा       middle finger
करंगळी      little finger
अंगठा        thumb

कृतीयुक्त गीताच्या माध्यमातून बोटांची नावे शिकविल्यास विद्यार्थी बोटांची नावे विसरणार नाही.

विद्यार्थ्यांना खालील गीत कृतीयुक्त व चालीमध्ये म्हणून दाखविणे.
(प्रत्येक्ष शिक्षकांनी कृती करून विद्यार्थ्याना करावयास सांगणे)

       *हा माझा हात*
      ✌🏼🤞👋🏻👎🏼👈🏻

हा  माझा   उजवा  हात ,
हा माझा  डावा   हात ;
एका हाताला बोटे  पाच ,
दुसऱ्या हाताची बोटे पाच .

ही माझी करंगळी ,
ही माझी अनामिका ;
हि माझी    मध्यमा
ही माझी   तर्जनी
हा माझा  अंगठा.

करंगळी ला करंगळी
अनमिकेला अनमिका
मध्यमाला   मध्यमा
तर्जनीला    तर्जनी .

दोन्ही हाताचा जोड    झाला
पहिला नमस्कार   निसर्गाला
दुसरा नमस्कार आई बाबाला
तिसरा  नमस्कार   गुरुजींना.

      👋 👋 👋 👋 👋
                ✍
        *नंदकिशोर फुटाणे*
  ●█║▌│║║█║█║▌║║█║●
9⃣9⃣7⃣0⃣1⃣4⃣2⃣2⃣9⃣0⃣