Pages

प्रतिज्ञाकार

 


     भारत माझा देश आहे.
     सारे भारतीय माझे बांधव            
      आहे ..........  
         
आपण दररोज परिपाठामध्ये प्रतिज्ञा घेतो.गद्य स्वरूपात  प्रतिज्ञा वाचून घेतो .काव्यमय स्वरूपात विद्यार्थ्यांकडून जर  म्हणून घेतली तर ? विद्यार्थ्याना नाविन्याचा आनंद वाटेल. म्हणूनच ही गद्य स्वरूपातील प्रतिज्ञा पद्य स्वरूपात देत आहे .

     आओ बच्चो तुम्हे दिखाये।
     झाकी हिंदोसस्थान की ।

या लोकप्रिय गीताच्या चालीवर
 विद्यार्थ्यांकडून म्हणून घेता येईल. .चला मग आपण ती काव्यमय प्रतिज्ञा पाहू या.जो भाव गद्यातआहे तोच भाव,अर्थ यातून व्यक्त होतो.
प्रतिज्ञाकार पेदीमरी व्यंकट सुब्बा राव जांनी आपली दररोज म्हणतो ती प्रतिज्ञा लिहली त्यांच्या विषयी  बऱ्याच विद्यार्थ्याना  माहिती नाही .  यांच्या विषयी  pdf स्वरूपात माहिती दिलेली आहे.लिंक ला टच करून प्रतिज्ञाकार सुब्बा राव यांनी माहिती download करू शकता .ती माहिती विद्यार्थ्याना देता येईल....

              प्रतिज्ञाकार
     पेदीमरी व्यंकट सुब्बा राव
   https://goo.gl/Dszi39


             प्रतिज्ञा गीत

          $@# चाल  #@$

(आओ बच्चो तुम्हे दिखाये
झाकी हिंदोसस्थानकी) .......


 भारत माझा देश सारा ,
भारतीय बांधव  माझे;
माझ्या देशावरती आहे,
प्रेम निरंतर  हे   माझे    ।।धृ।।

देशातील समृद्ध आणखी
विविध तऱ्हेने नटलेल्या;
परंपरांचा अभिमानच ज्या
आजवरी चालत आल्या ;
पाईक होण्या परंपरांचा
अंगी पात्रता मम् यावी;
सदैव राहीन प्रयत्नवादी
होईल त्यास सुसंवादी
भारत माझा ............  ।। 2।।

पालक आहे गुरुजन माझे
आणि वडीलधाऱ्यानाही
 सन्मानाने   सौजण्याने   ;
वागविन   मी  त्यांनाही
देशही माझा बांधव माझे;
यांच्याशी  मी   निष्ठने
राहीन माझी हीच प्रतिज्ञा
करितो आज प्रतिष्टेने
भारत माझा ...........।।3।।

त्यांच्या कल्याणात आणखी
त्यांच्या   समृद्धीत   अहा
सामाऊनि सुख माझे गेले
अनुभूती  ही  दिव्य  महा
भारत माझा............।।4।।

   ==================
   संकलन....✍🏻✍🏻✍🏻
  *नंदकिशोर फुटाणे*
 ●█║▌│║║█║█║▌║║█║