Pages

*अपंगत्वावर मात करणारे दहा प्रेरणादायी व्यक्तिमत्व*



💥     *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*ⓂS🅿 महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक व्हाट्सअप्प नेटवर्क*     💥


🎯 *अपंगत्वावर मात करणारे दहा प्रेरणादायी व्यक्तिमत्व*



*♿ आज 3 डिसेंबर हा ‘जागतिक अपंग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अपंगत्व तुमच्या मनात आहे, माझ्यात नाही, हे सांगणाऱ्या काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची माहिती आज आपण जाणून घेऊ...*

*1) हेलन केलर* : मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व व अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या त्यांच्यावर कोसळली. या अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण करून त्या अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका व समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या.

*2) लुईस ब्रेल* : वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे.

*3) सुधा चंद्रन* : एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली.

*4) ऑस्कर पिस्टोरियस* : पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमासहित 110, 200 व 400 मीटर रिनगमधील सुवर्णपदक विजेता आहे.

*5) स्टीफन हॉकिंग* : या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा आजार झाल्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळवला.

*6) बी.एस.चंद्रशेखर* : चंद्रशेखर हा सर्वात भेदक लेग स्पिनर होता. चंद्रशेखर यांचा उजवा हात पोलिओग्रस्त होता. आपल्या व्यंगावर मात करून त्याचाच उपयोग त्यांनी फिरकी गोलदांजीसाठी करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले.

*7) मन्सूर अली खान* : टायगर पतौडी यांनी कार अपघातात उजवा डोळा गमावल्यावरही जिद्दीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवत कप्तानपदाची धुरा सांभाळली. एकाच डोळ्याने दिसत असूनही उत्तम क्षेत्ररक्षक असा लौकिकही मिळवला.

*8) अरुणिमा सिन्हा* : चोरट्यांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याने समोरून येणाऱ्या ट्रेनने त्यांच्या पायाचा लचका तोडला. तरीही त्यांनी जिद्दीच्या जोरावर ‘एव्हरेस्ट’ पार केले. त्यांच्या या कर्तृत्वाचा सत्कार म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ देण्यात आला.

*9) जेसिका कॉक्स* : हात नसतानाही पायलटचा परवाना मिळवणारी ती जगातील पहिली महिला ठरली. ती तिच्या पायांनी विमान उडवते. 2008 मध्ये पायलट परवान्यासह तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

*10) दीपा मलिक* : 29 व्या वर्षी पॅरालेसिस झाल्यानंतरही स्पोर्ट्स डेस्क- रिओत सुरु असलेल्या पॅरालिंपिक गेम्समध्ये दीपा मलिकने थाळीफेकमध्ये सिल्वर मेडल जिंकले. हे मेडल जिंकणारी पहली भारतीय महिला पॅरा अॅथलीट ठरली.

                           *संकलन*
                     *नंदकिशोर फुटाणे*
                            Ⓜ💲🅿