Pages

शिक्षकांची भूमिका

शिक्षकांची भूमिका

1)शाळेत लवकर जावे शाळेसाठी जास्तीचा वेळ द्यावा .

2)दैनदिन कामाचे नियोजन करावे य़शस्वीतेसाठी नियोजनाचा

अवलंब करावा .

3) महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे .

4)शाळा सुसज्ज ठेवणे .

5)विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे .

6)आपले वर्तन प्रेरणादायी , अनुकरणीय व आदर्शवत असावे .

7)पालक संपर्क वाढवणे .

8) ग्रामस्थाशी हितसंबध ठेवावेत .

9) समाजाला मदत करणे व समाजाची मदत घेणे .

10)स्वत;ची शैक्षणिक पात्रता उंचावणे .

11)विशेष कला गुण संपादन करणे .

12)उत्तम मार्गदशर्क व प्रशासक म्हणून भूमिका बजावणे .

13)आपले ज्ञान ,अनुभव कौशल्य याचा उपयोग विद्यार्थी व

समाजासाठी करणे .

14)पालक ,ग्रामस्थ प्रती प्रातिष्ठत, वरिष्ठ अधिकारी सहकारी

शिक्षक व समाज यांचा आदर करणे .

15)प्रत्येकाशी नम्रतेने व सौजन्याने वागावे .

16) नेतृत्व गुण व संघटन कौशल्य असावे .

17)शालेयस्तरावरील विविध योजनाची अमलबजावणी करणे .

18)आपल्या अंगी निर्णय क्षमता असवी .

19)शालेय व्यस्थापन कुशल असावे .

20)विद्यार्थी व शाळेवर पर्यवेक्षण असावे .

21)अध्यापनासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार असावी .

22)अध्ययन अध्यापनाची विशेष कौशल्य आत्मसात करणे .

23) कार्यक्षमता व कार्य प्रेरणा असावी .

24)सर्वाना सोबत घेवून काम करावे . सहकरी शिक्षकावर

विश्वास दाखवावा .

25)आपल्याजवळ असणारे मनुष्यबळ वेळ , पैसा यांचे योग्य

नियोजन करून शालेय कामकाज करावे .

26)शाळा गावात गेली पाहिजे व गाव शाळेत आला पाहिजे .


संकलन :-नंदकिशोर फुटाणे