Pages

PF AND PPF





👉 _*पीएफ आणि पीपीएफ दोन्हीत फरक काय?

आपल्यापैकी अनेकांना पीएफ आणि पीपीएफ या दोन्हीं मधला फरक माहित नसेल. काहींना माहित असूनही त्यांचा पुरता गोंधळ उडतो. म्हणूच जाणून घ्या पीएफ आणि पीपीएफ मध्ये नेमकाफरक काय आहे …

👉 _*पीएफ आणि पीपीएफ म्हणजे काय?*_

1) _*पीएफ*_ : पीएफ अर्थातच ईपीएफ म्हणजेच एंप्लॉई प्रॉव्हिडंट फंड. त्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी देखील म्हणतात.

2) _*पीपीएफ*_ : पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.


👉 _*दोन्हीत नेमका फरक काय?*_

1) _*पीएफ*_ : हा केवळ नोकरदार वर्गासाठी असतो. तुम्ही सरकारी नोकरीत असा किंवा खासगी नोकरीत असा. तुमच्या मासिक पगारातील ठराविक रक्कम आपल्या ईपीएफ खात्यात जमा केली जाते. ईपीएफचे खात्याची इपीएफओ कार्यालयाकडे अधिकृत नोंद असते.

2) _*पीपीएफ*_ : पीपीएफचे खाते कोणत्याही व्यक्तीला उघडता येते. यासाठी तो व्यक्ती कोणत्या सरकारदरबारी किंवा इतर कोणत्या खासगी संस्थेत नोकरीला असायलाच पाहिजे असे बंधन नसते. अगदी नोकरी न करणारा, शेती, व्यावसायिक, गृहिणी आदि गोष्टी करणारी व्यक्तीही हे खाते उघडू शकतो. भारतातील कोणताही नागरिक कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफचे खाते उघडू शकतो.