तुमचा स्मार्टफोन गरम होत असेल तर...
*तुमचाही स्मार्टफोन लवकर गरम होत असेल तर..*
तुम्हाला अनेकदा असे जाणवले असेल की जास्त वेळ वापरल्याने
मोबाईल गरम होतो. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत
ज्यामुळे तुम्ही आपल्या स्मार्टफोनला गरम होण्यापासून वाचवू शकता.
मोबाईल वापरताना गरम होऊ नये असे वाटत असेल तर फोन वापरताना
जे काही वापरात नसलेले अॅप्स आहेत ते बंद करा. जास्त अॅप ओपन
राहिल्याने फोनवर ताण पडतो. यामुळे फोन गरम होतो.
एकाच वेळी तुम्ही गेम खेळत आहात व बॅकग्राउंडवर म्युझिक सुरू असेल
तर फोनवरील लोड वाढून तो गरम होतो. फोनवर एकावेळी दोन कामे
करू नका.
फोन गरम होणे हे फोनमध्ये जास्त लोड आणणारी गोष्ट सुरू असल्याचे
द्योतक आहे. ऑनलाईन गेम्स खेळताना जास्त प्रोसेसिंगची गरज
असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्या फोनला थोडा आराम
द्या.
संकलन :- नंदकिशोर फुटाणे