Pages

हेडफोनने गाणी ऐकताय?






👉 *हेडफोनने गाणी ऐकताय? काळजी घ्या!*

हेडफोन कानात घालून मोबाईलवरील गाणी ऐकण्याची अनेकांना भारी सवय असते. बहुतांश जण, अशा प्रकारे गाणी ऐकताना ती मोठ्या आवाजात ऐकत असतात. मात्र याचा थेट परिणाम आपल्या कानावर होत असतो. तो होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. आज याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...


1) हेडफोनद्वारे कानावर सातत्याने पडणारा मोठ्ठा आवाज कानाच्या आतल्या पडद्यावर आदळत असतो आणि श्रवणयंत्रणेतल्या कॉकलिया या भागावर त्याचे काही परिणाम जाणवायला लागतात. सातत्याने आवाजाचा मारा होत गेल्यामुळे हा नाजूक भाग बधीर होऊन जातो आणि सातत्याने अशी गाणी ऐकणार्‍यांना बहिरेपणा येण्याची शक्यता असते.


2) सर्वसाधारपणे आपली समजूत अशी असते की, मोबाईलमधला आवाज इतर आवाजांपेक्षा लहान असतो. पण हा आपला गैरसमज आहे. कारण मोबाईलचे गाणे तुलनेने कमी आवाजाचे वाटले तरी त्या गाण्याचा हेडफोन कानामधल्या कॉकलिया यंत्रणेला थेट जोडलेला असतो. म्हणजे ते ध्वनी थेट या भागावर आदळतात, हे लक्षात घ्यायला हवे.


3) मोबाईलवरची गाणी ऐकण्यासाठी ज्या प्रकारचे हेडफोन वापरले पाहिजेत, त्याप्रकारचे वापरले जात नाहीत. स्वस्तात मिळणारे आणि कानाला इजा पोहोचवणारे हेडफोन वापरले जातात. म्हणून गाणी ऐकताना आपण कोणता हेडफोन वापरत असतो, हे ही लक्षात घेतले पाहिजे आणि थेट कानामध्ये खोलवर जाणारे हेडफोन शक्यतो टाळले पाहिजेत.


4) दिवसभर तासभरापेक्षा जास्त मोबाईल कानाला लावून बसणे धोकादायक आहे. अशा प्रकारे तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुमच्या श्रवणक्षमतेची हानी होते. तज्ञांच्या मते, जे लोक रोज तासापेक्षा अधिक काळ मोबाईल कानाला लावत असतील तर त्यांना स,फ, ह, ट, आणि झ अक्षरांपासून सुरू होणारे शब्द ऐकण्यात अडचणी येतात. पुढे जाऊन त्यांना दोन आवाजातील भेद ओळखणे अवघड जाते.


5) मोबाईलवर बोलण्यासाठी उजव्या कानाचा जास्त वापर केल्यास साहजिकच त्या कानाद्वारे श्रवणशक्तीचे नुकसान अधिक होते.


वरील गोष्टी सांगण्याचा आमचा हेतू तुम्ही मोबाईवरील गाणी ऐकणे बंद करावी असा नाही. मात्र गाणी ऐकताना कोणती काळजी घ्यावी याची जाणून करून देणे हा आहे. कारण मोठ्या आवाजात गाणी लावली की, हा प्रभाव पडत राहणारच. तेव्हा मोबाईलवरची गाणी ऐकावीत परंतु आवाज बारीक ठेवावा. परिणामी, काही दोष निर्माण होण्याची भीती राहणार नाही.