👉 *वाईट काळात सहन करण्याचे रुल्स.*
जीवनात अनेकदा चढ-ऊतार सुरु असतात. यातून काही जण सावरतात तर काही जण भरकटत जातात. त्यामुळेच असे म्हटले जाते कि, आपले भविष्य आपल्या हातात असते. ज्यावेळी आपला वाईट काळ चालू असतो अशा वेळी आपण हार मानायला लागतो. मात्र अशा वेळी काही नियम आहेत, या नियमामुळे आपण या वाईट काळावर मात करू शकतो. म्हणूनच जाणून घेऊया या 5 नियमाविषयी ज्याने आपले आयुष्य बदलून जाईल...
👉 _*रुल नंबर 1 :*_ दुःख आणि अपयश जिवनाचा अविभाज्य भाग आहे.
यामुळे होणारा फायदा : हा नियम तुम्ही पाळलात तर कितीही वाईट काळ आला तरी तुम्ही मानसिक तुटणार नाहीत.
👉 _*रुल नंबर 2 :*_ प्रत्येक वाईट काळासारखा हा वाईट काळही निघून जाईल.
यामुळे होणारा फायदा : या नियमानुसार वागलात तर तुम्हाला वाईट काळाला फेस करण्याची ताकद मिळेल.
👉 _*रुल नंबर 3 :*_ चिंता केल्याने आणि जास्त विचार केल्याने परिस्थिती बदलत नाही.
यामुळे होणारा फायदा : हा नियम तुम्ही पाळलात तर तुम्ही अपयश विसरुन दुसऱ्या दिवशी ताकदीने आव्हान स्विकारण्यास सज्ज व्हाल.
👉 _*रुल नंबर 4 :*_ तुमचे घाव तुमची ताकद आहे. कमकुवतपणा नाही.
यामुळे होणारा फायदा : या नियमाला फॉलो केले तर तुम्ही हताश न होता आणखी आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाल.
👉 _*रुल नंबर 5 :*_ वाईट काळ प्रत्येकाला फेस करावा लागतो. तुमचे काम सुरु ठेवा.
यामुळे होणारा फायदा : यामुळे तुमची निगेटिव्ह थिंकिंग तुमच्यावर हावी होणार नाही. तुम्ही पॉझिटिव्ह राहाल. हा काळ आरामात निघून जाईल.