Pages

अभ्यासात ’नापास


👉 *अभ्यासात ’नापास’, रिअलमध्ये ’टॉप’*



*आपल्या आयुष्यात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहेच. मात्र शिक्षणामध्ये अपयश आलं की, सगळं संपत असं नाही. अशा परिस्थितीला न जुमानता तुम्ही जर अथकपणे कठोर परिश्रम घेत राहिलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हेच सांगणारी प्रसिद्ध व्यक्तींची प्रेरणादायी स्टोरी*...

1) _*मुकेश अंबानी*_ : *हे त्यांच्या एमबीएच्या अभ्यासक्रमामध्ये नापास झाले होते. याला न जुमानता ते कठोर परिश्रम घेत राहिले. म्हणून आज ते रिलायन्स डिजिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर बनले आहेत. फॉर्ब्स मॅगझीननुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश आहे*.

2) _*कपिल देव*_ : *पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे सर्वात प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूपैकी एक असले तरीही,एकेकाळी त्यांना कॉलेज मधून बाहेर काढून टाकण्यात आले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही. ते लढत राहिले आणि आज त्यांची ख्याती सर्वश्रुत आहे*.


3) _*सचिन तेंडुलकर*_ : *क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला आपला लाडका सचिन तेंडुलकर फक्त 10 वी पर्यंत शिकलेला आहे हे वाचून आश्‍चर्यचकित होऊ नका. कारण सचिनच्या क्रिकेटमध्ये असणार्‍या विलक्षण कौशल्यामुळे तो लहान वयातच पूर्णवेळ क्रिकेटकडे वळला. फील्डवर त्याचे विलक्षण कौशल्य खूप आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिक्षणाचा बाऊ न करता सचिन मास्टर ब्लास्टर बनला आणि आज त्याची ख्याती संपूर्ण विश्‍वभर आहे*.

4) _*अझीम प्रेमजी*_ : *विप्रो या नावाजलेल्या आयटी कंपनीचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी हे कॉलेजमध्ये असताना ड्रॉप झाले होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी विप्रो या कंपनीची स्थापना केली. त्यांनी मिळालेले यश आणि त्यांनी केलेली धडपड वाखण्याजोगी आहे*.

5) _*अमीर खान*_ : *बॉलीवूड जगतातील सर्वात जास्त प्रशंसनीय अभिनेत्यांपैकी एक असणारा अमीर खान अजून एक उदाहरण आहे की, ज्याने कॉलेजमध्ये असतानाच ठरवले की, कॉलेज हे आपल्यासाठी नाहीये. त्याने आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व नंतर त्याने आपल्या आवडत्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवून एक यशस्वी अभिनेता बनून दाखवले*.

6) _*मेरी कॉम*_ : *भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कॉमने आपले शिक्षण शाळेत असतानाच सोडले होते. त्यानंतर तिने भारताची अव्वल बॉक्सर बनून बॉक्सिंगमध्ये आपले करियर नावारूपाला आणले. तिने अलीकडेच आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिच्या प्रेरणादायी जीवनावर काही दिवसांपूर्वी चित्रपट देखील आला होता. त्यात प्रियंकाने मेरीचा रोल केला होता*.

7) _*गौतम अदानी*_ : *वाणिज्य शाखेचे डिग्री चे शिक्षण घेत असतानाच गौतम अदानी यांनी आपले शिक्षण सोडले. त्यानंतर ते व्यवसायाकडे वळले. त्यांनी स्वतःची अदानी ग्रुप नावाने हिर्‍यांची ब्रोकरेज कंपनी चालु केली. आज त्यांच्या कंपनीची उलाढाल जवळपास काही अब्ज डॉलर्सच्या घरात आहे*.

8) _*ऐश्‍वर्या राय बच्चन*_ : *मुंबई मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऐश्‍वर्या रायने आर्किटेक्टर कोर्सला प्रवेश घेतला. पण ती कॉलेजमधून ड्रॉपआऊट झाली. ऐश्‍वर्या त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली व मिस वर्ल्ड हा किताब जिंकून तिने आपल्या नावाची छाप पाडली. बॉलीवूड मध्येही आपल्या अभिनयाने तिने वेगळा ठसा उमटवला*.

9) _*सलमान खान*_ : *आपल्या एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमुळे सलमानने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव घट्ट केलेले आहे. पण सलमानने फक्त शाळेपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. सलमान आणि त्यांच्या भावांनी शालेय शिक्षणानंतर त्यांच्या आवडत्या अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला*.

10) _*अक्षय कुमार*_ : *बॉलीवूडचा खिलाडी अशी ओळख असलेला अक्षय कुमारने मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. त्याच्या अभिनय कौशल्यामुळे तो खूप कमी शिकेलला आहे हे कदापी वाटणार नाही. पण अक्षयने आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच कॉलेजला रामराम ठोकला*.

*हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व हे सिद्ध करतात की, यश हे फक्त शिक्षणाने मिळत नसते तर त्यासाठी गरज असते ती प्रचंड इच्छाशक्ती व मेहनतीची. अपयशाला कुरवाळत बसू नका. आपलं स्वप्न साकार करण्यावर आपण ठाम राहिलो तर ते पुर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चला तर मग स्वप्न बघायला सुरूवात करा आणि त्यासाठी धडपड सुरूच ठेवा*.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●