Pages

फोनची बॅटरी




*फोनची बॅटरी*

📊📊📊📊📊📊📊📊📊📊

 
👉 *फोनची बॅटरी लवकर चार्ज होण्यासाठी...*

📊📊📊📊📊📊📊📊📊📊

         👇
 👇 👇
 👇

अनेक वेळा आपण फोन फास्ट चार्जिंग होत नाही ही फोनची समस्या समजत असतो. अशा वेळी नेहमी फोन आणि बॅटरीला दोष दिला जातो. तर काही वेळा फोनची बॅटरी किंवा चार्जर खराब झाल्याचे आपल्याला वाटते. मात्र या समस्येचे कारण आपण स्वतः असतो. आपल्या काही चुकामुळे फोन फास्ट चार्जिंग होत नाही. म्हणून आपण 'नेमक्या काय' चुका करतो ते जाणून घेऊयात...

👉 आपण फोनवर Wi-Fi, GPS आणि ब्लुटू्थ एकाचवेळी वापरत असतो. या सर्व गोष्टी एकाचवेळी ऑन झाल्यामुळे फोन स्लो चार्ज होतो. अशावेळी फोनला लवकर चार्ज करण्यासाठी सगळ्या सेटिंग आणि सर्विसेस बंद करा.



👉 तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे त्याच कंपनीचा चार्जर वापरा. यामुळे तुमचा फोन लवकर चार्जिंग होण्यास मदत होईल. दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरल्यास फोन चार्ज होण्यास वेळ लावतो.

👉 फोन चार्जिगला लावताना एरोप्लेन मोडवर ठेवा. यामुळे तुमचा फोन सुरू राहिल पण नेटवर्क मिळत नसल्याने तुम्हाला फोन येणार नाहीत.

👉 फोन चार्जिंगला लावताना नेट डेटा, वाय-फाय आणि ब्लूटूथ बंद करा. असे केल्याने तुमचा फोन जलदगतीने चार्ज होईल.

👉 फोन चार्ज करताना बॅटरी सेव्हर मोड सुरू करा. यामुळे तुम्हाला मेसेज, फोन येणे सुरूच राहिल आणि बॅटरीही पटकन चार्ज होईल.

👉 फोन चार्जिंगला लावताना ब्राईटनेस कमी ठेवावा. यामुळे फोन लवकरात लवकर चार्जिग होईल. तसेच फोन वापरताना ब्राईटनेस कमी ठेवावा यामुळे फोन जास्तवेळ सुरू राहील.

👉 स्मार्टफोनवर खूप सारे अॅप्स असतात, जसे की, मेल, फेसबुक, टि्वटर यामुळे बॅटरी कमी होते. या सगळ्या अॅप्सला चार्ज करताना बंद करा.

👉 काही युजर्स NFC मोड कायम सुरूच ठेवतात. फोन चार्जिंगला लावताना NFC मोड बंद करा.

👉 कधी-कधी फोनमध्ये चुकीच्या बॅटरी येतात. अशावेळी बॅटरीची खात्री करुन ती बदलून घ्या. काहीवेळी बॅटरी जुनी असल्यामुळेही फोन स्लो चार्ज होतो.

👉 स्मार्टफोनला पर्सनल कॉम्प्युटरवर चार्ज करताना त्याची चार्जिंग स्पीड खूपच स्लो होते. तसेच तुम्ही वायरलेसने चार्ज करत असाल तर खूपच स्लो चार्ज होते. यामुळे तुम्ही चार्जरनेच चार्ज करण्याचा प्रयत्न करा.

👉 फोनला युनिवर्सल चार्जर आणि लोकल अॅडॉप्टरने चार्ज केल्याने स्लो चार्जिंग होते. यामुळे फास्ट चार्जिंगसाठी फोनबरोबर आलेल्या अॅडॉप्टरचा वापर करा.

📊📊📊📊📊📊📊📊📊📊
🥀       
   █║▌│║║█║█║▌║║█║