Pages

प्रथमोपचार




 *शाळेत आवश्यक असणारे प्रथमोपचार साहित्य*

📊📊📊📊📊📊📊📊📊📊
🥀 
     👇
 👇 👇
 👇

👉 _*प्रथोमपचार आणि आवश्यक गोष्टी*

प्रथमोपचार म्हणजे एखाद्या आजारात किंवा जखम झाल्यास केलेले प्राथमिक उपचार. प्रथमोपचार हे सामान्यत: एखाद्या तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीद्वारे एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंतच्या काळात दिले जातात. अशी काही समस्या उद्भवल्यास गांगरून, घाबरून न जाता प्रथमोपचार केल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. हे प्रथमोपचार कसे करायचे याविषयी...


👉 _*प्रथमोपचार पेटीत काय असावे?*_

निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या I जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी I चिकटपट्टी I त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारे बँडेज I औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस I छोटी टॉर्च I कैची I रबराचे हातमोजे (2 जोड्या) I छोटा चिमटा I सुई I स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे I अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन) I थर्मामीटर I पेट्रोलियम जेली I निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिना I साबण

👉 _*डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येणारी औषधे*_

ऍस्पिरीन किंवा तत्सम वेदनाशामक गोळ्या I मधमाश्यांच्या दंशावरील अँटीहिस्टामाईन मलम I जुलाब थांबविण्यासाठी गोळ्या I लॅक्झेटीव्ह I अँटासिड (पोटदुखीसाठी)

प्रथमोपचाराची पेटी नेहमी सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावी. पेटीतील औषधे त्यांची मुदत संपताच त्वरीत बदलावीत.

👉 _*बेसिक लाईफ सपोर्ट ABC*_

एखादी लहानसहान जखम झाली, तर त्यासाठी प्रथमोपचार केले जातात; पण जर जखम मोठी असेल म्हणजे रस्त्यावरील अपघात, उंच इमारतीवरून खाली पडणे किंवा चाकूहल्ला होणे वगैरेसारख्या घटनांमध्ये आपल्याला बेसिक लाईफ सपोर्टची आवश्यकता असते. यात तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यांना एबीसी असे म्हणतात.

1. *ए म्हणजे एअरवेज* : रुग्णाची श्वसनक्रिया नाक किंवा तोंडाद्वारे व्यवस्थित चालू राहील याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाजवळ गर्दी जमू देऊ नका, पंखा सुरू करा किंवा हाताने वारा घाला, जेणेकरून त्या रुग्णाला हवा मिळू शकेल.

2. *बी म्हणजे ब्रीदिंग* (श्वसन) : रुग्णाच्या छातीची हालचाल व्यवस्थित होत आहे की नाही, तसेच त्याची फुफ्फुसे व्यवस्थित काम करत आहेत की नाही, हे पाहण्याची आवश्यकता असते. श्वास थांबला आहे असे वाटत असेल, तर त्याच्या छातीवर जोरजोरात दाबत रहा. छातीबरोबरच फुफ्फुसेही दाबली जातात आणि त्यामुळे श्वास घ्यायला मदत मिळते.

3. *सी म्हणजे सर्क्युलेशन* (रक्तप्रवाह) : रुग्णाच्या शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित आहे की नाही हे पाहावे लागते. त्याचबरोबर त्याची नाडीही योग्य तर्हेने काम करते की नाही हे पाहणे आवश्यक असते. नाडीचे ठोके 110 च्या वर जात असतील तर धोका असतो, त्यावेळी ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्यावी.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवा कारण यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो...

📊📊📊📊📊📊📊📊📊📊