Pages

मुल गणित कसे शिकते ?




प्रत्येकाला वाटते आपल्या मुलांना गणित चांगले यावे. माझ्या प्रत्येक मुलांना गणित विषय आवडीचा व्हावा...._

*मुल गणित कसे शिकते ?

....*
~~~~~~~~~~~~~~~~~~~


_*आपण पाहुयात गणित शिकण्याची प्रक्रिया घडते कशी ?*_

   गणित हे अमुर्त शास्त्र आहे असे आपण मानतो. ....

मुल गणित करताना ....
*Steps अशा प्रकारे होते*...

▫ एखादा प्रश्न जेव्हा मुलांना विचारला जातो.
 उदाहरणार्थ : -
  *4 + 5 = ?*
▪ तेव्हा त्यांच्या समोर विचार येतो म्हणजे *कोणत्या तरी चार वस्तु + दुसऱ्या पाच वस्तू*
*+* अधिक चिन्ह म्हणजे त्यांची बेरीज करायची असते....
( *एकञ करायचं / मिळवायचे आहे* )

▫ मग मुल विचार करते...
*4 बोटे + 5 बोटे*
*4 पेन + 5 पेन*
   असे चित्र त्यांच्या मनात तयार होते व तो एकत्रित विचार करतो....

▪ तेव्हा त्यांचा *मेंदु मध्ये ही प्रक्रिया सुरू होते व मेंदु विचार करून सांगतो ( मोजून सांगतो ) कि 4 व 5 एकञ केल्यास 9 होते*
   हा त्यांच्या गणन क्रिया चा भाग आहे. ही गणन क्रिया दृश्य / अदृश्य स्वरूपात घडते ....

▫ मेंदु कडून आदेश येतो ....
*अगदी बरोबर आहे 4+5 = 9* आहे. मग मुलगा पटकन उत्तर देतो....

4 + 5 = 9 ✅
तो ठाम पणे सांगतो.

▪  या सर्वच प्रक्रिया *आपल्या ला ही दिसत नाही मुलांना ही मनातल्या मनातच करावी लागते*

▫  *म्हणजे मुलांच्या पूर्ण अनुभव चा संग्रह होतो व त्यांचा मेंदूत संचय होत असतो.....*

▪ वारंवार असे अनुभव मेंदूत संचय होतात....

म्हणजे सुरूवातीला ...
4 + 5 = 9 करायला *15 - 20 सेकंद वेळ लागतो....*

हळूहळू हा वेळ कमी होत जातो....
*सरावाने अगदी  1 सेकंदात उतर सांगू लागते*....

👉🏻  4 +5 = 9
*उत्तर तोंडी सांगने किंवा लिहणे या दोन्ही पद्धतीने प्रतिक्रिया मिळणे म्हणजे गणित जमते....*

👉🏻  *म्हणून शाळेत न गेलेला ही व्यक्ती / अडाणी व्यक्ती ही बेरीज पटकन करतो कारण त्यांच्या मेंदुवर या सर्वच बेरजा अनुभवाने Save झाल्या आहेत.....*

=======================

*गणित पक्के होण्यासाठी काय करता येईल ....!*
=======================

 ▪ मुलांना प्रत्येक बाबी चे अनुभव देता आले पाहिजेत....

▫ गणित भाषा शब्द अर्थ अनुभवाने समजावला पाहिजे...
*गणिती शब्द ....!*

 कमी , जास्त , किती , लई , एक , काहीच नाही , भरपूर , उरतता , चढता , जाड , पातळ , हलका , जड , उंच , बुटका , सर्वात उंच , सर्वात कमी , सर्वात लहान , सर्वात मोठा.....

    मिळवणे , ओतणे , घालणे , जमवणे , मिसळणे , कमी करणे , गायब होणे , वाढणे , पट करणे , दुप्पट , तिप्पट , भाग , गळाले , आले , गेले , भाग केले , समान वाटले....
*असे हजारो शब्द गणितात वापरतात या प्रत्येक शब्द चा प्रत्यक्ष अनुभव मुलांना असेल तर त्यांच्या मेंदूत लवकर प्रतिमा तयार होते व लवकर प्रक्रिया चालू होते......*

        एखाद्या गोष्टी चा अनुभव प्रत्यक्ष पाहिला असेल तर *आत्मविश्वास ने मुल पटकन उत्तर देते....*

⏺  *हे आवश्य करा....*
      ~~~~~~~~~~~~~~

👉🏻  गणिती भाषा चा जास्तीत जास्त वापर करा व त्या प्रत्यक्ष अनुभव देऊन शिकवा.

👉🏻  त्या साठी मुलांना जास्त अनुभव द्यावे .

👉🏻 गणित संकल्पना स्पष्ट करून देताना दैनंदिन जीनवातील अनुभव जोडा....

👉🏻  गणित म्हणजे फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार नसून .... *निर्णयक्षमता , तुलना , अचुकता , प्रसंगावधान , विचार शक्ती , वेळेचा ताळमेळ , जलदपणा , अंदाज करणे , अनुमान लावणे , सहसंबध जोडणे , कार्यकारण भाव सांगणे ....म्हणजे गणित होय*

*या पद्धतीने नक्कीच मुलांचे गणित सुधारेल...*

=======================
   संकलन....✍🏻✍🏻✍🏻
  *नंदकिशोर फुटाणे*

🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞