मनोरंजक खेळ
विद्यार्थ्यांना अध्ययन निरस वाने वाटू नये म्हणून आपण अधूनमधून
काही मनोरंजक खेळ घ्यावेत .तसेच या खेळातून त्यांना अध्ययनाचे धडे
देण्याचा प्रयत्नकरावा.त्यासाठी काही खेळ मी आपल्यासमोर मांडत आहे.
—————————————————————————
01 .) स्मरण खेळ –विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण
स्मरण खेळघेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान
लहानवस्तू ठेवाव्यात.उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू
मुलांनादाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात.नंतर
त्या वस्तू
कापडाने झाकून ठेवाव्यात.नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू
लिहायला सांगाव्या. त्यावस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा
लागेल.जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
—————————————————————————
02 ) ओंजळीने ग्लास भरणे –मुलांना या खेळात फार आनंद मिळतो.
प्रथम आपण १० – १२मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे
गटातील संख्ये नुसारग्लास
घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतरठराविक
अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या.मुलांना त्या बादलीतील
पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्याग्लास मध्ये
टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपलाग्लास
भरावा लागेल.या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा
पहिलायेईल. यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण
मदत होईल.
—————————————————————————
03.) ठराविक वेळेत गणिते सोडवणे –मुलांना आपण २०-२५ बेरीज ,
वजाबाकी किवा इतर कोणत्याहीप्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही
प्रकारची गणिते देऊशकतो
आणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण
विद्यार्थ्यांनासोडवायला लाऊ शकतो. त्या वेळेत गणिते उत्तरासह
सोडवणेअपेक्षित आहे.सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला
सराव झाल्यासअंक वाढवत जावे. अश्याप्रकारे खेळातून गणिताचा
सरावघ्यावा.या खेळत १००% मुलांना सहभागी करावे.
————————————————————————
04. ) एकमेकांना हसवणे –मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या
वेळेस हा खेळ घ्यावा.काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि
बसलेल्यामुलांपैकी एकाने
येउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यांना हसवतानाहात
लावायचा नाही. वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाजकाढून , विनोद
सांगून त्यांना हसवावे. जे मुले हसतील त्यांना खाली बसवावेआणि जे
मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषितकरावे.
—————————————————————————
05. ) आवाज ओळखणे –एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी
वर्गातल्या / गटातल्यामुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या
मुलाला नावघेऊन बोलवावे.त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने
कोणी आवाज दिला तेसांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला
एक गुण द्यावा .असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला
जास्त गुणमिळतील तो विजयी घोषित करावा.
————————————————————————
06.) खोक्यातील वस्तू ओळखणे –एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान
लहान बॉल , पेन , पेन्सिलअश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या
खोक्याचे तोंड बंदकरावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत
जातीलएव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या
खोक्यातहात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या .
—————————————————————————
07.) वासावरून वस्तू ओळखणे –बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात
ते आपण आणावे . पण तेग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका
ग्लासात कांदा ,लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि
ग्लासलाएक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या
कागदालासुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या
छीद्रातूनवास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे.
————————————————————————
08.) फुगे फोडणे –लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या
खेळात आपणकाही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात
थोडीकमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचाप्रयत्न
करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगेफोडावे. असा
नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्तफुगे फोडेल तो विजेता
घोषित करावा.
————————————————————————
09.) बॉल फेकून मारणे –या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक
वर्तुळ आखूनवर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील
मुलांनाठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक
चेबॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल
त्यांनीवर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी
त्यायेणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉलवर्तुळातील
मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांनाद्यावेत. सर्व मुले
संपल्यावर गट बदलावा.
————————————————————————
10.) नेमबाजी –ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या
वस्तूला बॉलने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या
वेळामुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त
गुणघेणारा मुलगा विजेता घोषित करावा.
—————————————————————————
11.) विद्यार्थी ओळखणे –एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे
करावे आणि एकामुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते
पाहायलालावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने
उभेअसलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथूनपुढचे
सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्तविद्यार्थी क्रमाने
सांगेल तो विजेता ठरवावा.
—————————————————————————
12.) बादलीत चेंडू टाकणे –एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर
ठेवावी आणि फुटबॉल/ vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे.
प्रत्येकमुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल
बादलीतटाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा.
—————————————————————————
13.) संदेश पोचवणे –या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे
आणि आपणसमोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे
व्याक्यसांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे
बसलेल्यामुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनीआपापल्या
मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यातशेवटी बसलेल्या मुलाने
ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे.आपण पहिल्या मुलाला सांगितलेले
वाक्य आणि शेवटच्यामुलाचे वाक्य फार वेगळे येते.
14.) आंधळी कोशिंबीर –हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने
बांधावे.बाकीच्यामुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या
मुलानेवर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले
तेओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्याबाहेर
जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळीसूचना द्याव्यात.
पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल वओळखेल त्या मुलाच्या
डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणिखेळ पुढे सुरु ठेवावा.
————————————————————————
15.) विष – अमृत –एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील.
त्यांना एकमुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या
मुलालाविष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावे. दुसऱ्या
मुलांनीत्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे. अमृत मिळाल्यास
तोबसलेला मुलगा उठून पळू शकतो. विष देणाऱ्या मुलाने त्यांनाअमृत
देण्यापासून थांबवावे.
संकलन :-नंदकिशोर फुटाणे