Pages

गूगल

गूगल - माहितीचं एक साम्राज्य !आज जगात जो कोणी इंटरनेटशी जोडला गेला आहे,त्या प्रत्येकालाच गूगल माहित आहे. गूगलने ज्याकाही सेवा-सुविधा पुरवल्या आहेत त्यामुळेसर्वसामान्य माणसे इंटरनेटशी जोडली गेली आहेतअसे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. गूगलही लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच बनलीआहे. गूगलचे ‘सर्च इंजिन’ हे जगात सर्वात प्रभावीमानले जाते. आपण गूगलच्या सर्च इंजिनचा वापरकरून आपल्याला हवी असलेली कोणतीही माहितीक्षणार्धात मिळवू शकतो. अशा तऱ्हेने गूगलनेमाहितीचा खजिनाच लोकांना उपलब्ध करून दिलाआहे. ज्या काळात मायक्रोसॉफ्ट, अॅपल, IBM सारख्याबलाढ्य कंपन्या ‘सॉफ्टवेअर-हार्डवेअर तंत्रज्ञान’ क्षेत्रातजम बसवून होत्या, तेव्हा गूगल नवख्या असलेल्या‘वर्ल्ड वाईड वेब’ प्रणालीचा उपयोग करून तंत्रज्ञानक्षेत्रात जम बसवू पाहत होती. गुगलने बुद्धिमत्ता,सर्जनशीलता यांची सांगड घालत लोकांच्या गरजांचाविचार करून अतिशय नाविन्यपूर्ण सेवा, उत्पादनेजगात आणली आहेत. म्हणुनच एकेकाळी गॅरेजमधूनसुरुवात केलेल्या या कंपनीचा सध्या जगातील सर्वातप्रभावशाली कंपन्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळेगुगलची वाटचाल जाणून घेणे हे नक्कीचरोमांचकारक ठरेल.लॅरी पेज आणि सर्गे ब्रिनकॅलिफोर्नियातील ‘स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी’ ही उच्चदर्जाचे शिक्षण देण्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. येथेदरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणांहून अतिशय बुद्धिमानविद्यार्थी विविध क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी येतात.असेच १९९५ साली, पीएचडी करण्यासाठीविद्यार्थ्यांची एक नवी तुकडी (बॅच) स्टॅनफोर्डमध्येदाखल झाली होती. यामधील एका तुकडीमध्ये लॅरीपेज होता. कॉलेजमध्ये नुकतेच पदार्पण केलेल्या याविद्यार्थ्यांना पीएचडीबद्दल माहिती देण्याची,कॉलेजचा परिसर दाखवण्याची आणि इतर महत्त्वाच्यागोष्टी कळवण्याची जबाबदारी पीएचडी च्या ‘दुसऱ्यावर्षातील’ विद्यार्थ्याकडे असते. तेव्हा लॅरी पेजअसलेल्या तुकडीची जबाबदारी सर्गे ब्रिनकडे होती.येथेच त्या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या दोघांचीव्यक्तिमत्वे ही पूर्णपणे विरुद्ध होती. लॅरी पेज हाबुजरा, अबोल आणि अंतर्मुख होता तर सर्गे ब्रिन हाधाडसी, बोलका आणि बहिर्मुख होता. सुरुवातीलादोघांनाही एकमेकांबद्दल तिरस्कार वाटत होता, पणनंतर एकमेकांसोबत वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चाकेल्यावर ते एकमेकांच्या मतांचा, विचारांचा आदरकरू लागले. त्यांना असे लक्षात आले कि त्यांच्याआवडी-निवडी देखील सारख्याच होत्या आणि अशापद्धतीने ते चांगले मित्र बनले.स्टॅनफोर्डमध्ये दाखल झाल्यावर लॅरी पेजने ‘टेरीविनोग्रॅड’यास पीएचडीसाठी सल्लागार म्हणूननिवडले. पीएचडीसाठी आवश्यक असलेल्याप्रबंधासाठी लॅरी वेगवेगळ्या विषयांचा शोध घेत होता.तो याबाबत खूपच दक्ष होता. त्याने मेहनत घेऊनकाही नवीन कल्पना शोधल्या होत्या. त्याकाळी ‘वर्ल्डवाईड वेब’ (WWW) या प्रणालीचा नुकताच शोधलागला होता आणि त्याचा वापर देखील वाढतचालला होता. लॅरी याकडे आकर्षित झाला होता.‘वर्ल्ड वाईड वेब’ म्हणजे माहितीचे जाळे जेहायपरलिंकच्या सहाय्याने एकमेकांशी जोडलेले असते.आणि आपण इंटरनेटच्या मदतीने त्याचा वापर करूशकतो. ‘वर्ल्ड वाईड वेब’ मधील माहिती ही वेबपेजेसच्या (डॉक्युमेंट्स) स्वरुपात असते. याडॉक्युमेंटचे पुन्हा विविध प्रकार असतात. उदाहरणार्थ.साधे लेख, व्हिडिओ, ऑडीओ, चित्रे. या प्रत्येकवेबपेजला एक वैयक्तिक पत्ता (Uniform ResourceLocator) असतो. लॅरी ‘वर्ल्ड वाईड वेब’चा अभ्यासकरण्यास खूप उत्साही होता. तेव्हा लॅरीने त्याच्यासल्लागाराशी चर्चा करून हाच विषय पीएचडीसाठीनिवडला.संशोधन करत असताना त्याच्या असे लक्षात आलेकी एका वेबपेजवरून पुढे दुसऱ्या वेबपेजकडे जाणाऱ्यालिंक्स शोधणे (forward linking) हे सोपे आणि कमीमहत्त्वाचे आहे. पण एखाद्या वेबपेजला मागेकोणकोणत्या वेबपेजेसनी लिंक केलेले आहे(backward linking) हे सांगणे कठीण आणि महत्वाचेआहे. संशोधक जेव्हा प्रबंध प्रकाशित करतो, तेव्हात्याची गुणवत्ता ठरवताना फक्त अस्सलपणावरअवलंबून न राहता ‘अवतरण’ (citation/quotation)चा देखील विचार करावा लागतो. ‘अवतरण’ म्हणजेअशी पद्धत ज्यामध्ये प्रबंधाच्या निष्कर्षांपर्यंतपोहोचताना इतर उपयोगात आलेल्या माहितीचा,प्रबंधांचा संदर्भ दिलेला असतो. एखाद्या प्रबंधाचेपरीक्षण हे त्या विषयाची कल्पकता, अस्सलपणातसेच प्रबंधामध्ये समावेश करण्यात आलेल्या इतरप्रबंधांचे संदर्भ, इतर प्रबंधांमध्ये करण्यात आलेलात्या प्रबंधाचा संदर्भ आणि प्रत्येक संदर्भाचे मोलयावरून ठरविली जाते. संशोधनाच्या जगात ‘citation’ला खूप महत्व आहे. त्यामुळे लॅरी पेज ‘बॅकवर्डलिंकिंग’ वर संशोधन करू लागला आणि याप्रोजेक्टला त्याने ‘बॅकरब’ असे नाव दिले. यासाठीलॅरी पूर्ण वेबच डाऊनलोड करू पाहत होता. आणि यासर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला प्रबळ संगणकीयसंसाधनांची आवश्यकता होती. प्रोजेक्टचा अवघडपणाव आवाका पाहून सर्गे ब्रिनदेखील याकडे आकर्षितझाला. आता दोघे मिळून दिवस-रात्र प्रोजेक्टवरतीकाम करत असत.त्यांनी ‘citation’ ची संकल्पना वापरून प्रत्येकवेबपेजला एक दर्जा (रँक) दिला. एखाद्या वेबपेजचादर्जा त्यांनी त्याला मागे किती वेबपेजेसनी लिंककेलेले आहे, पुन्हा त्या लिंक केलेल्या वेबपेजेसनामागे लिंक केलेल्या वेबपेजेसची संख्या अशापद्धतीनेएकमेकांशी जोडलेल्या लिंक्सची संख्या आणि त्यावेबपेजचे अस्तित्व यांवरून ठरवली. या सर्व गोष्टीखूपच गुंतागुंतीच्या होत्या आणि त्यासाठी अतिशयउच्च दर्जाचे गणित लागणार होते. सर्गे ब्रिन हागणितात विद्वान होता. त्याच्या मदतीने लॅरीने हेकाम पार पाडले. ’बॅकरब’मध्ये एखाद्या वेबपेजचापत्ता (URL अॅड्रेस) दिल्यावर त्या वेबपेजला मागेजोडलेल्या वेबलिंक्सची, वेबलिंक्सच्या दर्जानुसारयादी मिळत असे. अशा पद्धतीने त्यांच्या नकळतचत्यांनी ‘वेब क्रॉलर’ तयार केले होते. ‘वेब क्रॉलर’म्हणजे एक असा प्रोग्राम ज्याच्या मदतीने वेबवरीलसर्व पेजेसना भेट देऊन त्यांचा मजकुर तसेचजोडलेल्या लिंक्स आणि काही इतर गोष्टींच्याआधारावर वेब पेजेसची अनुक्रमणिका (indexing)ठरवतात. त्यानंतर काही काळ चाचणी केल्यावरत्यांच्या असे लक्षात आले कि ’बॅकरब’ चा इंटरनेटसर्चमध्ये अतिशय महत्वाचा उपयोग होऊ शकतो.त्याकाळी आर्की (Archie), वेरोनिका (Veronica),एक्साईट (Excite), अल्टाविस्टा (Altavista) हि सर्चइंजिन प्रसिद्ध होती. सर्च करण्यासाठी हि इंजिन्सफक्त वेबपेजेसवरील सर्च केलेल्या वाक्यातीलशब्दांची वारंवारता (frequency of keywords) लक्षातघेत असत. म्हणजे जर आपण एखादे वाक्य सर्चकेले, तर ज्या वेबपेजवर त्या वाक्यातील जास्तीतजास्त शब्द जास्तीत जास्त वेळा आढळतील तेवेबपेज रिझल्टमध्ये पहिल्या क्रमांकाला असेल आणित्याच्या पेक्षा कमी वारंवारपणा असलेले वेबपेजत्याच्या खाली अनुक्रमे मिळत. वेबवरती सर्चकरण्यासाठी ते दुसऱ्या कोणताच घटकावर अवलंबूननसत. त्यामुळे ’बॅकरब’मुळे अर्थातच चांगले रिझल्टमिळणार होते. त्यांनी पारंपारिक सर्च इंजिनच्याआणि ’बॅकरब’च्या वैशिष्ट्यांना जोडण्यासाठी एकनवा अल्गोरिदम तयार केला. हा अल्गोरिदम‘पेजरँक’ म्हणून ओळखला जातो. या सर्च इंजिनमध्येजेवढे जास्त वेबपेज शोधायचे असतील तेवढा चांगलारिझल्ट मिळत जातो.गूगलचं सर्वात पहिलं होमपेजआता या नव्याने तयार केलेल्या सर्च इंजिनसाठी तेनाव शोधत होती. त्यांनी ‘द व्हॅाटबॉक्स’ (TheWhatbox) जे नाव जवळपास निश्चितच केले होतेपण शेवटी त्यांनी ‘गूगोल’ (googol) या शब्दापासूनप्रेरणा घेऊन ‘गूगल’ (Google) हे नाव सर्च इंजिनलादिले, ‘गूगोल’ म्हणजे १ च्या पुढे १०० शून्य एवढीमोठी संख्या. १९९६ साली त्यांनी ‘गूगल’ हे सर्चइंजिन कॉलेजच्या सर्व्हरचा वापर करून लोकांसाठीखुला केला. काही कालावधीतच तो प्रसिद्ध झाला.पण ’बॅकरब’ प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या संगणकीयसंसाधनांची क्षमता वाढतच चालली होती, आणि हाप्रोजेक्ट चालू ठेवण्यात त्यांचा खूप वेळ जात असे.त्यांना ‘पीएचडी’चे शिक्षण देखील पूर्ण करायचे होते,तसेच त्यांना इतर कंपन्यांकडून त्यांचे संशोधनविकत घेण्याच्या चांगल्या ऑफरदेखील येत होत्या.पण त्या दोघांना या प्रोजेक्टमध्ये खूपच रस होता,त्यामुळे ‘पुढचे पुढे बघू’ या विचाराने त्यांनी सर्वऑफर नाकारल्या. आता लॅरी आणि सर्गेला त्यांनीकेलेल्या असामान्य संशोधनाची जाणीव झाली होतीआणि ते स्वतःचीच कंपनी काढण्याच्या विचार करतहोते. १५ सप्टेंबर, १९९६ साली google.com हे डोमेननेम सर्च इंजिनसाठी नोंदण्यात आले. यावेळी नावनोंदवताना झालेल्या चुकीमुळे गूगलला गूगल हे नावमिळालंय! गूगल हे आजूबाजूच्या वर्तुळात आणिशैक्षणिक संशोधन क्षेत्रात प्रसिद्ध होतच चालले होते.एकदा असेच १९९८ साली ‘सन मायक्रोसिस्टिम्स’ चासह-संस्थापक अॅंडी जेव्हा स्टॅनफोर्डमध्ये आला होतात्यावेळी गूगलची किमया पाहून तो भारावून गेला.तेव्हा संगणकीय संसाधनांच्या कमतरतेमुळे गूगलसर्च रिझल्टवर मर्यादा येत होत्या. म्हणून गूगल सर्चइंजिन विकसित करण्यासाठी त्याने १,००,००० डॉलरचा चेक ‘Google Inc’ या अस्तित्वात नसलेल्याकंपनीच्या नावे लिहिला. आता या चेकचा वापरकरण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता,त्यामुळे त्यांनी ४ सप्टेंबर, १९९७ साली ‘Google Inc’कंपनी नोंद केली आणि बँकेच्या खात्यात पैसे जमाकेले.गूगलचं सर्वात पहिलं डूडल!त्यानंतर त्यांनी कॅलीफोर्नियातील एका गॅरेजमध्येस्थलांतर केले. काम वाढत चालल्यामुळे, त्यांनीसॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कंपनीमध्ये घेण्यास सुरुवातकेली. ‘गूगल’ हे इतर सर्च इंजिनच्या तुलनेने अधिकचांगले रिझल्ट देत असल्यामुळे त्याला चांगलीचप्रसिद्धी मिळत चालली होती. त्यानंतर त्यांनीकॅलीफोर्नियातील माउंटेन व्हयू भागात स्थलांतर केले.त्याकाळी इतर कंपन्यांमध्ये फक्त कामाला केंद्रबिंदूमानणारी कॉर्पोरेट संस्कृती होती. गूगलने मात्रकामाला महत्त्व देतानाच कर्मचाऱ्यांना काम करतानाआरामदायी वाटेल, त्यांच्या सर्जनशीलतेला वावमिळेल अशी संस्कृती तयार केली. १ एप्रिल,२००० लागूगलने ‘मेंटलप्लेक्स’ हि सुविधा सुरु केल्याचे सांगूनलोकांना ‘एप्रिल फुल’ बनवले. त्याची जाहिरात देखीलखूप मजेशीर होती. ‘मेंटलप्लेक्स ही एक अशीटेक्नोलॉजी आहे कि ज्यामध्ये ब्रेनवेव्हचा वापर होतो.त्यामुळे तुम्हाला जे काही शोधायचे आहे ते सर्चटाईप करण्याची गरज पडणार नाही.’, असे सांगतलेहोते. यामध्ये लोकांना टोपी, चष्मा अशा गोष्टीकाढून टाकून पडद्यावरील वर्तुळाकडे लक्ष केंद्रितकरण्यास सांगत. लक्ष देत असतानाच तुम्हाला जेकाही शोधायचे आहे त्याचा विचार करण्यास सांगत,कि ज्यामुळे ‘मेंटलप्लेक्स’ तुमच्या मनातले ओळखूनरिझल्ट देईल. तेव्हा बऱ्याच लोकांना हे खरेच वाटलेहोते. गूगलने यानंतरदेखील बऱ्याचवेळा लोकांना‘एप्रिल फुल’ बनवले. २००० पर्यंत गूगल सर्च इंजिनहे १५ भाषांमध्ये उपलब्ध होते. सध्या ते १५० पेक्षाअधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. याच दरम्यानत्यांनी लोकांना गूगल होमपेज वर न जाताकोणत्याही वेबपेज वरून गूगल सर्च इंजिनवापरण्यासाठी ‘गूगल टूलबार’ हे ब्राउझरसाठी प्लग-इन (plug-in) तयार केले. तसेच जर एखाद्या दिवशीजर काही महत्वपूर्ण घटना किंवा प्रसंग घडला असेल,तर त्याला अनुसरून गूगलच्या होमपेज वरीललोगोमध्ये बदल केले जात, आणि या नवीन लोगोंना‘गूगल डूडल’ असे नाव दिले. अशा पद्धतीने गूगलनेनवनवीन गोष्टी प्रदान करायला चालू केल्या होत्या...‘एप्रिल फुल’साठी ‘गूगल मेंटलप्लेक्स’ची युक्ती२००० पर्यंतच गूगल सर्च इंजिनमध्ये दररोज २००लाखापेक्षा जास्त प्रश्न विचारले जात असत. सध्यागूगल दररोज ३.५ अब्जावधी प्रश्नांना हाताळते.गूगल सर्च इंजिनची सेवा मोफत होती, पण कंपनीचालू ठेवण्यासाठी भांडवल जमा करणे आवश्यकहोते. तेव्हा लॅरी आणि सर्गेने ऑनलाईन जाहिरातीतूनभांडवल जमा करण्याचे ठरवून ‘गूगल अॅडवर्ड्स’(Google AdWords) ही नवीन सुविधा चालू केली.सुरुवातीला त्यांनी CPM (cost per mille) संकल्पनावापरली, तसेच ‘बॅनर अॅड’मुळे साईटवर भर येऊ नयेआणि वापरकर्त्याला लवकरात लवकर रिझल्टमिळावेत म्हणून फक्त ‘मजकूर आधारित जाहिरात’(Text based ads) दाखवण्याचे ठरवले. तसेच जाहिरातही वापरकर्ता काय शोधत आहे यावर अवलंबून असे.CPM म्हणजे अशी संकल्पना कि ज्यामध्येसुरुवातीपासूनच जाहिरातीचा दर ठरवलेला असतो,आणि त्यानुसार पैसे मिळतात. म्हणजे जर एखाद्याजाहिरातीसाठी १००० व्ह्यूजसाठी काही पैसे ठरवलीअसतील, तर जेव्हा त्या जाहिरातीला १००० व्ह्यूजमिळतील, तेव्हाच पैसे मिळतात. याच्याअगोदरदेखील १९९९ च्या शेवटी, गूगलने काहीप्रमाणात ‘मजकूर आधारित जाहिरात’ दाखवण्याचेचालू केले होते, पण यातून फार कमी भांडवल जमाझाले होते.
पण जेव्हा २३ ऑक्टोबर, २००० साली ‘गूगलअॅडवर्ड्स’ सेवा चालू करण्यात आली तेव्हा गूगलकडेऑनलाईन जाहिरातीसाठी फक्त ३५० ग्राहक होते.२००१ पर्यंत यापासून गूगलकडे ८५ लाख डॉलरभांडवल जमा झाले होते. पण त्याच वेळी Overtureया कंपनीकडे ऑनलाईन जाहिरातीमार्फत २८८ लाखडॉलर भांडवल जमा झाले होते. Overtureची सुविधाCPC (cost per click - जर युजरने जाहिरातीवर क्लिककेले तरच पैसे मिळतात, आणि प्रत्येक क्लिकसाठीदर ठरवलेला असतो) संकल्पनेवर आधारित होती.Overture च्या या मॉडेलमध्ये ग्राहकाकडून जास्त पैसेघेऊन त्यांची बिझीनेसची जाहिरात जास्त वेळालोकांच्या नजरेत दिसेल, अशी दाखवण्याची सुविधाहोती. कारण जेवढ्या जास्त लोकांना जाहिरातदिसेल, तेवढी जास्त बिझनेसची प्रसिद्धी होणारआणि नवीन ग्राहक मिळणार. पण Overture च्या यामॉडेलमध्ये काही त्रुटी होत्या. जर अशीच एखादीजास्त पैसे देऊ केलेली जाहिरात वेबपेजवरती सर्वातवरच्या बाजूला असेल आणि युजरने काही वेगळेचसर्च केले असेल (म्हणजे युजरचा जाहिरातीमध्येकाहीच रस नसेल) तर युजर त्या जाहिरातीवरतीक्लिक करणार नाही याची जास्त शक्यता होती. पणत्यामुळे कोणाचाच फायदा होत नव्हता. हीच त्रुटीओळखून गूगलने २००२ साली CPC वर आधारित‘गूगल अॅडवर्ड्स’ची पुढची आवृत्ती बाजारात आणली.तेव्हापासून ही सुविधा जाहिरातदारांमध्ये खूपप्रसिद्ध आहे. सध्या गूगलला यामधूनच सर्वातजास्त भांडवल मिळते.पण याआधी या सर्व सेवा-सुविधा तयार करण्यासाठीआणि बाजारात आणण्यासाठी गूगलला भांडवल जमाकरणे आवश्यक होते. त्यामुळे लॅरी आणि सर्गे यांनीगुंतवणूकदारांची भेट घेण्यास सुरुवात केली. त्यांनाएका गुंतवणूकदाराकडून २५ मिलिअन डॉलरचेभांडवल मिळाले, पण त्यावेळेस लॅरी आणि सर्गे याबिझीनेसमध्ये नवीन असल्यामुळे त्याने एखाद्याअनुभवी व्यक्तीला ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ (CEO)निवडण्याचे सांगितले. सुरुवातीला लॅरी या निर्णयासराजी नव्हता. पण शेवटी त्यांनी सीईओ शोधण्याससुरुवात केली. त्यांनी बऱ्याच कंपन्यांच्या सीईओनाभेट दिली, याच दरम्यान त्यांची भेट स्टिव जॉब्जसोबत झाली होती. ते दोघेही स्टिव जॉब्जच्याव्यक्तिमत्वाने प्रभावित झाले होते आणि त्यांनास्टिव जॉब्जने गूगलचा सीईओ व्हावे असे वाटतहोते. याबद्दल त्यांनी स्टिवला विचारले , मात्र स्टिवजॉब्जने यांस नकार दिला. शेवटी त्यांनी ‘एरिकश्मिट’ (Erik Schmidt) यास सीईओ म्हणून निवडले.आता एरिक श्मिट कंपनीची वाढ कशी करता येईल,अधिक भांडवल कसे जमा करता येईल, मॅनेजमेंटयांसारख्या गोष्टी सांभाळत असे. तर लॅरी आणि सर्गेहे सध्याच्या सुविधा आणखी कशा पद्धतीने सुधारतायेतील, कोणती नवीन प्रोजेक्ट चालू करायला हवायांसारख्या तांत्रिक गोष्टी हाताळत असत. त्यानंतरकाही काळातच गूगलने ‘गूगल इमेज’ सेवा चालूकेली कि ज्याद्वारे इमेज सर्च करता येते आणिगूगलची भरभराट होतच गेली.अशा पद्धतीने गूगल नेहमीच ज्या सेवा देत आलेआहे, त्यामध्ये अधिक सुधारणेसाठी प्रयत्न करतआले आहे. गूगलने लोकांच्या गरजांचा विचार करूननेहमीच नाविन्यपूर्ण सेवा पुरवल्या. ‘गूगल डॉक्स’,गूगल मॅप्स, ‘गूगल ड्राईव्ह’, ‘जीमेल’, ’गूगल नाऊ’,‘गूगल फोटोज’, ’गूगल ड्यूओ’, ‘गूगल क्रोम’यांसारख्या इंटरनेटशी संबंधित अनेक सुविधा याचीउदाहरणे आहेत. त्याकाळी ज्या मोफत मेल सेवापुरवल्या जात त्यामध्ये युजरला जास्तीत जास्तफक्त १० MB पर्यतचा डेटा मोफत ऑनलाईनस्वरुपात संचय करता येत असे. पण जीमेलमध्येसुरुवातीलाच १ GB डेटा ऑनलाईन स्वरुपात संचयकरण्यासाठी सोय केली होती. सध्या याची लिमिट१७ GB आहे. तसेच त्याकाळी गाजत चालेल्या अनेकसुविधा त्यांनी विकत घेतल्या, आणि त्यामध्येसुधारणा केल्या. गूगलने ‘युट्यूब’, ‘ब्लॉगर’, ‘where2 technologies’, ‘अँड्रॉइड’ यांसारख्या कंपन्या विकतघेतल्या आणि त्यांमध्ये भरपूर सुधारणा केल्या.गूगलचा मुख्य बिझीनेस हा इंटरनेटशी संबंधितअसलेल्या सेवा पुरवण्यामध्ये असला तरी मोबाईलऑपेरेटिंग सिस्टीम आणि हार्डवेअर क्षेत्रात जमबसवण्याचा प्रयत्न करत आहे. अँड्रॉइड कंपनीलाविकत घेऊन गूगलने मोबाईल OS क्षेत्रात चांगलाचजम बसवला आहे. मात्र मोबाईल हार्डवेअर क्षेत्रातजम बसवण्यासाठी गूगलने मोटोरोला ही कंपनीविकत घेतली पण त्यात नुकसान झाले आणि शेवटीगूगलने मोटोरोला कंपनी लेनोवोला विकली. अशाप्रकारे गूगलला काही क्षेत्रात भरपूर यश मिळाले आहेतर काही क्षेत्रात अपयशाला सामोरे जावे लागले आहे.पण गूगलने नेहमीच नवीन टेक्नॉलॉजीचा वापरकरून विविध क्षेत्रात जम बसवण्याचा प्रयत्न केलाआहे आणि पुढेदेखील करेल.२०११ मध्ये लॅरी पेज पुन्हा एकदा CEO झाला आणित्याने कंपनीच्या व्यवस्थापनात अनेक बदल केले.चांगल्या पद्धतीने कामाचे व्यवस्थापन करतायेण्यासाठी २०१६ साली ‘अल्फाबेट’ ही नवीन कंपनीतयार केली. सध्या ‘गूगल’ ही ‘अल्फाबेट’ कंपनीचाएक भाग आहे. अल्फाबेटमध्ये विविध प्रकारची कामेही त्या कामानुसार संबंधित विभाग हाताळते. जेव्हाया कंपनीची घोषणा करण्यात आली होती तेव्हा‘गूगल’चे म्हणजेच ‘अल्फाबेट’ या पेरेंट कंपनीच्याशेअर्सची किंमत वाढली होती आणि त्यातून त्यांना२० बिलीयन डॉलरचा फायदा झाला होता.एरिक श्मिट (कार्यकारी अध्यक्ष - अल्फाबेट)अल्फाबेट कंपनी गूगल (सर्च इंजिन आणि इतर मूळसेवांसंबंधी काम करते), कॅलीको (Calico –आरोग्यासंबंधित विषयांवर काम करते), गूगल एक्स(नाविन्यपूर्ण प्रोजेक्टवर काम करते), गूगल फायबर( स्पीड इंटरनेट पुरवण्यासंबंधित प्रश्नांवर कामकरते), गूगल कॅपिटल (नवीन टेक्नॉलॉजीमध्येइन्व्हेस्टमेंट संबंधित काम करते), गूगल व्हेंचर्स(नवीन कंपन्यांना भांडवल पुरवण्याचे काम करते)आणि नेस्ट (स्मार्ट घरघुती उपकरणे तयार करते) याकंपन्यांवर नियंत्रण ठेवते. या प्रत्येक कंपनीचेप्रतिनिधित्व करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती निवडण्यातआला आहे. सध्या लॅरी पेज अल्फाबेट कंपनीचेसीईओ आहेत, सर्गे ब्रिन अध्यक्ष (President) आहेतआणि एरिक श्मिट हे कार्यकारी अध्यक्ष (ExecutiveChairman) आहेत.गूगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचाईसुंदर पिचाई यांची गूगलच्या सीईओ पदी नेमणूककेली आहे. सुंदर पिचाई यांनी याअगोदर गूगलटूलबार, गूगल ड्राइव्ह, प्ले स्टोअर, क्रोम OS, गूगलमॅप्स, गूगल क्रोम ब्राउझर, क्रोमबुक, क्रोम OS,अँड्रॉइड यांवर काम केले आहे. त्यांच्या काळात यासर्वांची लोकप्रियता आणि वापर खूपच वाढला होता.सुंदर पिचाई यांचे व्यावहारिक चातुर्य, प्रगतीतीलसातत्य आणि कामाबाबत, कंपनीबाबतची निष्ठा यासर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची गूगलच्या सीईओपदीनेमणूक करण्यात आली. मायक्रोसॉफ्ट, अॅपल प्रमाणेगूगल कंपनीचे कोणी एक व्यक्ती प्रतिनिधीत्व करतनाही. त्यामुळे गूगलचे यश हे कोण्या एकाव्यक्तीमुळे नसून ते अतिशय बुद्धिमान, सर्जनशीलकर्मचार्‍यांमुळे आहे.गूगलला सर्वात जास्त भांडवल हे जाहिरातींमधूनमिळते. येत्या काळात लोक सर्च करण्यासाठीपारंपारिक पद्धतीचा वापर न करता ‘व्हॉइसअसिस्टंट’चा (वैयक्तिक सहाय्यक अॅप) उपयोगकरतील. त्यामुळे साहजिकच लोकांना जाहिरातदाखवता येणार नाही आणि जाहिरातींमधून मिळणारेभांडवल कमी होईल. यासाठी गूगल उत्पन्नाचे नवेमार्ग शोधत आहे आणि प्रामुख्याने हार्डवेअरआधारित सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहणारआहे. गूगलची ‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार’, ‘गूगल पिक्सेल’हा मोबाईल, प्रोजेक्ट Fi (वायरलेस सेवापुरवण्यासंबंधीत एक प्रकल्प), ड्रोन, व्हीआर हेडसेटही याचीच काही उदाहरणे आहेत.गूगल सामाजिक सुधारणेसाठीदेखील प्रयत्न करते.सध्याच गूगलने लोकांना इंटरनेटशी जोडता यावेयासाठी काही ठराविक ठिकाणी मोफत वायफायसुविधा उपलब्ध केली आहे. गूगल नवीन कंपन्यांच्या(Startup) उभारणीसाठी मदत करते, तसेचविद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावीयासठी विविध उपक्रम घेते. सध्या गूगलचे ८५.५बिलीयन डॉलर एवढे मूल्य (नेट वर्थ) आहे. २०१६च्या फोर्ब्जच्या यादीनुसार गूगलचा जगातील सर्वातप्रभावशाली ब्रॅन्ड्समध्ये दुसरा क्रमांक येतो. यामध्येत्यांनी मायक्रोसॉफ्टला मागे टाकले आहे. गूगलवापरण्याचे काही तोटेदेखील आहेत. आपण दररोजगूगलच्या सेवा वापरतो, त्यानुसार चांगल्या जाहिरातदाखवण्यासाठी आपली सर्व माहिती गूगलच्याडेटाबेसमध्ये स्टोर होते आणि ही माहिती जर दुसऱ्याग्रुपच्या हाती लागली तर ते लोकांच्या गोपनीयतेसाठीसुरक्षित ठरणार नाही. गोपनीयता न पाळल्याचेआरोपसुद्धा गूगलवर बर्‍याच वेळा करण्यात आलेआहेत. तसेच गूगलमुळे एखाद्या विषयासंबंधी खोटीमाहितीसुद्धा पसरवली जावू शकते. त्यामुळेमाहितीचा खरेपणा ओळखण्यावर ते सध्या कामकरत आहेत.गूगलचं मुख्यालय‘माहितीचे व्यवस्थितपणे व्यवस्थापन करून सर्वलोकांना ते उपलब्ध करून देणे’ हे गूगलचे ध्येयआहे आणि त्यासाठी गूगल कठोर मेहनत घेत आहे.सध्या गूगल सर्च इंजिनएवढे चांगले रिझल्ट कोणतेचसर्च इंजिन देत नाही. इतर सर्च इंजिनच्या मानानेगूगल खूप पुढे आहे पण खूद्द लॅरी पेजच्या मतेगूगल उत्तम सर्च इंजिनच्या तुलनेने बरेच मागे आहे.२०१३ मध्ये एकदा गूगलच्या सर्व सेवा २-३मिनिटांसाठी बंद पडल्या होत्या. तेव्हा जगातीलनेटवर्क ट्रॅफिक हे ४०% नी कमी झाले होते आणिगूगलच्या सेवांवर अवलंबून असलेल्या लोकांचे भरपूरनुकसान झाले होते. त्यामुळे सध्या जर कायमस्वरूपीगूगलच्या सेवा बंद करण्यात आल्या, तर पुढे कायहोईल याची कल्पना करवत नाही.

संकलन :-नंदकिशोर फुटाणे