👉 *गिनीज बुक; लिमका बुक फरक काय?*
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
👇
👇 👇
👇
👉 _*गिनीज बुक; लिमका बुक फरक काय?*_
अमुक व्यक्तिने एक विश्वविक्रम मोडीत काढत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले, तमुक एकाने लिमका वर्ल्ड रेकॉर्ड केले. या वर्ल्ड रेकॉर्डबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकले आहे. मात्र लिमका आणि गिनीज विश्वविक्रमात फरक काय? त्याचे फायदे काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
👉 _*वर्ल्ड रेकॉर्ड करणे म्हणजे काय?*_
विशिष्ट कौशल्य दाखवून सर्वोत्तम जागतिक कामगिरी करणे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड. वर्ल्ड रेकॉर्ड करताना ते नीट तपासून आणि पारखून नोंद केली जाते. एका अर्थी आपण आपलं नाव इतिहासात कोरत असतो.
👉 _*गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची वैशिष्ट्ये*_ :
1) हे विश्वविक्रम केलेल्या व्यक्तींची नोंद ठेवणारे पुस्तक आहे.
2) जगभरातील कोणत्याही व्यक्तींचा यात समावेश होऊ शकतो.
3) 1955 पासून दरवर्षी प्रकाशित होणारे हे एक संदर्भ पुस्तक आहे.
👉 _*लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सची वैशिष्ट्ये*_ :
1) गिनीजपेक्षा लिमका बुक वेगळे आहे.
2) लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स हे फक्त भारतीय माणसांपुरते मर्यादित आहे.
3) गिनीज बुकप्रमाणेच लिमका बुक दरवर्षी प्रकाशित केले जाते.
👉 _*फायदा काय?*_
गिनीज आणि लिमकाच्या माध्यमातून तुमचा आर्थिक फायदा होत नसला तरी तुमचं नाव मात्र कायमचं इतिहासात नोंदवलं जातं. गिनीज आणि लिमका बुकसाठी अर्ज करताना तुम्हाला पैसे भरावे लागत नाहीत आणि विक्रम केल्यावर पैसे मिळतही नाहीत. तुमच्या कामात जर तुम्हाला काही खर्च आला तर तो सुद्धा तुम्हालाच भरावा लागतो.
■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■
📊📊📊📊📊📊📊📊📊📊 📊📊📊