Pages

शुध्दलेखन गीत


*आनंददायी शिक्षण*

💥*विद्यार्थी विकास*💥
➖➖➖➖➖➖➖
👇
 👇
 👇 👇
 👇

विद्यार्थ्याना खालील गीताचे माध्यमातून शुध्दलेखना  विषयी मनोरंजक पद्धतीने विराम चिंहांची  माहिती देता येईल ! ! !

*शुध्दलेखन गीत*

वाक्य    पूर्ण    झाले
हसून सांगे पूर्णविराम.
दोन छोटया वाक्यांना
सहज जोडे अर्धविराम ;

एका जातीच्या शब्दांमध्ये
येऊन   बसे स्वल्पविराम.
वाक्याच्या  शेवटी   बोले
तपशिलात   अपूर्णविराम.

प्रश्न  ?  पडतो   तेव्हा
धावून येई  प्रश्नचिन्ह( ?).
भावनांच्या रसात बुडून
उभे राही उदगारचिन्ह !

शब्दावर$$ जोर पाडी
अवतरणचिन्ह एकेरी '  '
कुणी बोले तिथेच दिसे
अवतरणचिन्ह   दुहेरी."  "

कुठे घ्यावा विराम हे
चिन्ह  सांगे  अचूक
चिन्हांच्या सोबतीने
वाक्य लिहू बिनचूक.

चिन्ह वगळून वाक्य
कसे ओंगळवाणे दिसे.
चिन्हांमुळेच वाक्याचा
अर्थ   मनी   ठसे ! ! !

 फारच सुंदर!
शुद्धलेखनाचे गीत आहे. शिक्षकांनी
योग्य उदाहरणे देऊन हे शुध्दलेखन गीत /कविता  मुलांना   शिकविली, चाल लावून म्हणून घेतली तर मुलांना शुद्धलेखन समजण्यास खरोखरच मदत होईल.


             ✍संकलन
        *नंदकिशोर फुटाणे*
  ●█║▌│║║█║█║▌║║█║●
9⃣9⃣7⃣0⃣1⃣4⃣2⃣2⃣9⃣0⃣