Pages

मुलांशी कसे वागावे ?




*पालकांनो आपल्या मुलांचे आयुष्य सुरक्षीत करण्यासाठी थोडे गंभीर

व्हा*

1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी.

२. घरात आदळआपट मुलांसमोर करू नका.



3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला .

4. मुलांना घालून पाडून बोलू नका , मूल तुम्हाला avoide करेल .

5. मुलांनी चुक केलेली असेल तर

त्याला लगेच माफ करा आणि चांगल काम केलेलं असेल तर कौतुक

करा.

6.मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा

7.आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त

करावे.

8. मूल हि investors नाहीत

माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका .

9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका .

10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या. निर्णयात आपल्या मुलाला

समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून

सांगा .

11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा .

12. आपल्या मुलांची need समजून घ्या .

13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा

म्हणून या.

14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही ... नालायका , गधडा

वगैर सारखे शब्द वापरून .

15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई .....

मुलांना काहि calculated risk घेऊ द्यावी .

16. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत ... मूल

खोट बोलायला शिकतात ... प्रेमापोटी देखील मारू नये .

17. तू जर अस केलस तर मी सोडून जाईन , तुला एकट सोडून देईल

अस मुलांशी कधीही बोलू नये .

18.मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल

appriciation असावं .

19. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असत - हिपोक्रेटस.

20. मुलांच्या progress बुक कडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा .

23. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी

करतात याची मूळ लहान वयातील संस्कारांवर बव्हंशी अवलंबून

असतात.... यासाठी घरातील 'बाबां'नी ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी

झालेला अपमान , लॉस घरी कुटुंबाशी share करा , मूल कितीही वयाचं

असेल तरीही ...!

24. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता ....

वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या

लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा.

संकलन :- नंदकिशोर फुटाणे